सध्या काय ऐकलंत / ऐकताय- ३
===========
https://www.youtube.com/watch?v=zq1iAEICw8E
मधुबालेच्या डोळ्यात "अश्क" बघितले की .... यारों ... जहन में एक दर्द सा उठता है ... एक खलिश सी महसूस होती है !!!
(आणि त्यात तो माठ ... भारतभूषण.)
---
--
मलाही सण्ड्रा बुल्क आवडते गं.
मलाही सण्ड्रा बुल्क आवडते गं. मधुबाला म्हणल ना की जालावर जरा अंमळ जास्तच उमाळे फुटतात...उसासे सोडले जातात म्हणुन जरा कुजकेपणा केला. अणि तुला महितीये मधुबाला आवडणं म्हणजे काहितरी उच्च अभिरुचीच लक्षण बिक्षण असतं आणि ती आवडत नाही अस म्हटल रे म्हटल की लगेच तुमचा आयक्यू मायनस मधे गणला जातो.
स्त्रीसुलभ नजाकतीचा साफ अभाव
स्त्रीसुलभ नजाकतीचा साफ अभाव असणारी जोडी फॉस्टर, तिची बोलण्याची वेगळीच लकब आणि 'मॉन्स्टर' या चित्रपटात सौंदर्यांची, स्त्री शरीराच्या प्रमाणांची ऐशीतैशी करणारा मेकप, आकार आणि त्या सगळ्याला शोभणारं काम केल्यामुळे शार्लीझ थेरन फार आवडतात.
(मधुबाला आवडतच नाही असंही नाही, तिरळी होती तरी सुंदर होती. तसल्याच घिस्यापिट्या भूमिका आणि हिरो-हिरविणीने लौ करण्याच्या आड व्हिलन येणार असलेच सिनेमे त्या काळात होते हा काही तिचा दोष नाही. त्यापेक्षा तिच्याबद्दल यशस्वी, कमावती अभिनेत्री आणि तरीही घरातली सत्ता वडलांच्या हातात, हिच्या हातात खुळखुळा वगैरे भाग मला जास्त रोचक वाटतो.)
कैच्याकै
मधुबाला आवडणं म्हणजे काहितरी उच्च अभिरुचीच लक्षण बिक्षण असतं >> कैच्याकै. उलट ते 'नॉर्मल' असण्याचं लक्षण आहे. म्हणजे सुंदराला सुंदर म्हणण्यात 'लोक काय म्हणतील' माझे हुच्चभ्रू दोस्त नावं ठेवतील वगैरे विचार न करता प्रामाणिकपणे 'आवडते' म्हणणं असतं. याउलट मधुबालाबाबत नाक मुरडणं हे अभिरुचीच्या तथाकथित वरच्या थरात आपण आहोत वगैरे ठसवण्याचा प्रयत्न असतो, म्हणजे पुलं, वपु वगैरे चारचौघांना आवडणार्यांना 'मध्यमवर्गीय लेखक' म्हणून हिणवणार्या, किंवा इतरांच्या गळ्यातील ताईत असलेल्या सचिन तेंडुलकरला आकडेवारीची मोडतोड करून नालायक सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार्या, लताबाईंच्या स्वर्गीय गाण्यांपेक्षा त्यांनी कसं राजकारण केलं वगैरेमधे रस असणार्या, चार लोकांच्या अनुभवाशी सहज जोडल्या जाऊन दाद घेणार्या कवितांपेक्षा रांगोळी टिंबांच्या कहाण्या सांगणार्या दुर्बोध कविता कित्ती आशयघन, आशयसूत्रांच्या प्रयाणपाराच्या पलिकडच्या वगैरे आहेत म्हणणार्या पण प्रत्यक्षात डोंबलं काही कळलं नाही असं मनात म्हणणार्या दांभिक जमातीबद्दल बोलतोय मी. तिच्या पेक्षा ज्युलिया रॉबर्ट्स कित्ती क्यूट, पुलंपेक्षा वुडहाऊस किती न्याचरल आहे नै वगैरे फुकाच्या टिमक्या वाजवणार्यांबद्दल बोलतोय मी.
