Skip to main content

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे -

(चाल:- जीवनात ही घडी अशीच राहू दे)

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे
पेट्रोलच्या टाकीवरी गंज वाढु दे ||धृ||

रंगविले गॅरेजात कितिक देखणे
आवडले गाडीला खूप खर्चणे
स्वप्नातही बंद ना कधीच वाटु दे |१|

हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा
गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा
वर्षातुन छंद बंद कधि न होऊ दे |२|

...पाहु दे असेच तिला आता गंजता
राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता
महागाईत पायपीट सार्थ होऊ दे |३|

राजेश घासकडवी Sun, 20/11/2011 - 22:02

वेगळ्याच विषयावरचं विडंबन. बायको, दारू वगैरे घिसेपिटे विषय टाळल्यामुळे छान वाटलं.

हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा
गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा

या ओळी छान जमून आल्या आहेत.

अजून येऊ द्यात

दत्ता काळे Tue, 22/11/2011 - 17:34

..पाहु दे असेच तिला आता गंजता
राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता
महागाईत पायपीट सार्थ होऊ दे |३|

हा..हा..

मंदार Wed, 23/11/2011 - 18:39

हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा
गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा

हे बेष्ट जमलंय! मस्त विडंबन! विडंबनांतून विनोदनिर्मितीसाठी दारू, नवरा-बायको इ. विषयच असायला हवेत असं काही नाही हे अधोरेखित केल्याबद्दल अभिनंदन! और आन दो!