पाऽपसंस्कृती: अर्थात पॉप कल्चर
"हुडूत! केस पिकण्याचं काय एवढं? माझे कॉलेजातच पिकलेवते! पण पॉप कल्चरमधून बाहेर फेकले जाऊ आपण याची सगळ्यांत जास्त भीती वाटते..."
नुकत्याच तिशीत प्रवेश केलेल्या एका मैत्रिणीशी वाढदिवसानिमित्त थोड्या अवलोकनात्मक गप्पा चालू होत्या, त्यात व्यक्त झालेली ही भीती. मग ही भीती आपल्यालाही वाटते असं लक्षात आलं. मतं फुटण्याच्या सुरुवातीच्या काळात जे जे लोकप्रिय ते ते भिकार अशी शेखी मिरवण्यात मोठ्ठा आनंद सामावलेला असे. 'हॅरी पॉटर' हा त्या आनंदाला मिळालेला सर्वांत मोठा धक्का. हुच्चभ्रूपणे नाक मुरडून मी बाजूला टाकलेला हॅरी निव्वळ योगायोगानं वाचला, तोवर तिसरं पुस्तक बाजारात आलं होतं. ते इतकं आवडलं, की गुमान शिंगं मोडून पहिली दोन पुस्तकं मिळवली. मग मी थेटरात उत्कंठेनं डम्बलडोर नि व्होल्डरमॉटमधली मारामारी बघतेय नि मित्र शेजारी घोरतोय, इथवर जाणं आलंच. लोकांकडून नि माध्यमांकडून हिस्टेरिकली चघळलं जाण्याची प्रक्रिया कितीही कंटाळवाणी असली, तरी त्याच्या केंद्रस्थानी असलेली गोष्ट तितकी भिकार असेलच असं नाही, अशी खूणगाठ बांधली जाण्याची ती पहिली वेळ. मग ट्वेंटी ट्वेंटी - दा विंची कोड - बिग बॉस - चेतन भगत असे अनेक तानापलटे. कभी बाजी हुच्चभ्रूंच्या पारड्यात, कभी फडतुसांच्या पार्टीत.
'एवरीथिंग बॅड इज गुड फॉर यू' हे स्टीवन जॉन्सनचं पुस्तक वाचलं, तेव्हा एक वर्तुळ पुरं झालं. पठ्ठ्याचं म्हणणं अगदी पॉझिटिवपणाचा अर्क म्हणावं असं. विडिओगेम्स? सोशल नेटवर्क्स? इंटरनेट? टीव्ही? सगळंच म्हणे दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे. सर्वसामान्य प्रेक्षकाचा मेंदू अधिकाधिक कामाला लागतो आहे. नाकं मुरडणारे मुरडोत... सगळंच्या सगळं नाही पटलं त्याचं. (हो, म्हणजे फार्मव्हीलसारख्या खेळातून मिळवलेल्या दीर्घसूत्री योजनाकौशल्याचा प्रत्यक्ष जगण्यात नक्की कुठे वापर करणार आहोत आपण? उग्गाच आपलं कैच्याकै.) पण त्याच्या बोलण्यात थोडं तथ्य होतंच. लोकप्रिय आणि / किंवा भडक आणि / किंवा लोकानुनयी दिसणार्या गोष्टींमागे गुंतागुंतीची योजना असते, हे मला पटवण्याचं काम त्या पुस्तकानं चोख केलं. 'शेरलॉक'सारखी टीव्ही मालिका एका बघण्यात समजावी अशी नाहीच बनवलेली. तिच्यातले गुंते नि अंतःप्रवाह नि उपकथानकं कळायला तिची पारायणंच करायला हवीत. अशा प्रकारचे कार्यक्रम नि इंटरनेट-टॉरेण्ट-व्हीएलसी यांसारखं सहजोपलब्ध तंत्रज्ञान हे परस्परपूरक असतात, त्यांतून फॅनडम नावाचं एक समांतर जग आकाराला येतं हे पचवण्याचा टप्पा क्रमांक दोन.
तिसरा टप्पा 'एआयबी'चा. असं काहीतरी व्हायरल झालंय हे माझ्यापर्यंत पोचायलाच वेळ गेला. नि मी तशी इंटरनेट बर्यापैकी वापरणारी व्यक्ती. मला कळेस्तोवर तो व्हिडिओ यूट्यूबवरून अंतर्धानही पावला होता. मग तो व्हाया टॉरेण्ट मिळवून बघणं नि त्याबद्दल मत तयार करणं इतरांपेक्षा लांबणं आलंच.
या टप्प्यावर माझी मन:स्थिती द्विधा म्हणावी अशी आहे. आपल्या आवडीचा विषय हुडकून त्यात बुडी मारल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचं असं काहीही म्हणायच्या-करायच्या लायकीचे उरत नाही हे उमगणं समांतर चाललेलं. अशात आपल्याला आवडलेल्या फ्रेंच दिग्दर्शकाचे सिनेमे हुडकून बघायचे की 'प्रिटेन्शिअस मूव्ही रिव्यूज'वर लक्ष ठेवायचं? (मला कल्पना आहे, इथे काही जण माझ्याकडे दयार्द्र नजरेनं पाहताहेत. "सगळंच करायचं, मंद!" हे त्यावरचं त्यांचं उत्तर असणार आहे. पण सॉरी, जो इंटरनेटचा प्लॅन मला हे सगळं उपलब्ध करून देतो, त्याचं बिल फेडायसाठी मला रोज दहा तास पिदडून घेणार्या कॉर्पोरेटमधे किमान ३ रेटिंग मिळवणं क्रमप्राप्त आहे. वेळाची अडचणच आहे!) रोज बदलत्या जगाशी सांधा जुळवत राहण्यासाठी, स्मॉल टॉक्समधे बावळट न ठरण्यासाठी, तरुण नि आधुनिक राहण्यासाठी अमुक एका प्रमाणात पाऽपसंस्कृती आपलीशी करावी लागणार आहे नि अर्थपूर्ण काही करायचं असेल, तर त्याकडे पाठही फिरवावी लागणार आहे.
कदाचित या निवडीचं एकच एक अंतिम उत्तर नसेलही. पण तुम्हांला पडतो का हा पेच? मुळात पॉप कल्चरची व्याख्या काय करता तुम्ही? त्याचे आणि तरुण राहण्याचे लागेबांधे असतात, असं मानता का? का? कसं शोधता उत्तर? मला कुतूहल आहे...