हुश्शः आता गायबतो नाहीतर मार पडणार नक्की.
-मधुबालाच्या सौंदर्याचा कट्टर चाहता (पण तिच्या अभिनयाबद्दल सोयीस्कर मौन पाळणारा) रमताराम
मधुबाला: थोराड पSSSSSSSSSSSण
मधुबाला: थोराड पSSSSSSSSSSSण सुंदर चेहेरा, ठोकळा बांधा, नाचाची बोंब, अभिनयाशी वैर ई.ई.
पु.ल.: कुर्निसात!!
वुडहाउसः आणखी एक वादग्रस्त विधान करणार होते..पण राहिलं ते. त्यादिवशी आमचा सगळा ग्रुप TCBY मधे गेला होता. तर तीथे लागलेल्या म्युझिक मधे अचानक आय पी एल ची चिरपरीचीत धुन ट्यँट्यँट्यँट्यँट्यँट्यँट्यँट्यSSSSSSSSS कानावर पडली. आयपीएल सुरु होतय आणि सगळा इण्डिञन घोळका आलाय म्हणुन त्यांनी ही धुन वाजवली असं आधी वाटलं (ईथे असं करतातही) पण कसलं काय हो...ते एक ईंग्लिश गाणं होतं. च्यायला ओरिजीनल काय नाहीच का आपल्याकडे..? :| )
वपु. : जाउ द्या, सोडा, जाSSSSSSउ द्याSSSSSSS
लता: १९७५ पुर्विची आवडते. आता हे पण राजकारण का?
सचिन तेंडुलकरः क्रिकेट, आकडेवारी, रेकोर्ड्स..बाप माणुस!! (त्याचे सत्यसाईबाबांच्या ईथले वर्तन नाही पटले...पण शेवटि त्याची श्रद्धा, त्याची निष्ठा त्याच्याकडे. त्यानी कुठल्याही कोंट्रोवर्सी मधे कसलाच स्टॅण्ड घेतला नाही, त्याला आणि फक्त त्यालाच शक्य असुनसुद्धा पण तरिही त्याचा निर्णय, त्याची मर्जी. आणि शेवटि त्याच्यामधले काय आवडावे आणि काय नाही ही एब्सोल्युटली माझी मर्जी नाही का? त्याचं सगळच आवडत असं म्हणणं , म्हणजे माझा पण 'मधुबालाचाहता' होणार...!!!)
चित्र आणि ईतर कला: घोडा म्हणजे घोडा आणि माणुस म्हनजे माणुस ईतक स्वछ कळतं तेच आवडतं. आमच्या ईण्डियातल्या टाउन्शीप मधे एक स्कल्प्चर पार्क होता. तिथे एक घासुन गुळगूळीत केलेला दगड होता, त्याला मधोमध एक तासलेलं मोठ्ठ भोक पाडल होतं आणि वर आणखीन एक तसलचं भोक होतं. तो म्हणे 'मुक्त होणारा आत्मा' होता... :(( :(( :((
काव्यः नाच रे मोरा...छान कळतं पण आवडत नाही. "आलो होतो हासत मी,काही श्वासांसाठी फक्त,दिवसांचे ओझे आता,रात्र रात्र शोषी रक्त
आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा" म्हणायला खुप आवडत पण घण्टा कळत नाही :(( :(( :((
कॉम्प्लीकेटेड आहे हो सगळ. मधुबाला आवडत नसणार्यांचे पण ईतके पैलु असु शकतात..हो ना? मग मधुबाला ना आवडणारे उपर्रोल्र्खित सगळ्याच विशेषणांना म्हणजे राजकारणी, दांभिक ई.ई. पात्र आहेत असं म्हणणं म्हणजे थलथकतिकलन नाही का?
(देवा, ब्याट्म्यान चा कॉम्प्युटर बंद पाड...अरे देवा..पण मी तर देव ही मानत नाही.... :O :O :O )
यही तो मै कह रहा हूं. काल
यही तो मै कह रहा हूं.
