Skip to main content

खगोलविश्वः या महिना अखेरीस आकाशात गुरु व शुक्राबरोबर चंद्राची शोभा

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

येत्या आठवड्यात काही मनोरम अशा सुंदर खगोलीय घटना दिसण्याचा योग येतो आहे.
कोणत्या ते पाहूयात...

२६ जानेवारी २०१२
चंद्र आणि शुक्र यांची युती

२६ जानेवारी २०१२, भारताचा प्रजासत्ताक दिन.
या दिवशी संध्याकाळी ६ ते ८ च्या दरम्यान एक विहंगम दृष्य आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे.
सध्या पश्चिम आकाशात दिमाखाने चमकणारा शुक्र सत्ता गाजवत आहे.
पण या महिन्याच्या महिन्याच्या, म्हणजे अजून २ दिवसांत शुक्राचा अभिमान गळून पडणार आहे.

असे असले तरी चंद्राला शुक्राच्या परिसस्पर्शाने जे सौंदर्य लाभणार आहे ते अत्भुत असणार आहे.
चंद्राची कोर आणि शुक्राची चांदणी एकमेकांच्या अगदी जवळ असे हे मनोरम दृष्य आपल्या सर्वांना पहावयास मिळणार आहे. नशीब चांगले असेल तर ही शुक्राची चांदणी चंद्रकोरीच्या अगदी वर पाहता येईल. संध्याकाळी साडेसहा ते पावणे आठच्या आसपासपर्यंत हे दृष्य दिसेल.

From Khagol

या घटनेनंतर जवळपास दर दिवशी आकाशात पुढील सुंदर दृश्ये पहावयास मिळतील :)

२७ जाने. २०१२:

From Khagol

२९ जाने. २०१२:

From Khagol

३० जाने. २०१२: (गुरु चंद्र युति

From Khagol

३१ जाने. २०१२:

From Khagol

तेव्हा पहा आणि कसे वाटले ते याच धाग्यावर कळवा
कोणी त्यांच्या एसएलआर कॅमेर्‍याने फोटो काढून येथे टाकले तर अतिउत्तम :)

डिस्क्लेमरः लेखात वापरलेली चित्रे जालावरुन घेतली आहेत व आवश्यकतेनुसार त्यात बदल केले आहेत. या चित्रांचे सर्वाधिकार त्या त्या संस्थांकडे सुरक्षित आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 25/01/2012 - 01:38

सागर, वेळेत कळवलंस. या गोष्टींकडे "फॉर्वर्ड" आल्याशिवाय माझं लक्ष जात नाही.

नायल्या, तुझ्याकडे कॅमेरा आणि ट्रायपॉड दोन्ही आहेतच. फोटो काढायला वेळ नसेल तर ते मला पाठवून दे! ;-)

सागर Wed, 25/01/2012 - 10:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आदिती,

तुझी विषयांतली आवड मला माहिती होती, सहज माझ्या लक्षात आले आणि टंकले :)
फोटो काढल्यावर इथे द्यायला विसरु नकोस ;)

तुला आकाशनिरिक्षण करताना मोकळे आकाश बघायला मिळो अशी मनापासूनची इच्छा

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 25/01/2012 - 10:46

In reply to by सागर

इथे बहुदा आकाश मोकळं असेल; पण माझ्याकडे ना ट्रायपॉड आहे ना एसेलार. बहुदा माझ्या कॅमेर्‍याने (Canon S3 IS) ट्रायपॉड असेल तर असे फोटो येतील, पण मला उद्याच्या दिवसातच खरेदी करावी लागेल.

मन Wed, 25/01/2012 - 14:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नेटवर हवे तितके मिळतील की.
खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष स्वतः निरिक्षण केल्याचा आनंद मिलाला तरी पुरे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 25/01/2012 - 21:34

In reply to by मन

नेटवर हवे तितके मिळतील की.

पण मग किडे कसे करणार?

आमच्या घराच्या जवळच, चालत जाण्याच्या अंतरावर मोठ्या रस्त्यावर एक पूल आहे. त्या पुलावरून चांगला अँगल मिळाला तर फोटो काढायला मजा येईल. खालून जाणार्‍या वाहनांच्या दिव्यांच्या शेपट्या आणि वरती चंद्र+ग्रह.