वाह.. मस्तं विषय! असा प्रश्न
वाह.. मस्तं विषय! असा प्रश्न पडला होता. आधी उगाच कय गर्दीबरोबर वहावत जायचं असं म्हणून अनेक 'व्हायरल' गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर समजलं मजा येते तसले व्हीडो गाणी बघताना. पण त्यामागे मौज असाच फॅक्टर असतो. केवळ ग्रूपमध्ये चर्चेत भाग घेता यावा म्हणून रोडीज, बिग बॉस वगैरे सारखे, ज्यात अजिबात मजा येत नाही, असे अत्याचार नाही बघत.
< जड आवाज > हम जहां खडे होते
जड आवाज > हम जहां खडे होते है, पॉप कल्चर की लाईन वहींसे शुरु होती है / जड आवाज >
झंप्या.. चार लोक वागतात तसे वागावे, याऐवजी, चार लोकांना आपणच काहीतरी वागायला लावावे हे जास्त आवडते. आपण गबाळे राहून आजुबाजूला गबाळेपणाची फॅशन आणावी, ते पाहतात त्या सीरियल्सपेक्षा आपण ज्या सीरियल बघतो (हिस्टरी टीव्ही १८ वरचे मोडक्यातोडक्या सामानसुमानाचे असंख्य कार्यक्रम) त्या लोकांना बघायला भाग पाडण्याइतपत रसभरित वर्णन करावे इ इ.
..पॉन स्टार्स हा माझाही
..पॉन स्टार्स हा माझाही अत्यंत आवडता कार्यक्रम आहे.
बाप बेटा आजोबा (खडूसोत्तम) आणि चमली हे घरचेच झाल्यासारखे आहेत.
..कधी ला.वेगस ला गेलो तर यांच्या दुकानी नक्की जाईन.
.हा कार्यक्रम तुम्हालाही आवडतो याकरिता रोचक श्रेणी देऊन निरर्थक हटवण्याचा प्रयत्न केलाय.
आपले मनःपुर्वक धन्यवाद.
आपले मनःपुर्वक धन्यवाद.
श्रेणी प्रतिसादाची न्हवे तर प्रतिसादाला श्रेणी देणार्याची *** ठळक करतात की काय असे आता अलिकडे निरिक्षण होउ लागले आहे. सदस्यांना अतिशय मनःपुर्वक विनंती आहे की समोरचा काय बोलतोय हे समजुन घ्यावे समजले नसल्यास पुन्हा विचारावे वा समजायची कुवत नसल्यास "पास" म्हणावे पण श्रेणी दान सुविधेचा बिंडोक वापर वा अॅबुस करु नये. प्लिज प्लिज प्लिज. _/\__/\__/\_ हवं तर पाया पडतो मी तुमच्या आइच्या
>>> आपण गबाळे राहून आजुबाजूला
>>> आपण गबाळे राहून आजुबाजूला गबाळेपणाची फॅशन आणावी, ते पाहतात त्या सीरियल्सपेक्षा आपण ज्या सीरियल बघतो (हिस्टरी टीव्ही १८ वरचे मोडक्यातोडक्या सामानसुमानाचे असंख्य कार्यक्रम
यावरून हे आठवले. "होर्डर्स" सारखी सिरिज् (किंवा काही एपिसोड्स) पहाणं म्हणजे आपण प्रचंड गबाळे असलो तरी "यांच्यापेक्षा शतपटीने बरे" असं वाटून घेण्याचा अक्सीर इलाज.
अर्थात गमतीचा भाग वगळला तर "होर्डींग डिसॉर्डर" हा मानसिक आजार होय, हे आलंच.
आयला उत्तम चर्चा होऊ शकेल...
आयला उत्तम चर्चा होऊ शकेल... अशाच प्रकारचं काही माझ्याही मनात नेहेमीच येत असतं पण ते इतकं स्पष्ट मांडता आलं नसतं मला...
बळंच अवांतर (पण विचारगाडी थांबवता थोडीच येते ) -
हैरी पॉटरबद्दल एक किस्साच आहे, काय ते लहान पोरं वाचतात ते वाचायचं, त्यापेक्षा चांगलं काहीतरी वाचूया म्हणून एक भाग खरेदी करूनही बाजूला टाकला होता,
अशाच एका प्रवासात, कुठलंही पुस्तक हातात धरावंसं वाटूच नये अशी मनस्थिती होती, घरदार सोडून नवीन शहराशी झगडायला बाहेर पडलो होतो, अगदी मोजकं सामान बरोबर होतं त्यात चुकून हे पुस्तक आलं होतं, तिसराच भाग. तो वाचता वाचता इतका रमलो की आपल्याला घरदार नाही आणि आता रस्त्यावर झोपायची वेळ आहे हे पण चक्क विसरून गेलो. मग ते सगळं इतकं अपील झालं, कनेक्ट झालं की उरलेली पुस्तकं लगेच मिळवली. आणि दिवसभर वणवण करून झाली की संध्याकाळी परत हॉगवर्ट्झ मधे घुसायचं हा शिरस्ताच होता कित्येक दिवस. आधी रद्दीत घातलेल्या पुस्तकाचा सातवा भाग मी पहाते क्रॉसवर्ड पुढे रांगेत उभं राहून खरेदी केला होता. अजूनही ती सगळी पात्रे खूप ओळखीची वाटतात. आणि मुख्य म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधे एखादं पुस्तक इतकं सुदिंग वाटू शकतं, स्टेबल रहायला मदत करू शकतं हे नव्याने जाणवलं....
लेखातल्या भावनेशी सहमत.
लेखातल्या भावनेशी सहमत. नेहेमी हुच्चभ्रूच राहिलं पाहिजे किंवा ठराविक वर्तुळातल्या लोकांना आवडणार्या गोष्टीच आपल्यालाही आवडल्या पाहिजेत हे सांगितलंय कुणी? आमच्या एका जुन्या वर्तुळात असेच शिंगल माल्ट वाले जेडी आणि शिवासला शिव्या घालायचे. मी दोन्हीची चव घेतल्यावर मला जेडी आणि शिवास जास्त आवडल्या. मग मी त्यांना म्हटलं की तुमची शिंगल माल्ट घाला गर्दभश्रोणीत वगैरे.... सेम विथ हॅरी पॉटर. ७ही भाग किमान ७ वेळा वाचलेत. जे आवडतं ते आवडतं. लोकं तुम्हाला जज करतायत तर करोत बापडे. सरळ दुर्लक्ष करायचं असतं.
असा काही ठाम अल्गोरिदम नाही.
असा काही ठाम अल्गोरिदम नाही. सर्वभक्षी प्राण्याप्रमाणे जे वाटेल ते करत असतो. काही रुचते, काही गळते.
मात्र जे रुचते ते केवळ पॉप्युलर आहे म्हणून टाकत नाही किंवा जे गळते ते ही पॉप्युलर आहे म्हणून चघळायच्या फंदात पडत नाही.
