संस्थळाबद्दल काही आकडेमोड.
काही गृहितकं -
१. ऐसी हे एक फोरम आहे. तेव्हा इथे चर्चा होणं किंवा लेखावर प्रतिक्रिया देणं हे सगळ्यात जास्त अपेक्षित आहे. तेव्हा फोरम किती "जिवंत" आहे ते तपासायला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत-
अ) इथे येणारे नवीन लेख
ब) लेखांवर होणार्या चर्चा.
अर्थात, अ) पेक्षा ब) नेहेमीच जास्त असणार आहे, त्यामुळे ब) ची माहिती ह्यासाठी जास्त मोलाची असेल.
अ) नक्कीच महत्त्वाचं आहे, पण इथली बरीचशी अॅक्टिव्हिटी ही प्रतिक्रिया आणि प्रतिसाद-उप-उप-उप प्रतिसाद ह्या स्वरूपाची असल्याने अ) चा अभ्यास आपण थोडा नंतर करू.
.
२. इथे येणार्यांपैकी किती लोकांनी लेख लिहिले आहेत/ कितींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत/ किती लोक केवळ वाचनमात्र राहून ऐसी वापरतात ?
सामान्य (संपादकीय पावर नसलेल्या) लोकांना ह्यापैकी २ गोष्टींच्याच पाऊलखुणा दिसतील - लेखकांची आणि प्रतिक्रियकांची संख्या. वाचनमात्र जनतेचा अंदाज काही सर्वर लॉग्सशिवाय करता येणार नाही, पण त्याची तितकी गरज नाही.
कारण १) ची मदत घेतली, तर कळेल की वाचनमात्र जनता ही फोरम्सच्या वाढीत फारसा हातभार लावत नाही. तेव्हा त्यांना ह्या अभ्यासातून वगळलं आहे.
(वाचकमात्र मित्रांनो, आता तरी लिहिणार ना? हॅ हॅ हॅ.)
.
३. ऐसी आंजावर आहे. त्यामुळे ह्या संस्थळाचा सभासद नसूनही मला कित्येक गोष्टी "दिसतात". सदस्य न होताही मी-
१. कुणी नवीन लेख लिहिले
२. कुणी कुठल्या धाग्यावर प्रतिक्रिया दिली
३. कुठल्या लेखकाने काय काय लिहिलंय
४. कुठल्या सदस्याने किती धाग्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
५. एकूण किती प्रतिक्रिया आल्या आहेत - त्यांचे लेखक आणि वेळा
६. एकूण किती लेख लिहिले आहेत- त्यांचे लेखक आणि प्रकाशनाची वेळ इ.
अशा गोष्टी पाहू शकतो, आणि त्यातून माहिती मिळवू शकतो. इथे त्याचाच वापर केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत, पण त्यातून काही ट्रेंड बघणं तोवर शक्य नाही जोवर हा सगळा विदा एकाचवेळी आपल्याला उपलब्ध होत नाही.
सुदैवाने html टॅग्स आणि संगणकाच्या कृपेनं हे सगळं वाचून नीट लावून ठेवता येतं, आणि त्यातून पाहिजे ते हुडकता येतं.
४. संपादकांनू, तुम्हाला कदाचित हे सगळं आधीच ठाऊक असेल, पण आमचा काय? तेवा हे आमी आमच्या पद्धतीने हुडकलेलं आहे, पडता़ळून बघताव काय जरा?
आभारी आहे!
तेव्हा आजवर आमच्या मनात असलेले काही छोटे आणि मोठे प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
वर म्हटल्याप्रमाणे ही सगळी माहिती आं.जावर उपलब्ध आहे, आणि सदस्य न होताही ती बघता येते.
====================================
१. ऐसीवर कोण सर्वाधिक प्रतिक्रिया देतात? गेल्या काहीवर्षांत त्या आय.डींमधे किती बदल झाला आहे आणि कसा?
Top 15 commentors per 25000 Comments | October 2012-Dec 2013 | Dec 2013- June 2014 | June 2014-Feb 2015 | Feb 2015-Oct 2015 |
---|---|---|---|---|
1 | ऋषिकेश | बॅटमॅन | बॅटमॅन | बॅटमॅन |
2 | बॅटमॅन | मन | अरुणजोशी | अरुणजोशी |
3 | ३_१४ विक्षिप्त अदिती | ऋषिकेश | ऋषिकेश | ऋषिकेश |
4 | मन | अरुणजोशी | मन | गब्बर सिंग |
5 | नितिन थत्ते | न'वी बाजू | मेघना भुस्कुटे | नितिन थत्ते |
6 | न'वी बाजू | मेघना भुस्कुटे | नितिन थत्ते | .शुचि. |
7 | अरुणजोशी | मी | गब्बर सिंग | अनु राव |
8 | राजेश घासकडवी | नितिन थत्ते | गवि | गवि |
9 | चिंतातुर जंतू | गब्बर सिंग | अनुप ढेरे | मेघना भुस्कुटे |
10 | मी | ३_१४ विक्षिप्त अदिती | न'वी बाजू | ३_१४ विक्षिप्त अदिती |
11 | मेघना भुस्कुटे | अस्मि | ३_१४ विक्षिप्त अदिती | अनुप ढेरे |
12 | ऋता | अतिशहाणा | मी | चिंतातुर जंतू |
13 | अस्मिता | अनुप ढेरे | अतिशहाणा | आदूबाळ |
14 | नगरीनिरंजन | राजेश घासकडवी | सारीका | अतिशहाणा |
15 | अमुक | चिंतातुर जंतू | चिंतातुर जंतू | पिवळा डांबिस |
पहिल्या पंधरा आय.डींमधे फारसा बदल झालेला नाही.
