भाग १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---------
http://www.ndtv.com/elections/article/election-2014/muslims-are-too-sec…
मुस्लिम जास्त सेक्यूलर आहेत. त्यांनी कम्यूनल व्हावे. मुसलमानांना मत द्यावे. - इति शाझिया इल्मि, आआपच्या पहिल्या दहा प्रभावी लोकांपैकी एक.
One more party with difference losing difference.
अशा प्रसिद्ध भडकाऊ वाक्यांची टॅलि खालिलप्रमाणे आहे -
१. भाजप - तोगडीया (मुस्लिमांना घरे घेणे अवघड करावे), गिरिराज (मोदीविरोधकांनी पाकिस्तानात जावे), अमित शाह (बदला), मोदी (पिंक रिवोल्यूशन)- ४
२. शिवसेना - कदम (मोदी मुस्लिम दंगेखोरांची दखल घेतील) -१
३. सपा - आजम खान (कारगिल भारतीय मुस्लिम सैनिकांनी फते केले. याचा लोक बाऊ का करत ते मला कळले नाही.), अबू आझमी (स्वत:च वाचा) -२
४. काँग्रेस - इमरान मसून (मोदीचे तुकडे करेन), बेनी प्रसाद वर्मा - (बीजेपीचे सारे प्रधानमंत्री उमेदवार पाकिस्तानात पाठवा, मोदी हिटलरची औलाद) -२
५. आआप - १
एकूण १०. न रेकॉर्ड झालेले, इ याच्या १०० पट मानू. एकूण १०००. आजपर्यंतचे सर्वात चांगले इलेक्शन. पुढे अजूनही व्हिडिओची वाढल्याने असे करता येणार नाही. रिपोर्टींग १००% होईल. अच्छे दिन आने वाले है.