बिग बॉस हा प्रकार मी बघतो. मला आवडतो. बिग बॉस आवडणे हे म्हटले तर पॉप्युलर कल्चर आणि म्हटले तर त्याला नावे ठेवणे हे सुद्धा! :)
तेव्हा मुळात बहुतांशवेळा आपण एखाद्या वर्तुळाच्या बाहेर फेकले जाऊ नी एकटे पडू ही भिती आहे निराधार आहे कारण कारण बाहेर झेलायला दुसरे एक वर्तुळ तयारच असते. :)
--
चर्चाविषय आवडला. नंतर भर घालेन.
आपल्याला जे आवडेल ते बघावे,
आपल्याला जे आवडेल ते बघावे, वाचावे, ऐकावे, अनुभवावे. ते अपमार्केट आहे का नाही, पॉप्युलर आहे का नाही ह्याचा विचार करुन नये. आजुबाजुला काय नविन चाललय त्यावर नजर ठेवुन ट्राय तर करावाच.
त्याच बरोबर, लोकांच्या आवडीनिवडीला पण तुच्छ लेखू नये आणि आपल्या अभिरुची बद्दल कसलाच गंड बाळगू नये.
अवांतर - अनुभव
माझा स्क्रीन श्रेणी देताना अकारण रिफ्रेश होतो. अगदी ती गैरसोय सोसून मार्मिक श्रेणी देण्यात आली आहे.
आजुबाजुला काय नविन चाललय त्यावर नजर ठेवुन ट्राय तर करावाच.
इस्लाम बद्दल सहानुभूतीने विचार करणे प्लीज प्रयोग म्हणून तरी ट्राय करा. तुमची टोकाची मतं पाहता आणि आजुबाजुची सौम्य मतं पाहता हे सजेस्ट करावं वाटलं. यात मनोरंजन किंवा लिटररी काही नाही पण आपण म्हणता तसा "अनुभव" अवश्य आहे.
त्याच बरोबर, लोकांच्या
त्याच बरोबर, लोकांच्या आवडीनिवडीला पण तुच्छ लेखू नये आणि आपल्या अभिरुची बद्दल कसलाच गंड बाळगू नये.
हे खरय पण लाज वाटतेच. उदा - "पिकल्या पानाचा देठ" किंवा "या रावजी बसा भाऊजी*" अशा लावण्या मला आवडतात but not without ridiculing my taste :(.
* इथे हेदेखील सांगते - त्या लावणीतील "भाऊजी" हा शब्द अज्जिबात आवडत नाही कारण ते नाते एकदम नॉन-सेक्श्युअल वगैरे आहे, त्या लावणीत ते फिट बसत नाही असे मला वाटते.
नीट लिहीता येत नाहीये पण भावनाओंको समझो.
बरेच लोक हातासरशी हुच्चभ्रू
बरेच लोक हातासरशी हुच्चभ्रू लोकांना झोडून घेताहेत, थोडं स्पष्ट करते. ते हुच्चभ्रू-सामान्य काय असायचं ते असोच. थोडे टोक काढलेले प्रश्न असे -
- पॉप कल्चरमध्ये तुम्ही कशाकशाचा समावेश करता? टीव्ही? सिनेमे? इंटरनेट? पुस्तकं?
- मराठी की इंग्रजी की दोन्ही? देशी की विदेशी की दोन्ही?
- का?
- पॉप कल्चरशी परिचित असणं म्हणजे भोवतालाचं भान असणं असं तुम्ही मानता का?
- पॉप कल्चरशी धागा उरला नाही, म्हणजे माणूस म्हातारा असं वाटतं का?
- साडेसातच्या मराठी बातम्या एकेकाळी पॉपकल्चरचा भाग असायचा ('सुंदर' निवेदिका, तिच्या चेहर्यावर बसू पाहणारी 'लागट' माशी (शी! काय शिळवट जोक आहे हा.) इत्यादी.). तो नक्की कधी गायब झाला?
- आणि अमुक एक गोष्ट पॉप कल्चरचा भाग आहे की हुच्चभ्रू आहे, हे तुम्ही नक्की कसं डिफाईन करता?
- पॉप कल्चरमध्ये तुम्ही
- पॉप कल्चरमध्ये तुम्ही कशाकशाचा समावेश करता? टीव्ही? सिनेमे? इंटरनेट? पुस्तकं?
हो ह्या सगळ्याचाच
- मराठी की इंग्रजी की दोन्ही? देशी की विदेशी की दोन्ही?
आजुबाजुच्या लोकांचा, भाषा आणि प्रांत्/देश फरक पडत नाही.
- पॉप कल्चरशी परिचित असणं म्हणजे भोवतालाचं भान असणं असं तुम्ही मानता का?
हो माहीती पाहीजेच, पण अॅटॅच झाले पाहीजे ही गरज नाही.
- पॉप कल्चरशी धागा उरला नाही, म्हणजे माणूस म्हातारा असं वाटतं का?
त्यापेक्षा फाल्तू जोक्स ना हसणे बंद झाले, बीन सारख्या ( प्रत्येकाची आवड वेगळी ) कॅरेक्टरच्या सीरीयल, सिनेमा बघावेसे वाटणे, गाणी गाणे ( कोणतीही ) बंद झाले आणि हो मुख्य म्हणजे सेक्स ची ओढ कमी झाली की म्हातारपण आले.
- साडेसातच्या मराठी बातम्या एकेकाळी पॉपकल्चरचा भाग असायचा ('सुंदर' निवेदिका, तिच्या चेहर्यावर बसू पाहणारी 'लागट' माशी (शी! काय शिळवट जोक आहे हा.) इत्यादी.). तो नक्की कधी गायब झाला?
तो एका फार छोट्या पॉप कल्चरचा भाग होता. भारतात हाच प्रॉब्लेम आहे. एकाच वेळी सर्व ( म्हणजे ७०-८० टक्के तरी )लोक सामिल आहेत असे कधी नसतेच. इतके भाग्-विभाग समाजात आहेत आणि प्रत्येकाचे पॉप कल्चर वेगळे आहे.
- आणि अमुक एक गोष्ट पॉप कल्चरचा भाग आहे की हुच्चभ्रू आहे, हे तुम्ही नक्की कसं डिफाईन करता?
असले काही डीफाईन करण्याच्या फंदात पडत नाही.
अगदी जवळचे, घट्ट, चड्डीदोस्त
अगदी जवळचे, घट्ट, चड्डीदोस्त म्हणावेत असे आम्ही सहा मित्र आहोत. आम्ही (शक्य तितक्या) नेहेमी भेटतो, दारूबिरू पितो, वत्सअॅपवरून २४ तास भंकस करतो (काही जण आम्रविकेत असल्यामुळे).
