Skip to main content

[मुक्तक] "मूळ"

1 minute

हॊ मी वाईट आहे!

मला माहित आहे की मी "वाईट" आहे
आणि खूप वर्षांपासुन आहे
आणि तसा मी वेडापण आहे...

आयुष्याची पन्नाशी नुकतीच गाठली
आणि माझ्या वाईटपणाचं मूळ
सापडलं

फार तपशीलात जायची गरज नाही

मी कष्ट करून लिहिलेल्या संशोधन निबंधाला
सहलेखक म्हणुन त्यांचे नाव लावले नाही
मग मी त्यांच्या नजरेत मी कायमचा वाईट बनलो.

MD परवानगीशिवाय मिटींग मध्ये
सिगरेटी फुंकुन वात आणे. त्याबद्द्ल नाराजी
दर्शवली तेव्हा मी वाईट ठरलो.

गरजा कमी ठेऊन, चार पैसे गाठीला बांधुन
सन्मानाने जगतो म्हणुन पण मी
वाईटच ठरलो.

त्यांच्या नजरेतुन जग बघत नाही
हा पण माझा एक वाईटपणाच आहे

अशी किती उदाहरणे द्यावीत तेव्हढी थोडीच...

थोडक्यात काय
माझ्या उत्कर्षाची किल्ली
मी सोडुन सर्वांकडे आहे
मी ती घ्यायला जात नाही
मग कुणी मला
कंट्रोल करु शकत नाही

नेमकं तेच
माझ्या वाईटपणाचं
मूळ आहे.

Node read time
1 minute

तिरशिंगराव Mon, 07/10/2013 - 13:32

मला वाटलं की मूळ नक्षत्रावर काहीतरी लेख असेल! कमीतकमी मूळव्याधीवर तरी असेल!

रमताराम Mon, 07/10/2013 - 14:20

गरजा कमी ठेऊन, चार पैसे गाठीला बांधुन
सन्मानाने जगतो म्हणुन पण मी
वाईटच ठरलो.

त्यांच्या नजरेतुन जग बघत नाही
हा पण माझा एक वाईटपणाच आहे

सह-अनुभूती!!!!

थोडक्यात काय
माझ्या उत्कर्षाची किल्ली
मी सोडुन सर्वांकडे आहे
मी ती घ्यायला जात नाही
मग मला कुणाला
कंट्रोल करता येत नाही

नेमकं तेच
माझ्या वाईटपणाचं
मूळ आहे.

हे एकदम पट्या. फक्त 'मग मला कुणाला' च्या ऐवजी 'मग कुणाला मला' असा बदल अपेक्षित असावा असे वाटते. (सध्या तुम्हाला अपेक्षित असलेल्या अर्थाच्या नेमका उलट अर्थ निघू शकतोय.)

बॅटमॅन Mon, 07/10/2013 - 14:30

In reply to by रमताराम

मला-कुणाला ऐवजी "मी कुणाला कंट्रोल करू शकत नाही" अशी वाक्यरचना जास्त स्पष्ट ठरेल, नैका? बर्‍याचदा मला कुणाला आणि कुणाला मला इ. मध्ये अर्थाची अदलाबदल विथ इंप्युनिटी होते तो गोंधळ इथे टाळता यावा.