काल त्यांनी सुमन कल्याणपूर यांचा आवाज लतादीदींपेक्षा जास्त आवडतो - असे विधान करून मला अलियनेट केलेले आहे. आज मधुबालेबद्दल हे असं बोलून आमच्या पर्ल हार्बर वरच अॅटॅक केला.
तिसरे व चौथे महायुद्ध एकत्रच होणार असे दिसते. मी आमच्या सेनादलांना DEFCON 1 वर जायचा आदेश दिलेला आहे.
ज्जे बात! गब्बर तुम आगे बढो!
ज्जे बात! गब्बर तुम आगे बढो! हम लडाई देखने को उत्सुक हय :-P
तरी म्हणल मधुबाला समर्थक एवढे शांत कसे काय इतका वेळ.
बाकी स्वराच्या स्त्रीसुलभ नजाकत सोडुन इतर मुद्द्यांशी मी सहमत आहे. पण त्याकाळी बर्याच नायिकांचा बांधा तसाच होता. चुभुद्याघ्या.
खरंतर आत्ताआत्तापर्यँत, सोनाली बेँद्रे वगैरे येइपर्यँत नायिका तशाच होत्या. परत चुभुद्याघ्या :-D.
अरे बापरे...मी ईथे ऑलरेडी
अरे बापरे...मी ईथे ऑलरेडी ममीफाय झालेय. हरकत नाही, 'हमरी अटरीया पे...http://youtu.be/-BOWrHtthyc आणि 'ये लाल इश्क ये मलाल इश्क...http://youtu.be/W0Gms9jn9lg ऐकते....
चलो, आने दो...!
फ्रेंच, चिनी लोकांचं इंग्लिश
फ्रेंच, चिनी लोकांचं इंग्लिश लक्षपूर्वक ऐकलं तर ते शब्दाच्या सुरूवातीच्या 'थ'चा 'स' करतात असं लक्षात येईल. हा 'स' म्हणजे आपल्या 'स'सारखा नसतो, थ-ज-स च्या मधला उच्चार असतो, पण आपल्याकडे तो उच्चार नाही म्हणून लिहीण्याची सोय नाही. या लोकांशी बोलताना त्यांना 'थर्टी सेव्हन' समजलं नाही तर सरळ 'सर्सी सेव्हन' म्हणून पहा.
तर ते या 'थलथकटीकरणा'मुळे आठवलं.
+१ -१
बाकी स्त्रीसुलभ नजाकतीचा अभाव असणारी प्रत्येक स्त्री मला लक्ष देण्यालायक निश्चित वाटते.
हे वाक्य किंचित बदलून म्हणेन :-
बाकी तथाकथित स्त्रीसुलभ नजाकतीचा अभाव असणारी प्रत्येक स्त्रीसुद्धा मला लक्ष देण्यालायक निश्चित वाटते.
.
.
मधुबाला छान वाटते तसेच विद्या बालनसुद्धा.
काही शहाणे तिला लठ्ठ वगैरे म्हणतात.
म्हटलं अतिअशक्त असण्यापेक्षा इतपत लठ्ठ असलेलच बरं.
शिवाय ती स्वतःशी प्रचंड कम्फर्टेबल आहे.
स्वतःशी कम्फर्टेबल असलेल्या स्त्रिया छान वाटतात.
त्यातल्या काहिंचा नैसर्गिक बांधाच जाड्/मजबूत्/डबल हड्डी असतो. काही मुळातच बारिक अंगकाठीच्या असतात.
मुद्दाम मरेस्तोवर झिरो फिगरसाठी मरमर करणारे आवडत नाहित.
गेट वे ऑफ इंडीया.
हा हा! मला https://www.youtube.com/watch?v=b2Q8B2jLvVM याची आठवण झाली.
!
खरे तर अतिशय सुंदर गाणे आहे, याची कल्पना आहे. पण उघडून पाहवले नाही.