प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यवसायात आहे, आणि त्यांची व्यवसायेतर आवडनिवडही वेगवेगळी आहे. उदा. एक जण सर्पमित्र आहे (तोच तो मिपावर लेख लिहिणारा), एक उत्तम तबलजी आहे, एकाला "भरपूर पैसे मिळवणे" हा छंद आहे, एकजण कविता पाडतो करतो, एकाला क्रिकेटचं भयानक वेड आहे, वगैरे.
एकत्र गप्पा झोडताना आपोआपच एकमेकांचे व्यवसाय आणि वैयक्तिक आवडीनिवडी (हाच का तो हुच्चभ्रूपणा?) बाजूला राहून विषयांचा लसावि काढला जातो. तेच ते पॉप कल्चर.
त्यामुळे मला (किंवा सातापैकी कोणालाही) पॉप कल्चरच्या मधोमध रहाण्यासाठी विशेष श्रम करावे लागत नाहीत. ते बाकी सहांमुळे आपोआप येऊन आदळतंच. उरलेल्या वेळात साप पकडणारा साप पकडतो, पुस्तकं वाचणारा पुस्तकं वाचतो, क्रिकेटवाला क्रिकइन्फोची आकडेवारी एक्सेलशिटात काढून उलटेसुलटे ग्राफ बनवत बसतो. आता याला हुच्चभ्रूपणा म्हणायचं का वैयक्तिक आवडीनिवडी हा अर्थातच आपापला प्रश्न.
आता कृपया मला हसू नकात, पण
आता कृपया मला हसू नकात, पण पॉप कल्चर हे उच्चभ्रू नसतं हे मला आजच कळलं. पॉप हा शब्द मी पॉप म्यूझिक याच अर्थाने हमेशा ऐकला आहे. ते जनरली इंग्रजी असतं आणि कळत नाही. हाय फाय मुले ते ऐकत असतात, इ इ.
-------------------
कॉलेजमधे किंवा नोकरीच्या सुरुवातीच्या काळात शकीरा, जेलो नि ब्रिटनीची अनुक्रमे whenever wherever, if you has my love, hit me baby ही गाणी मला प्रचंड आवडत. मी तेवढाच ओरिजनल पॉप आहे असे मी (आजपर्यंत) माने. बाकी ३०-४० भारतीय गाणी असलेले फोल्डर पॉप म्यूझिक नावाने का आहे तर ती गाणी सिनेमात नाहीत. असो असो. गोंधळ आहे.
ह्म्म ... इंग्रजी गाणी पूर्वी
ह्म्म ... इंग्रजी गाणी पूर्वी आवडत नसत पण मराठी व हिंदी गाण्यांची आवड होती मग अमेरीकेत आल्यावरती, बळजबरीने साईटींवरुन उत्तम इंग्रजी गाणी शोधून शोधून आवड निर्माण केली. अजुनही कंट्री साँग सोडता अन्य गाण्यांची आवड सुजवटच आहे. पण कंट्री साँग्स मात्र फार आवडतात -
जोलेन - https://www.youtube.com/watch?v=qGEubdH8m0s
असो वा
पिनॅकोलाडा - https://www.youtube.com/watch?v=Eyaf1yMHx54 (मला वाटतं याचं जॉनर कंट्री साँग आहे पण खात्री नाही.) फार आवडतं गाणं आहे हे.
डेव्हिल वेन्ट टू जॉर्जिआ - https://www.youtube.com/watch?v=K6RUg-NkjY4 - हेदेखील खासच खास :)
___
धागा आवडलेला आहे.
गमतीशीर
मनातला एक गमतीशीर विचार :
अजून काय चाळीसेक वर्षं शिल्लक आहेत जास्तीत जास्त. त्यातली तीसच बहुदा फॅकल्टीज् व्यवस्थित चालणारी असणार. म्हणजे सुमारे १० हजार दिवस. किती पुस्तकं वाचू या १० हजार दिवसांत ? किती सिनेमे पाहू? अगदी पहायचेच ठरवले तर सुमारे तीनेक हजार सिनेमे येतील पहाता. पुस्तकांचं बोलायचं तर बहुदा दिवसांच्या ऐवजी आठवड्यांच्या संख्येत मोजलेलं बरं. फार फार तर १५६० आठवडे. त्यात किती पुस्तकं होतील वाचून?
हे इथे आठवायचं कारण म्हणजे पॉप-कल्चर आदि गोष्टींबरोबरच आपण क्लासिक्स आणि मॉडर्न काळातल्या साहित्याशीही नाळ जोडू पहात असतो. सिनेमाच्या बाबत सगळा मामलाच सुमारे १०० वर्षांचा असल्याने इथे मॉडर्न-क्लासिक्स अशी भानगड नसून जुनं-नवं-मधलं असं काहीसं असू शकतं. तर मुद्दा असा की, पॉपकल्चरमधे काय घडतंय नि काय नवं येतंय याबरोबरच "काय वाचायला/पहायला मिळणं महत्त्वाचं आहे" हे प्रश्नही येतातच.
तर एकंदर लोक तीशीपर्यंत पॉपकल्चरशी कदाचित जास्त जोडलेले असतात; त्यांचा रस त्यात असू शकतो आणि तीशी येऊन गेली की दृष्टी क्लासिक्स-मॉडर्न-सबस्टँशिअल गोष्टींकडे अधिक वळते असं काहीसं मला ढोबळपणे वाटतं.
गगन मुठी सुवावे, मशकें केवी?
म्हणजे सुमारे १० हजार दिवस. किती पुस्तकं वाचू या १० हजार दिवसांत ? किती सिनेमे पाहू? अगदी पहायचेच ठरवले तर सुमारे तीनेक हजार सिनेमे येतील पहाता. पुस्तकांचं बोलायचं तर बहुदा दिवसांच्या ऐवजी आठवड्यांच्या संख्येत मोजलेलं बरं. फार फार तर १५६० आठवडे. त्यात किती पुस्तकं होतील वाचून?
हा लेख आठवला -
http://www.npr.org/blogs/monkeysee/2011/04/21/135508305/the-sad-beautif…
सविनय
साधारण अर्थ - चिलटाने आभाळ कवेत घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे.
संदर्भ - ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय. 'हे काम हाती घेण्यास मी सर्वथा अपात्र आहे, पण केवळ गुरूकृपेमुळे हे धाडस करतो आहे', अशी किंचित अपोलोजेटिक सुरूवात बर्याच जुन्या ग्रंथांच्या सुरूवातीला दिसून येते - त्यातलाच हा प्रकार. (बोरकरांनीही 'महात्मायन' लिहिताना अशाच धर्तीवर ज्ञानेश्वरांना साकडं घातलं आहे.)