.
.
२. साधारण किती प्रतिक्रिया येतात आणि कशा?
Statistics per 25000 Comments | October 2012-Dec 2013 | Dec 2013- June 2014 | June 2014-Feb 2015 | Feb 2015-Oct 2015 |
---|---|---|---|---|
Avg. Comments/Day | 50 | 124 | 102 | 109 |
Total Days | 495 | 201 | 243 | 229 |
Days with more than 200 Comments | 4 | 27 | 21 | 16 |
.
.
३. एकूण प्रतिक्रियांची वर्गवारी कशी करता येईल?
Contributed by top 5 | Contributed by top 10 | Contributed by top 20 | Contributed by top 30 | Contributed by top 40 | |
---|---|---|---|---|---|
Oct 2012- Dec 2013 | 32.2 | 47.5 | 63.33 | 74.33 | 80.32 |
Dec 2013- June 2014 | 38.98 | 54.57 | 72.82 | 80.88 | 85.89 |
June 2014-Feb 2015 | 31.6 | 47.17 | 67.65 | 78.08 | 83.84 |
Feb 2015-Oct 2015 | 29.11 | 46.6 | 65.128 | 75.53 | 82.6 |
Avg | 32.97 | 48.96 | 67.23 | 77.21 | 83.16 |
पाहिले ५ आय.डी एकूण प्रतिक्रियांपैकी साधारण ३३% प्रतिक्रिया देतात.
पहिले १० आय.डी एकूण प्रतिक्रियांपैकी निम्म्या प्रतिक्रिया देतात.
आणि पहिले ४० आयडी जवळपास एकूण प्रतिक्रियांपैकी ८०% प्रतिक्रिया देतात.
.
.
४. लेखकांचं काय? किती लोक लिहितात, आणि त्यांची वर्गवारी कशी करता येईल?
authors | Articles |
---|---|
34 | more than 25 |
14 | 20 to 24 |
29 | 15 to 19 |
32 | 10 to 14 |
71 | 5 to 9 |
300 | 1 to 4 |
एकूण लेखक ४८० आहेत. त्यापैकी ७% लोक बरंच काही लिहितात.
एकूण मेंबर १८१० असावेत, असा अंदाज आहे.
.
.
आणि जर कुणी ही माहिती स्वतंत्र पडताळून पाहिली तर बेष्ट होईल!
पुढली आकडे-मोड नंतर कधीतरी.
प्रतिक्रियातील सातत्य
धाग्यातील Table वरून अजून एका प्रकारे निष्कर्ष काढता येईल
सातत्याने चारही वर्षे प्रतिसाद टंकणारेः ३_१४ विक्षिप्त अदिती, अरुणजोशी, चिंतातुर जंतू, नितिन थत्ते, बॅटमॅन, ऋषिकेश, मेघना भुस्कुटे
सातत्याने तीन वर्षे प्रतिसाद टंकणारेः अतिशहाणा, अनुप ढेरे, गब्बर सिंग, न'वी बाजू, मन, मी (कदाचित ऐअवर उशीरा आल्यामुळे एखाद्या वर्षी प्रतिसाद कमी असतील वा नसतील)
सातत्याने दोन वर्षे प्रतिसाद टंकणारेः गवि, राजेश घासकडवी
फक्त एकच वर्षः अनु राव, सारीका, नगरीनिरंजन, पिवळा डांबिस, अस्मि, अस्मिता, आदूबाळ, ऋता, शुचि
कसचं कसचं!!
फक्त एकच वर्षः अनु राव, सारीका, नगरीनिरंजन, पिवळा डांबिस, अस्मि, अस्मिता, आदूबाळ, ऋता, शुचि
अहो काका, तेसुद्धा ते बागकामप्रेमी ऐसीकर शीर्षकाचे धागे सुरू झालेत ना, त्याच्यामुळे.
;)
बाकी आमचा 'ड' तुकडीत शेवटचा नंबर बघून आमच्या शालेय जीवनाची आठवण येऊन अंमळ हळवा झालो!!!
:)
हॅहॅ, हितंच आहे पण दिसत नाही
हॅहॅ, हितंच आहे पण दिसत नाही टाईप आहे हे मोस्टली.
इथे प्रतिक्रिया /लेखनाचे URL विशिष्ट फॉर्मात असतात, (उदा. http://aisiakshare.com/comments?page=क्षयज्ञ) त्यामुळे त्यांचं parsing सोपं आहे.
मग प्रत्येक पानावर Html tags जरा शोधले तर प्रत्येक गोष्टीला वेगळा ट्याग आहे- तो वापरून जरा माझ्या संगणकाला कामाला लावलं :ड
तरी हा बराच कच्चा विदा आहे- कुणी जर R वगैरे वापरत असेल तर अजून डेंजर गोष्टी बाहेर काढता येतील
आभार! उपयुक्त विदा!
आभार! उपयुक्त विदा! ;)