काय आहे, आजपावेतो हे गाणे केवळ शीड्याक्याशेटांमधून ऐकलेले आहे. बोले तो, केवळ ऑडियोमध्ये. पण तलतचा आवाज ऐकण्याकरिता बरोबर दिलीपकुमारचे थोबाड१सुद्धा पाहत राहण्याची कल्पना सहन करवत नाही२.
----------------------------------------------------------------------------------------------
१ का कोण जाणे, पण दिलीपकुमारचे थोबाड पाहिले, की केवळ 'याच्या कानाखाली खरकट्या हातांनी एक खन्नकन वाजवावी' ही एकमेव भावना आजपावेतो मनात प्रबळ होत आलेली आहे. (तसे आपण एरव्ही फारसे व्हायोलेण्ट प्रवृत्तीचेही नाही. बोले तो, बहुधा नसू. आणि, नथिंग पर्सनली अगेन्ष्ट मिष्टर दिलीपकुमार, ईदर. पण होते खरे असे. डोक्यात जातो खरा.)
२ सोबतीला मधुबाला असली, तरीही. (तसे मधुबालेबद्दल आपण न्यूट्रल आहोत. बोले तो, टॉलरण्ट. म्हणजे, फार ग्रेट वगैरे आहे, असेही वाटत नाही, पण तिटकाराही नाही. चालून जाते. माफक नयनाल्हाददायक आहे, आपल्यापुरती ठीक आहे. असो.)
बाकी काहीही म्हणा...
... गब्बर एरव्ही कसाही असो ;), पण त्याची गाण्यातली टेष्ट मात्र वाखाणण्यासारखी आहे, हां!
- (वामहस्त१प्रशस्तिपरायण) 'न'वी बाजू.
-------------------------------------------------------------------------
१ कारण शेवटी आम्ही... लेफ्टिष्टच! त्याला काय करणार? ;)
ही सगळीच उच्च गाणी आहेत.
ही सगळीच उच्च गाणी आहेत. जुल्म-ए-उल्फत पे - हे तर लताबाईंनी खास आमच्यासारख्यांची "लाख जिगर चाक" करण्यासाठीच गायलेले आहे असे वाटते.
उठाये जा उनके सितम - हे रात्री अकरा वाजता ऐकावे. रेड वाईन चा एखादा पैमाना साथ हो तो "जुबां खामोश तो होगी ... पर ... अश्क भर आयेंगे".
हे घ्या आणखी एक
हे घ्या आणखी एक ...
https://www.youtube.com/watch?v=0aT45mikEGU
हम प्रेम के सागर में एक साथ बहे होते
और अगर बच भी जाते तो अपने ही
अश्कोंमे डूब के मर गये होते...
चारचार आहेत.
लोडवायला वेळ लागतोसे दिसते. (का कोण जाणे.)
१. यूँ हसरतों के दाग़ http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=OypGJJrizas
२. उन को यह शिकायत है http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=vY_S_Br6MAs
३. उठाए जा उन के सितम http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=It4hHAp-784
४. जुर्म-ए-उल्फ़त पे हमें लोग सज़ा देते हैं http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=CM1jjv5Z70E
फैली हुई है सपनोंकी बाहे ...
फैली हुई है सपनोंकी बाहे ... च्या नंतर हे मला खूप रोमँटिक वाटतं (दुसर्या क्रमांकावर)
http://www.youtube.com/watch?v=tScOkrdvg1w
--
हे ही खूप ऐकतेय
हे ही खूप ऐकतेय सध्या...
काल एका छोट्याश्या ईण्डीयन
काल एका छोट्याश्या ईण्डीयन ग्रोसरी मधे साखर घेतानाच अचानक हे ऐकल...मस्स्स्स्स्त वाटलं...एकदम देजा वू फिलींग..!!
९० च्या पूर्वीच्या सगळ्या
९० च्या पूर्वीच्या सगळ्या हिरोईन च्या चेहऱ्यात मला काही फरकच काळात नाही आहे.