पॉप वि. क्लासिकल (संगीत)
पॉप वि. (विशेषतः पाश्चिमात्य) क्लासिकल संगीतात बेसिक फरक आहेत. त्यातले काही मुख्य फरक
१. इंस्ट्रूमेंट्स : इलेक्ट्रीकल वि. अकॉस्टिक: पॉप्युलर संगीतात इलेक्ट्रीकल इंस्ट्रूमेंट्स वापरतात तर क्लासिकलमध्ये अकॉस्टिक.
२. लिरीक्स वि. नो लिरीक्स: सहसा क्लासिकलमध्ये संगीताला जास्त महत्त्व असतं तर पॉप्युलर मध्ये लिरीक्सला.
३. बीट- स्ट्राँग वि. सब्ड्यूड: पॉप्युलर संगीतातला बीट हा ठळक असतो. क्लासिकल मध्ये मात्र तो सबड्युड असतो. (नवख्यांना तर तो लवकर सापडतही नाही.)
४. प्रिस्क्रीप्टीव्ह: क्लासिकल संगीत हे ठराविक नोटेशनवर परफॉर्म केलं जातं. पॉप्युलर संगीताचं तसं नसतं.(एखाद्या पॉप्युलर गाण्याची वेगवेगळी व्हर्जन्स तुम्ही ऐकली असतीलच.)
साधारणपणे कोणतंही क्लासिकल संगीत हे शिकावं लागतं (पॉप्युलर संगीत शिकावचं लागतं असं नाही) आणि म्हणूनच त्याला उच्चभ्रु समजलं जात असावं.
लेखातील मुळ मुद्द्याबाबतः
अनेकदा पॉप्युलर ते वाईट असा लोकांचा ग्रह दिसतो त्याच वेळी पॉप्युलर म्हणजे अगदीच वाईट हे वास्तवही दिसते (उदा. रिअॅलिटी शोज). वैयक्तिकरित्या, ज्यातून व्हॅल्यू अॅडिशन होत नाही अशा गोष्टीत वेळ न घालवणे मी श्रेयस्कर समजतो, मग ते पॉप असो नाहीतर नसो.
इंटरेश्टिंग
पॉप कल्चर म्हणजे नक्की काय ते माहिती नाही- आवडेल ते बघत/वाचत जातो..
पण जनरली असा काही नियम बनवून जगतो कुठे आपण? हिमेश आवडला तर बिन्धास सांगावं- एखाद्या तद्दन "बाजारू" वगैरे क्याटेगरीतली गोष्ट सॉलिड वाटली तर कबूल करून टाकावं. मग स्वतःला टेन्शन नाही!
एखादी गोष्ट केवळ पॉप कल्चर ह्या अदृश्य कप्प्यात आहे म्हणून तिला नावं ठेवायची ह्यात काही मजा नाही.
-----
पण पॉप कल्चर म्हणजे नक्की काय? विशेषतः भारतीय परिघात?
व्यक्तिगत व्याख्या
कल्चरमधील गोष्टींची चार खान्यात विभागणी करता येते.
पुस्तक/सिनेमा/चित्र | मला आवडते | मला आवडत नाही |
थोड्याच अन्य लोकांना आवडते | अभिजात/क्लासिक/चोखंदळ लोकांना आवडणारी | हुच्चभ्रू/नकली/नुसता सोस/दांभिक लोकांची आवड |
खूप अन्य लोकांना आवडते | पॉप कल्चर | सवंग/आंबटशोकी/लोवेस्ट कॉमन डिनॉमिनेटर |
समर्पक, परंतू
धनंजयचे टेबल वर्गीकरण करताना (जनरली*) समर्पक आहे. पण लेखिकेच्या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर देत नाही असे वाटते.
एखादी आधी सवंग/हुच्चभ्रु वाटलेली गोष्ट अनुभवल्यानंतर (आवडल्याने) अनुक्रमे पॉप्/अभिजात या चौकटीत येऊन राहते हे खरे. पण ती सवंग/हुच्चभ्रु गोष्ट अनुभवावी का नाही याविषयीची तुमची निर्णयप्रकीया काय आहे हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
याचं एक थोडंसं स्पेसिफिक उदाहरण म्हणजे वॅन गॉह् चे 'स्टारी नाईट' हे चित्र. (या विषयी इथल्या काही लोकांशी पुर्वीही चर्चा झालेली आहे.)
स्टारी नाईट हे चित्र 'पॉप्युलर' आहे. माझ्या मते त्याच्या इतर चित्रांपेक्षा यात काही विशेष आहे असे मला वाटत नाही (उजवीकडचा कॉलम) त्यामुळे ज्यांना ते आवडते ते लोक एकतर थोडेसे दांभिक(पहिली ओळ) किंवा त्यांना चित्रकलेबद्दल फारसं कळत नसावं(दुसरी ओळ) असा दावा मी करू शकतो. पण हे चित्र लोकांना का आवडतं (म्हणजे तो अनुभव) हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. पण त्याच वेळी मला इतर दांभिक्/सवंग वाटणार्या गोष्टींबाबत अनुभव घेण्यास मी उत्सुक आहेच असे नाही.
ज्यांना स्टारी नाईट माहित नाही त्यांकरता हे चित्र.
------------------
.
.
.
त्यातल्या त्यात मला आवडलेला अनुभव नील डग्रास टायसनचा इथे. (४-५ मिनीटांपासून पुढे)
--------------------
.
.
*वैयक्तिकरीत्या ते खरे आहे हे मी कबूल करणार नाही हा भाग अलाहिदा.
तो प्रतिसाद अर्धा गंभीर, अर्धा खेळकर होता
तो प्रतिसाद अर्धा गंभीर, अर्धा खेळकर होता. भूतकाळात नोंदवलेल्या आवडीनिवडीवर सील लावणार्या, कुतूहल नसणार्या व्यक्तीचा तो तक्ता होता.
मूळ धाग्याचा रोख थोडा वेगळा आहे. कुतूहलाबद्दल आहे, आणि नेमका तोच मुद्दा मी माझ्या तक्त्यात दिलेला नाही.
कुतूहल वाटण्याकरिता जगात अगणित वस्तू आहेत, मात्र आपल्या आयुष्यात वेळ मर्यादित आहे. आणि ही कदाचित आवडू शकेल किंवा नावडू शकेल अशा गोष्टींमध्ये खर्च करता यावा, असा फावला वेळ अगदीच कमी. त्यामुळे आपण बहुधा काहीतरी पूर्वहिशोब करून वेळेचा व्ययसंकल्प (स्पेंडिंग बजेट) तयार करतो. पुनर्मूल्यमापनाकरिता (१) आपण आपल्या समविचारी समस्तरीय लोकांच्या आणि (२) आपल्या ध्येयभूत लोकांच्या आवडीनिवडीचा आसरा घेतो.