सागर Fri, 27/01/2012 - 15:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगला अँगल मिळाला तर फोटो काढायला मजा येईल. खालून जाणार्‍या वाहनांच्या दिव्यांच्या शेपट्या आणि वरती चंद्र+ग्रह.

असा आनंद जालीय फोटोवरुन मिळेल? कधीच नाही :)

ऋषिकेश Wed, 25/01/2012 - 10:41

अरे वा! आता आवर्जुन लक्ष ठेवेन..
बाकी पुण्यात एसेलार कोणाकडे आहे? वापरणार नसाल तर मलाही पाठवून द्या बरे! ;)

Nile Thu, 26/01/2012 - 01:28

ह्या संधीकडे लक्ष ठेवून होतोच. पण तरी अंतर थोडं जास्त असल्याने फोटो काढण्यात खास मजा येणार नाही (पण तरीही सर्वांने प्रयत्न करा! ;-) ). फोटो काढायला मी 'ट्रांसिटची' ( http://en.wikipedia.org/wiki/Astronomical_transit) वाट पाहतो आहे. मागे एकदा शुक्र अगदी चंद्राचा तुटलेला टवका असल्यासारखा खाली आला होता तसा फोटो काढायला मजा येईल.

बाकी, संध्या खगोल निरिक्षकांनी मंगळाकडे लक्ष द्यायला हवं. मंगळ नेहमीच दिसत नाही. येत्या काही महिन्यांचा काळ मंगळ दिसण्यासाठी खूप चांगला आहे.

आकाशाकडे लक्ष ठेवायला मी ही वेबसाईट वापरतो: http://earthsky.org/tonight/mars-starts-to-retrograde-on-january-24-2012

सागर Thu, 26/01/2012 - 14:09

In reply to by Nile

आकाशाकडे लक्ष ठेवायला मी ही वेबसाईट वापरतो: http://earthsky.org/tonight/mars-starts-to-retrograde-on-january-24-2012

मी याच साईटवरील प्रिडिक्शन्सचा आधार घेऊन चित्रे (बदल करुन) दिली आहेत. :)

पण मी काही सॉफ्टवेअर्स वापरतो, त्यामुळे जास्त मदत होते.

शुक्र चंद्र युतीच्या वेळीस दुर्बिणीतून पाहिले तर चंद्राच्या दिसतात तशा शुक्राच्याही कला पहावयास मिळतील :)

Nile Thu, 26/01/2012 - 21:30

In reply to by सागर

शुक्र इतका तेजस्वी आहे की त्याच्या कला पहायच्या असतील तर मोठा टेलिस्कोप लागेल. माझ्या ५ इंची टेलिस्कोपमधून कला दिसत नाहीत. माझा अंदाज आहे ८-१० इंची टेलिस्कोप तरी लागेल कला पहायला.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 26/01/2012 - 21:35

In reply to by Nile

४ इंची न्यूटोनियन रेफ्लेक्टरमधून मला कला दिसल्याचं आठवतं. पण तेव्हा बहुदा शुक्र पृथ्वीच्या बराच जवळ आला होता. ८ इंची न्यूटोनियनमधून अर्थातच शुक्राच्या कला दिसतील.

Nile Thu, 26/01/2012 - 21:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

व्हीनसचा मीनीमम ब्राईटनेस तो सूर्याच्या पलिकडे लांबवर असल्यावर असतो. त्यामुळे बहुतेक तो पलिकडे असेल. ब्राईट असल्यामुळे कला दिसत नाहीत. प्रकाशाचा हॅलो खूप होतो.

अर्थात, त्याशिवाय मॅग्निफिकेशनने फरक पडतोच, मी २५एमएम च्या आयपीस मधून पाहिला होता. ६ एमएमचा आयपीस वापरल्यास कदाचित कला दिसेल. त्याशिवाय कोणती कला आहे त्यावरही अवलंबून आहे. आज कोणती कला आहे हे पाहण्याकरता स्टेलरीयमचा उपयोग होतो. (सद्ध्या कोणती कला आहे हे पाहिलेले नाही.)

