दोन क्षणचित्रे-
अजित विश्वनाथ भागवत
रुळांच्या काठाला
काळ्या बाभळी रापल्या
जटा पिंजारल्या
निष्पर्ण त्रोटक
खोड-खपल्या टणक
जीव धरून मूळ
तगमग पिउन मातीची
खुणगाठी बांधते जीवेच्छा.
रुळांच्या काठी
वृक्ष डेरेदार
पारंब्या घोळल्या मातीपर्यंत
तरुण काया
पालवी कोवळी
भार काहीसा डोईवर
उभी
धीट शांत विरक्त.
*******************
तुम्ही परत सक्रिय झालात!
तुम्ही परत सक्रिय झालात! अभिनंदन!!