समविचारी म्हणजे बर्याच बाबतीत समविचारी - त्यांच्या आवडीनिवडी आपल्याशी खूप बाबतीत जुळतात, म्हणून आपण जिथे जुळत नाहीत तिथे पुनर्मूल्यमापन करू लागतो. परंतु या बाबतीत आपण आपल्याला हे आवडलेच पाहिजे, असा बळजबरीचा प्रयत्न करत नाही. कारण हे लोक समस्तरीय असतात. त्यांच्या आवडी निवडीला आपण अवसर देतो, पण शिकण्याकरिता कित्ता म्हणून वापरत नाही.
आपल्या ध्येयभूत लोकांचे थोडे वेगळे असते. या लोकांपाशी आपल्याला हवेहवेसे, पण सध्या आपल्यापाशी नसलेले गुण असतात. हे हवेहवेसे गुण आणि त्यांच्या आवडीनिवडींचा काही संबंध असावा असा आपला आंतरिक कयास असतो. त्यामुळे क्वचित आपण त्यांच्या आवडीनिवडी मुद्दामून प्रयत्न करून अनुभवायचा प्रयत्न करतो.
पण "कुतूहल" आणि "प्रयत्न" हे रकाने तक्यात घातले, तर तक्ता तितका मजेदार राहात नाही. तरी असा हा तक्ता :
पुस्तक/सिनेमा/चित्र | मला आवडते | मला आवड-नावड काहीच वाटत नाही | मला आवडत नाही |
थोड्याच समवयस्क समविचारी लोकांना आवडते | "कल्ट क्लासिक" | असेल बुवा "कल्ट क्लासिक", कुतूहल/चाचणी योग्य | "का बरे" हे कुतूहल, चाचणी घेतली जाते |
थोड्याच समवयस्क समविचारी लोकांना आवडत नाही | "गिल्टी प्लेझर", पण फारशी लाज नाही | काही विशेष वाटत नाही, नावड सांगण्याकडे झुकणे | "बहुसंख्यांना आमचा खास दृष्टिकोन नाही, छ्या" |
--- | --- | --- | --- |
थोड्याच ध्येयभूत लोकांना आवडते | अभिमानास्पद आवड | खूप आवडावे असा विशेष प्रयत्न | विशेष प्रयत्न, प्रयत्न करताना क्वचित आवडल्याचे ढोंग (गिल्टी डिस्टेय्स्ट) |
थोड्याच ध्येयभूत लोकांना आवडत नाही | "गिल्टी प्लेझर", पण थोडी लाजही वाटते | नावडण्यासारखे काय ते सापडावे असा किंचित प्रयत्न | "बहुसंख्यांना उदात्त/ध्येयाचा दृष्टिकोन नाही, छ्या" |
--- | --- | --- | --- |
थोड्याच, आत्मीयता नसलेल्या अन्य लोकांना आवडते | अभिजात/क्लासिक/चोखंदळ लोकांना आवडणारी | अभिजात पण तोचतोचपणा असलेली (उदा. शेकडो ग्रीक सौष्ठव्य-पुतळे, शंभर बघून झाल्यावर एकशे एकावे रेनेसान्स तैलचित्र) | हुच्चभ्रू/नकली/नुसता सोस/दांभिक लोकांची आवड |
आत्मीयता नसलेल्या खूप अन्य लोकांना आवडते | भन्नाट पॉप कल्चर | पॉप कल्चर (कुतूहल म्हणून पुन्हा चाचणी घेण्यालायक) | सवंग/आंबटशोकी/लोवेस्ट कॉमन डिनॉमिनेटर |
टीव्हीवरील गुन्हा-अन्वेषणपट
टीव्हीवरील वरेच गुन्हा-अन्वेषणपट आणि मालिका बघतो. याला आवडतात म्हणून. पण एखाददोन मलाही आवडतात, उदाहरणार्थ बोन्स.
अभिवाचन केलेल्या गुन्हा-अन्वेषण वाथ्रिलर कादंबर्या स्वतःहून विकत आणून वाचतो.
हॅरी पॉटर मालिका वाचलेली आहे. परंतु साडेतिसर्या भागानंतर अर्धवट नावडून.
आता कसं! (गुन्हा-अन्वेषणपट हे
आता कसं! (गुन्हा-अन्वेषणपट हे नावही आवडलं आहे बर्का.)
पॉपकल्चरशी संबंध राहण्याच्या दृष्टीनं जोडीदार वा किमान जवळचे मित्र असणं मोठंच फायद्याचं ठरतं असं दिसतं.
मी माझ्या काही मित्रांना 'शरलॉक' अक्षरशः गळ्यात पडून विकली आहे, तसेच मित्र गळ्यात पडल्यामुळे 'हौ आय मेट युअर मदर'चे पहिले काही भाग बळंच, आग्रहाखातर पाहिले आहेत (नाही बॉ आवडली आपल्याला.). 'दी अंग्रेज' नामक अत्याचार माझ्या माथी मारण्याचा प्रयत्न काही मित्रांनी केला होता, त्यालाही सोशीकपणे (आणि यशस्वीपणे! अद्यापही मला त्या झेंगटात काय घडत होतं विचाराल, तर धड आठवायचं नाही.) तोंड दिलं आहे. कोक स्टुडिओमधली वेड लावणारी गाणीही याच मित्रद्वयातर्फे मिळाल्याचं नोंदलं पाहिजे. एरवी टीव्हीपासून फारकत घेतलेल्या मला ही गाणी मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती.
यु जस्ट टच्ड माय हार्ट... इज योर अकाउंट हॅक्ड ओर समथिंग ?
एनीवे...