वरती मधुबालाचे विडीओ बघितले. गोड आहे पण आमची ठमी पण मेक अप केल्यावर गोडच दिसते. त्याकाळी अभिनय म्हणजे काय असणार आहे ? कॅमेरा समोर जाऊन नुसता कपाळावर बट घेऊन झाडाच्या आगे मागे हिरोला गाजर दाखवत फिरायचं(अपवाद-देविका राणी)
आजकाल सनीदीदी किती श्रम घेते(हवेत उडणे वगैरे).
वूडहाउसच्या विनोदाला हसणारे लोक आय टी कंपनी मध्ये काम करतात आणि फावल्या वेळात क्ले कोर्टवर टेनिस खेळतात.(खेळतात म्हणजे रकेट घेऊन जिमखान्यात जातात आणि टाईमपास करत बसतात)
पुल देशपांडे आज असते तर त्यांनी पुस्तक लिहिण्याएवजी ब्लॉग लिहिला असता का?
आकडेवारी जाउदे सचिन तासापण एकदम अवरेज खेळाडू होता. उगीच फुटेज भेटलं त्याला.
कोहली , द्रविड , गांगुली , पोन्तिंग , बेवेन , लारा हे त्याच्यापेक्षा शतपटीने प्रतिभावंत खेळाडू होते.
आम्ही फक्त रंगीत चित्रे बघतो त्यांचे रस ग्रहण करत नाही.
काय बोल्ता राव
मधुबाला, सचिन हमारे दैवत है. तुम अपनि जिभ संभालो. नहितो तुमको कॉन्स्टिपेशनका सर्टिफिकेट मिलेगा.
गंभिर होतः आम्हाला मधुबाला एक-दोन गाण्यातुन माहित आहे. तिच्याविषयी लोकांना भिषण प्रेम असेल असंही माहित नव्हतं. आम्हि आसपासच्या हाडामांसाच्या मुलिंवर लाइन मारत असल्याने आमचे जिवापाड प्रेमहि त्यांच्यावरच होते. ८०च्या दशकात बराच मसाला उपलब्ध असल्याने अगदि पौगंडावथेतहि श्यामश्वेत काळातल्या बायांचा विचार करावासा वाटला नाहि.
हे ऐकाच. लताचं नाहिये, आशाचं
हे ऐकाच. लताचं नाहिये, आशाचं आहे. आलि रे मेरे नैना बान पडी...
इर्शाद. हे मी नुकतंच माझ्या
इर्शाद. हे मी नुकतंच माझ्या फेसबुकावर पोस्ट केले होतं. उच्च आहे. पूर्वी सिलोन वर फार लागायचं. सकाळी साडेसात वाजता. पुराने फिल्मों के संगीत च्या कार्यक्रमात.
------
जोडीला हे ऐका -
https://www.youtube.com/watch?v=q8Sb7eRG4bw
सावन मे उमग्यो मेरो मन
भनक सुनी हरी आवन की
नन्ही नन्ही बूंदन मेहा बरसे
शीतल पवन सुहावन की
मीरा के प्रभु गिरिधर नागर...
श्रावणाच्या पावसाच्या थेंबांत आपल्या हरी ला पाहणार्या मीरे ला ग्रीन पोएटेस म्हणायला हरकत नसावी.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=NbqCWwlNKrA
दिस इज ओल्डेस्त सॉंग आय लाईकड
आए कुछ अब्र कुछ शराब आए
फैज सायबांची शायरी. आए कुछ अब्र कुछ शराब आए. ही गझल अनेकांनी गायिली आहे. गुलाम अली, बेगम अख्तर, तलत, जगजित, मेहदी हसन, नुसरत इ.
https://www.youtube.com/watch?v=bV4pNQb-YNc
पावसात भिजलेली माला सिन्हा
पावसात भिजलेली माला सिन्हा .... ओ हो हो .... ए रहमो करम जरा थम के बरस .... कही बरसात में आग न लग जाये ...
https://www.youtube.com/watch?v=tdeaeyr8wS4
मधुबाला सुंदर होती कि आकर्षक
मधुबाला सुंदर होती कि आकर्षक होती?