Skip to main content

" किती अडवू मी अडवू कुणाला ... (विडंबन)

.

(चाल- किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला -)

"किती अडवू मी अडवू कुणाला, आज सिग्नलहि का बंद झाला
द्या हो बाजू चला, रस्ता सोडा मला" - आला ओरडत पोलीस आला .....

पावसाळी खड्ड्यांत, रस्त्याच्या काठी, पोलीस अवतरले
नाही हसू गालात, नाचवती चिखलात, सर्वजण कुरकुरले
पोलीस दिसतो दुरून, शिट्ट्या झाल्या फुंकून, साऱ्या ट्र्याफिकचा गोंधळ झाला .....

पोर लहानमोठी ही, म्हातारी कोतारी, भ्यालेत सर्व किती
कुणी इथे गाड्या, कुणी तिथे गाड्या, पब्लिकला नाही भिती
दहा गाड्या धडकून, पाचमध्ये अडकून, तोंड भरूनी फेसच आला .......

वेग हा मंदावताच, धावणारा थांबला, खड्ड्यात कोणी पडे
लपून छपून अधिकारी, धरतो सावज तरी, धंद्यात नसती खाडे
लाजा सोडती कशा, खंत नाही वेषा, देश सगळाच खड्ड्यात गेला......

.