मुद्याचे उदाहरण घ्यायचे तर हॅरी पॉटर जेंव्हा संपले होते (शेव्टचे पुस्तक रिलीज) तेंव्हा आयुष्यात एक प्रचंड पोकळी तयार झाली असे वाटले होते. तोच अनुभव प्रिजन बेक संपल्यावर आणी आयुष्यात अनेकदा विवीध गोष्टींबाबत बाबतीत अनेक प्रकारे घेतला... घेत राहीन. आय लिव पॉप कल्चर थोरोली... पण हे खरे आहे जेके आर शेक्सपिअर पेक्षा प्रभावशाली लेखिका आहे वाद घालत ते पटवुन द्यायचो हे आठवताना आता लक्षात येते की आता पुन्हा हॅरी पॉटर वाचवणार नाही...पुन्हा फास्टरफेणे साठी डोके पुस्तकात खुपसलेले असणार नाही अन शेक्सपिअर तर आत्ता कुठे उमजु लागलाय... वा... हे घडणारच होते कधी तरी अर्थपुर्णतेकडे वळणे भागच होते पॉपकल्चर ही झिंग आहे म्हणून ती आज ना उद्या उतरणार आहे आणी त्यावेळी निर्माण होणारी पोकळी भरुन काढायला अर्थपुर्णतेकडे वाटचाल हा एकमे मार्ग उरतो.. अन मी तयार आहे... मी ठरवुन जगलो नाही की हेच वाचावे असे रहावे... बस जे जे आनंद देते त्यात गुंतत राहीलो... समजा मिपावरुन ऐसीवर मन रमु लागले तर कंप्लेंट थोडीच करायची असते... ? बस जे आनंद देते त्यात गुंतत रहायचे :)
मुळात पॉप कल्चरची व्याख्या
मुळात पॉप कल्चरची व्याख्या काय करता तुम्ही?
मी अशी काही व्याख्या करत नाही. जे आवडतं ते पाहाते.
त्याचे आणि तरुण राहण्याचे लागेबांधे असतात, असं मानता का? का? कसं शोधता उत्तर? मला कुतूहल आहे...
असतात, असं माझं मत आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार माझ्या आजूबाजूला नेहमीच यंग क्राऊड असतो आणि त्यामानाने हे पॉपुलर कल्चर फॉलो करणारे माझ्या सहकार्यांत तर कुणी आढळलं नाहीय. काल कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये कोक स्टुडिओचे दोन बँडस आले होते, ती गाणी मला आणि नुकत्याच रूजू झालेल्या एका सहकार्याला माहित होती, बाकी लोक काय चाललंय हे असा चेहरा करून बसले होते. फेसबुकवरती अथवा इतरत्र मला ब्रेकिंग बॅस, गेम ऑफ थ्रोन्स माहित आहे हे समजल्यावर खूप कूल पॉईंट्स मिळतात. मी ए आय बी रोस्ट पाहिलं आहे म्हटल्यावर "मॅम, तुम्ही सुद्धा?" असं म्हणून लगेच भुवया उंचावतात. आम्हाला गप्पांसाठी आणखीही विषय असल्याने मजा येते..
पॉप कल्चरच्या
पॉप कल्चरच्या अभ्यासासंदर्भातला आणखी एक महत्त्वाचा मानला गेलेला संदर्भ :
बरेचदा एखाद्या धाग्यावरही
बरेचदा एखाद्या धाग्यावरही पाहीले आहे कोणी "इन्फ्लुएन्शिअल = अॅग्रेसिव्ह" व्यक्ती पहीला प्रतिसाद "फालतू/बकवास" टाईप देते अन मग त्या लेखाला नावं ठेवण्याची जी रांग लागते ती पहाता मज्जा येते ;)
क्वचित धाग्याच्या प्रतिक्रियांचा टोन पहील्या प्रतिक्रियेने सेट केला जातो का काय अशी शंका येते. नसेलही. पण आपली शंका हो.
हमभी पापी.
- पॉप कल्चरमध्ये तुम्ही कशाकशाचा समावेश करता? टीव्ही? सिनेमे? इंटरनेट? पुस्तके?
अर्थातच यात सगळेच येते पण काही वाचताना किंवा कशाचा अनुभव घेताना तो अनुभव आवडला आणि त्यातून स्वतःला काही मिळाले तर मग ते पॉप आहे की नाही याचा फार विचार करत बसत नाही. एखाद्या लोकप्रिय आणि बहुचर्चित गोष्टीचा अनुभव घेण्याआधी त्याची शिफारस कोणाकडून आली आहे याचा विचार मात्र जरूर करते कारण वेळेचा अपव्यय आणि संभाव्य मनस्ताप टाळण्याचा तो खात्रीशीर उपाय वाटतो. अजून एक चाळणी म्हणजे 'काळाची' असते, जे शंभर (उदाहरणार्थ) वर्षांपूर्वी लोकप्रिय होतं आणि अजूनही राहिलं आहे ते अगदी टाकावू असण्याची शक्यता कमी असते पण जे आत्ताचं लोकप्रिय आहे त्याबद्दल स्वतःला अशी खात्री असते. थोडक्यात म्हणजे लेबलांच्या मागे जाण्याऐवजी आपला वेळ सत्कारणी (पूर्णतः स्वतःच्या निकषांवर) लागावा असा विचार असतो.
- पॉप कल्चरशी परिचित असणं म्हणजे भोवतालाचं भान असणं असं तुम्ही मानता का?
हे थोडंसं खरं आहे कारण आपल्या आजूबाजूच्या बहुसंख्यांना काय आवडतं यावरून आपल्या समाजाच्या एकूण धारणा काय आहेत याचा तर्क बांधता येत असावा आणि प्रत्येकाला त्याचं भान असावं असं मला वाटतं. "मी माझ्या वर्तुळात खूष" यातून हे भान तुटण्याचा धोका असतो. त्यामुळे ज्यांच्याशी आवडीनिवडी शक्यतो जुळत नाहीत त्यांनाही काय आवडतं आणि का याचा अगदी अभ्यास नाही तरी जुजबी माहिती ठेवते. भारतात सास-बहू सिरियल्स, यूकेत ग्रेट ब्रिटीश बेक ऑफ आणि अमेरिकेत बिग बॅंग थिअरी हे कार्यक्रम पॉप्युलर का होतात याचा विचार जरूर करते पण त्यासाठी ते सगळं पूर्ण पाहिलंच पाहिजे असंच काही नाही,एखादा तुकडा पाहूनही अंदाज येतोच.
- पॉप कल्चरशी धागा उरला नाही, म्हणजे माणूस म्हातारा असं वाटतं का?
असं काही नाही पण एका अर्थाने आपल्या धारणा पक्क्या झाल्यात याचे निदर्शक असावे, जे चांगले की वाईट याबद्दल बोलत नाही.
अमुक एक गोष्ट पॉप कल्चरचा भाग आहे की हुच्चभ्रू आहे, हे तुम्ही नक्की कसं डिफाईन करता?
सर्वसाधारणापणे शिफारसी कोणाकडून येतात त्यावरून करते पण त्याआधारे ते आपल्याला आवडलंच किंवा नावडलंच पाहिजे अशी काही स्वतःवर बळजबरी करून घेत नाही. एखादी गोष्ट जड वाटल्याने फारशी आवडत नसल्यास मात्र शक्य तेवढा प्रयत्नपूर्वक वेळ देऊन समजावून घेण्याचा प्रयास करते. मला समजत नाही म्हणून भिकार आहे असे म्हणणे टाळते कारण त्यातून स्वतःचेच अज्ञान सिद्ध होण्याचा धोका असतो :-) पण झेपले नाही तरी खोटी स्तुती करत नाही.