धनंजय Thu, 26/01/2012 - 23:54

In reply to by Nile

मला असा भास झालेला आहे. पण तरी माझ्याच निरीक्षणाबाबत साशंक* आहे. शुक्रकोर कुठल्या दिशेने आहे हे माहीत असल्यामुळे तर डोळे बळेच कोर बघत नसतील ना?
- - -
*पण "भ्रम कशाला म्हणावे" यातही सापेक्षता असते. दूरवरच्या पाट्या अक्षरे अस्पष्ट असतानाच मी वाचू शकतो. म्हणजे अक्षरांचे "स्पष्ट" आकार काय आहेत हे माहीत असल्यामुळे अस्पष्ट बिंबातही तो आकार दिसतो. (हे सांगितले पाहिजे, की पाटीवरचा मजकूर आधीच माहीत नसतो, त्यातील माहिती नवीन असते.) पण जवळ आल्यावर मजकुराचा ताळा जमतो, त्या अर्थी नुसताच भास नाही. अपेक्षेपेक्षा काही अधिक माहितीसुद्धा मिळवलेली असते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 27/01/2012 - 01:23

In reply to by धनंजय

मला असा भास टेलिस्कोपमधून बघितल्यानंतरही झालेला नाही. माझ्या दुर्बिणीतून प्रतिमा उलटी दिसायची त्याचा विचार करूनही बघायचा प्रयत्न केला पण जमले नाही. मला स्वतःला शुक्राच्या कला कधी दिसल्या नाहीत याचं कारण चष्मा लावूनही माझी दृष्टी फार उत्कृष्ट म्हणावी अशी नाही हे ही असू शकतं. मी पाहिलेली कोर साधारणतः ६०-६५% भाग दाखवणारी होती. शुक्र जवळ असणं म्हणजे सूर्याच्या विरुद्ध बाजूस (प्रतियुती) किंवा आपल्याच बाजूला (युती) असं नसून दीर्घवर्तुळाकृती कक्षांचा विचार करून शुक्र काकणभर जवळ होता, असं काहीसं स्मरतं.

थोडी अधिक आठवण अशी की भारतातून साधारणतः रात्री ८:३० च्या सुमारास शुक्र पाहिला होता, म्हणजे सूर्योदयानंतर बराच काळ झाला होता. तेव्हाही शुक्र आकाशात होता म्हणजे सूर्य-शुक्र-पृथ्वी यांच्यात ९० अंशाच्या आसपास कोन झालेला असणार. साधारण असं किंवा याची मिरर इमेज.

सूर्य ----- शुक्र
----------- |
----------- |
----------- |
----------- पृथ्वी

हे सगळं बघितलं तेव्हा अर्थातच नोंदी करण्याची सवय लागलेली नव्हती :-( आणि डिजीटल कॅमेरा हातात असण्याचेही दिवस नव्हते.

विकीपीडीयावर म्हटल्याप्रमाणे, शुक्राच्या कला दुर्बिणीच्या आधी पाहिल्याची नोंद नाही. डोळ्यांनी दिसणार्‍या सर्वच ग्रहांची, सर्व संस्कृतींमधे सखोल निरीक्षणं होत असत. त्यामुळे डोळ्यांनी शुक्राच्या कला दिसतात का याबद्दल थोडी शंका आहे.

सागर Fri, 27/01/2012 - 15:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आदिती म्हणते त्याप्रमाणे शुक्र सध्या सूर्याशी मोठा कोन करुन असल्यामुळे शुक्र आकाशात जास्त वेळ दिसू शकतो आहे.

शुक्राच्या कला संपूर्ण पहायच्या असतील तरी खूप दिवस त्यासाठी शुक्राचे निरिक्षण करावे लागेल, तेव्हा कुठे या कला दिसतील. :)

शुक्राच्या कला कशा दिसतात. ते पुढील रेखाचित्रावरुन स्पष्ट व्हावे.

शुक्राच्या कला नुसत्या डोळ्यांनी मी देखील पाहिलेल्या नाहियेत. शुक्राच्या कलांमुळे फारतर त्याच्या तेजस्वितेते फरक पडतो. पण कला नुसत्या डोळ्यांना दुर्बिणीशिवाय दिसणे अशक्य आहे.

