ऐसी अक्षरेवर वेगळे काय? हा प्रश्न अधूनमधून उपस्थित होतो. इतर संस्थळांप्रमाणेच हीही एक अभिव्यक्तीची जागा, इतकंच आहे का? संस्थळ सुरू केलं तेव्हापासून केवळ इतकंच राहू नये असा कायमच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. सुरुवात झाली ती मुक्त वातावरणात अभिव्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देऊन. कमीतकमी संपादन करून प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा, लेखांना तारका देऊन आत्तापर्यंत आलेलं चांगलं लेखन सांभाळून ठेवण्याची सोय केलेली आहे. त्याच मार्गाने पुढे पावलं टाकून गेले काही दिवस आम्ही ऐसी अक्षरेचा लोगो वेगवेगळ्या दिवशी बदलता ठेवला. आता सुरुवात करत आहोत ते नवीन मुखपृष्ठाची....
ऐसी अक्षरेच्या लोगोवर टिचकी मारल्यास संस्थळाचे 'होमपेज' दिसेल. विविध चित्रकार, छायाचित्रकार आणि संस्थळाच्या कलादालनातून प्रताधिकारमुक्त चित्रे प्रदर्शित केली जातील. संगीत आणि इतर बहुमाध्यमी घटकांचादेखील यथोचित वापर मुखपृष्ठावरच्या इतर अवकाशात केला जाईल.
(आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे.)
---
वा माणिक वर्मा यांचे फार गोड गाणे मुखपृष्ठावर एम्बेड केले आहे. आत्ता ऐकते आहे. सुंदर!!!
"आणिले धागे तुझे तू मी ही माझे आणिले,
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरुन जा
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरुन जा"
________________
मुखपृष्ठावरती नेहमी एक गाणे असावे. फार सुंदर वाटते.