फार (बॉ) संतुलित प्रतिसाद.
फार (बॉ) संतुलित प्रतिसाद. ;-)
बर्याच गोष्टी मान्यच आहेत. पण मला कधीकधी माझा वेळ सत्कारणी नाही लागला, तरी चालतो. किंबहुना शनिवार सकाळ ही बर्याच वेळा कुकारणी लागण्यासाठी - काहीही न करता घरंगळण्यासाठीच - असते. तेव्हा मनाला येईल ते पाहावं, वाचावं, किंवा काहीही न करता चक्क लोळावं, फोनवरून आळसावत पारोश्या गप्पा ठोकाव्यात... असलं काहीतरी केलं जातं. आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, असल्या शनिवार-सकाळ उपक्रमांमधूनच दीर्घजीवी काहीतरी हाती लागल्याचा अनुभव आहे.
खाचाखोचा आणि पेच
'जे उच्चभ्रू तेच सकस' असं आज जर कुणी म्हणत असेल, तर तो माणूस कालबाह्य झालेला असण्याची शक्यता फारच मोठी असेल. साधारण १९६०च्या दशकात हळूहळू पाश्चात्य समाजातल्या बुद्धिवंतांचा 'पॉप कल्चर'कडे बघण्याचा तुच्छतावादी दृष्टिकोन बदलत गेला आणि 'पॉप'ला पूर्वी नसलेली प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्याचा परिणाम म्हणून इतिहास, समाजशास्त्र वगैरे मानव्य ज्ञानशाखांतही (ह्युमॅनिटीज) खूप बदल झाले. हे बदल माहीत असूनही त्यांना छेद देणारे काही खरेखुरे बुद्धिवान लोक पाहिले आहेत, पण अन्यथा असा उच्चभ्रूपणा विशुद्ध अज्ञानातून किंवा कमी वकुबातून आलेलाच पुष्कळदा दिसतो. मात्र, ह्याउलट एक वेगळा प्रकारही दिसतो आणि तो नजरेआड करून चालणार नाही. 'पॉप कल्चर'ला प्रतिष्ठा आली म्हणजे उच्चभ्रू कलेचं सिंहासन त्यानं बळकावलं असं झालं नाही. उदा. लिक्टेन्श्टाईनचा कॉमिक्सचा वापर आणि प्रत्यक्ष कॉमिक्स म्हणजे एकच असं समजून चालत नाही.
"There's high art and there's low art. And then there's high art that can take low art, bring it into a high art context, appropriate it and elevate it into something else." हे कलाविश्वातलं वास्तव विसरून चालणार नाही.
'पॉप'ला मिळालेल्या ह्या प्रतिष्ठेमागे आणखीही काही कलाबाह्य कारणं होती - जगात अमेरिकेच्या राजकीय स्थानात झालेली चढण आणि कलेचं बाजारीकरण / कॉर्पोरेटीकरण. ह्या सत्ताविचाराच्या संदर्भचौकटींत अडकून आजही पुष्कळदा लोक 'पॉप कल्चर' म्हणून पटकन अमेरिकन संस्कृतीतल्या गोष्टींची उदाहरणं घेतात. पण हे बाजूला सारलं, तर 'आपलं' पॉप हे काहींसाठी अमिताभ, गोविंदा, सलमान, शाहरुख इ. असतं, काहींसाठी 'क्यूं की सास भी...' आणि कपिल शर्मा असतं, काहींसाठी 'होणार सून मी...' तर काहींसाठी पु.लं, सु.शि., कुसुमाग्रज आणि नेमाडे असतं हे विसरून गेलं तर फार गोंधळ होईल.
>> रोज बदलत्या जगाशी सांधा जुळवत राहण्यासाठी, स्मॉल टॉक्समधे बावळट न ठरण्यासाठी, तरुण नि आधुनिक राहण्यासाठी अमुक एका प्रमाणात पाऽपसंस्कृती आपलीशी करावी लागणार आहे नि अर्थपूर्ण काही करायचं असेल, तर त्याकडे पाठही फिरवावी लागणार आहे.
ह्या कारणासाठी पॉप कल्चर आपलंसं करावं असं वाटत असेल, तर मला ते गोंधळाचं वाटतं. कारण वर म्हटल्याप्रमाणे भारतासारख्या देशात सांस्कृतिक उपगटानुसार त्यांचं पॉप बदलतं. मग जर विशिष्ट गटापुरतंच पाहायचं तर ते व्यापक अर्थानं 'पॉप' आपलंसं करणं नसून कोणत्या तरी कळपात 'आत' सामावलं जाण्यासाठी लागेल ते करणं एवढ्यापुरतंच मर्यादित ठरेल.
थोडक्यात, तुम्ही उच्चभ्रू कला आपलीशी करणं आणि पॉप आपलंसं करणं ह्यापैकी कशाचीही निवड केली, तरीही उथळ पाण्यातच खळखळ करत राहण्याचे धोके दोन्हीकडे आहेत आणि त्या पलीकडे जाऊन काही तरी गंभीर म्हणता येण्याइतपत स्वतःचा विकास करण्याच्या शक्यतादेखील दोन्हीकडे आहेत.
... तर मला ते गोंधळाचं वाटतं.
... तर मला ते गोंधळाचं वाटतं.
हे विधान मला हुच्चभ्रू वाटतं. ;-)
असो. गंभीरपणे:
'to turn something on its head'मध्ये अभिप्रेत असलेल्या अर्थानं पॉप आपलंसं केल्याची (आणि vice versa) अर्थपूर्ण उदाहरणं आहेत आणि त्यांच्यामुळेच एकुणात कलेत गंमतबिंमत आहे, हे पूर्ण मान्य. एरवी भारतीय (आणि अमेरिकन) लोकप्रिय संदर्भ ठाऊक असल्याखेरीज 'गँग्ज ऑफ वास्सेपूर'ची मजा कशी घेता येईल? किंवा कोलटकरांच्या कवितेत चक्क 'सायको'मधले संदर्भ का येतील? किंवा 'fangirling'मधला विखार ठाऊक असल्याशिवाय तीच संज्ञा वापरून पॉप कल्चरला संपूर्णतः ऑफबीट वळसे देणारं फॅनिश साहित्य कसं वाचता येईल? किंवा... असो. मुद्दा कळल्यास कारण. पण हा धागा काढताना तुम्ही म्हणताहात तितकी व्यापक संदर्भचौकट डोळ्यांसमोर नव्हती.
मस्त
मस्त मस्त मस्त.
इथली चर्चा वाचायला आवडेल.