Skip to main content

आसक्त, पुणे यांच्या नाटकाचा बेंगलोर येथे प्रयोग

आसक्त, पुणे निर्मीत 'एफ वन - वन झिरो फाइव्ह' या नाटकाचे २ प्रयोग रंग शंकरा, जेपी नगर, बंगलोर येथे रविवार दिनांक २७ सप्टेंबर, २०१५ रोजी दुपारी ३:३० आणि सायंकाळी ७:३० वाजता सादर होत आहेत.

नाट्यरसिकांनी ह्या संधीचा नक्की लाभ घ्यावा ही विनंती. तिकीटासाठी, इथे पाहा.

'एफ वन - वन झिरो फाइव्ह'

लेखक: आशुतोष पोतदार
दिग्दर्शन व नेपथ्य : मोहित टाकळकर
प्रकाश योजना: प्रदीप वैद्य
वेशभूषा: रश्मी रोडे
निर्मिती सूत्रधार: आशिष मेहता
सहाय्यक दिग्दर्शक: तुषार गुंजाळ
स्थिर चित्रण: जय जी, सारंग साठये
कलाकार: मृण्मयी गोडबोले, राजकुमार तांगडे, सागर देशमुख, तृप्ती खामकर, आनंद क्षीरसागर, जीवक मोरे, हृषीकेश पुजारी, ओमप्रकाश शिंदे व आलाप वैद्य

नाटकाविषयी:
मराठी बरोबरच हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांमधे घडणारे एफ़- वन/ वन झिरो फ़ाईव्ह हे नाटक माणसांचे भाषा आणि संस्कृतीचे व्यवहार, त्यांची धार्मिक-आर्थिक-सामाजिक व्यवस्था यांच्या नानाविध ‘रंग’ छटा सादर करत समकालिन बहुसांस्कृतिक समाजाचा एक अंधारा आणि दुखरा कोपरा समोर आणते. नासत चाललेले व्यक्तीसंबध, बहुपदरी सत्ताकारण, एकमेकांबद्दल आणि भवतालाबद्दल विश्वास गमावलेले माणसांचे भावनिक विश्व यामधून येणारे रंगांचे भान आणि राजकारण हे नाटक दाखवते. समकालिन बहुसांस्कृतीक समाजातली संकूचित वृत्ती, सामाजिक व्यवस्थांमधली उतरंड, विविध संस्कृतीमधला निखळत चाललेला व्यापक दुवा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा तीव्र संकोच एफ़- वन/ वन झिरो फ़ायव हे नाटक दचकवून टाकणा-या रंगमंचीय भाषेत सादर करते.
पाठिंबा: इंडिया फ़ाऊंडेशन फ़ॉर द आर्टस, बेंगलुरु.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

.शुचि. Tue, 22/09/2015 - 19:10

In reply to by ऋषिकेश

परिचय आवडला.

एकीकडे रंग, वास, चवी या सगळ्यांत व्यावसायिक प्रॉडक्शन्स एकसुरीपणा आणत असताना, दुसरीकडे माणसांची आयुष्य, जीवनपद्धतीही "घाऊक आणि ढोबळ" आणि म्हणूनच एकरेषीय होत चाललीयेत का?

सपाटीकरण :(

मनोज२८ Sun, 27/09/2015 - 20:52

श्रीमान आशुतोष यांनी सुचवल्याप्रमाणे हे नाटक पहिले. बंगळूरुमध्ये मराठी नाटक पाहण्याचा पहिलाच अनुभव अतिशय सुखद होता. एक उच्च अभिरुचीयुक्त कलाकृती सुचवल्याबद्दल आभार..

ह्या प्रायोगिक नाटकाचे दिग्दर्शन , मांडणी , भूमिका = १६ आणे , ५२ कशी ! जरूर पाहावे अशी नाट्यकृती / दीर्घांक.