धनंजय Fri, 27/01/2012 - 21:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा भास युतीच्या वेळेला व्हायची शक्यता सर्वाधिक आहे. (म्हणजे शुक्र-अमावास्या म्हणा ना.) वर सागर यांनी दिलेले चित्र बघावे. जेव्हा कोर सर्वात प्रतिपच्चंद्रलेखेव असते, तेव्हा "बिंब गोल नाही" असा अस्पष्ट अनुभव होण्याची शक्यता अधिक. बिंब ५०%-६५%-९०% वगैरे असेल, तर हे बिंब डोळ्यांना वर्तुळावेगळे जाणवण्याची शक्यता तितकीच कमीकमी होत जाते.

मयुरा Fri, 27/01/2012 - 06:18

आताच पाहिले विहंगम दृष्य..चंद्र आणि शुक्राची युती.
ऑफिस मध्ये असल्याने हातात कॅमेरा नाहीये त्याचं खुपच वाईट वाटतयं...आय्-फोन वरुन एवढ्या अंधारात छायाचित्राची काहिच खात्री नाही.
पण नीरभ्र आकाशात केवळ अप्रतिम नजारा.दिलेली वेळ्ही अचुक.
धन्यवाद सागर.

--मयुरा.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 27/01/2012 - 08:55

In reply to by मयुरा

मयुरा, आठवण केल्याबद्दल धन्यवाद. मी पुन्हा एकदा विसरलेच होते. डोळ्यांना छान दिसलं तरी कॅमेर्‍यासाठी खास वाटलं नाही. हे दोन फोटो त्यातल्यात्यात बरे आलेत.

सागर Fri, 27/01/2012 - 15:26

In reply to by मयुरा

धन्यवाद मयुरा,

हे विहंगम दृष्य पहावयास मिळाले हेच खूप आहे.

आपल्या इथे अनेक दर्दी आकाशप्रेमी आहेत, कोणीना कोणी टाकेनच छायाचित्रे :)

सागर Fri, 27/01/2012 - 15:47

प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद

छान चर्चा सुरु आहे व त्याद्वारे नवनवीन माहितीही मिळते आहे.

उदा: नायल्या या सदस्याला दुर्बिणीचे तांत्रिक ज्ञान खूप चांगले आहे ;)

आकाशनिरिक्षण नियमित करा आणि त्याचा निखळ अनुभव घ्या.

फोटो टाका रे कुणीतरी?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 27/01/2012 - 21:12

In reply to by सागर

हा शुक्र उलट्या बाजूला का दिसतो आहे? ... ओह, समजलं. मला हे असं बघण्यासाठी अजून दहाएक तास वाट बघावी लागणार आहे. हा भविष्यातला फोटो आहे. ;-)

सागर, मी फेस्बुकावरून फोटो टाकले आहेत. त्यामुळे बहुदा तुला दिसत नसावेत.

सागर Sat, 28/01/2012 - 12:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऑफिसात फेसबुक ब्लॉक आहे. म्हणून दिसत नव्हते...

आता दिसले फोटो. मस्तच दिसताहेत :)

मी दिलेला फोटो बहुतेक रोटेट न करता जालावर मिळाला तसाच्या तसा दिला त्यामुळे असा उलटा दिसत असावा...

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 28/01/2012 - 11:25

ट्रायपॉडशिवाय पाण्यातलं प्रतिबिंबच पकडता आलं.

(फोटो फेसबुकावर आहे; फेसबुक ब्लॉक्ड असेल तर दिसणार नाही.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 28/01/2012 - 23:27

In reply to by ...

कॅमेर्‍याची चौकशी करता? कळतात हो असली बोलणी! ;-)

कॅमेरा तोच, वरच्या प्रतिसादात उल्लेख केलेला कॅनन S3 IS. फोटोत डाव्या बाजूला खाली कोपर्‍यात डीफोकस्ड कातळ दिसतो आहे, त्याच कातळावर झोपून, कातळावरच कॅमेरा टेकवून फोटो काढला आहे. थोडक्यात नशीब, मी फोटो काढताना माझा फोटो कोणी काढला नाही. तो ही एक मजेशीर देखावा झाला असता. :-D

काल फोटो काढतेवेळी ट्रायपॉड नसल्यामुळे हातातून फोटो काढताना आयएसो जास्त ठेवावं लागलं. नाहीतर हात हलल्यामुळे फोटो नीट येत नव्हते. उच्च आयएसओमुळे फोटो noisy आले आहेत.

ऋषिकेश Mon, 30/01/2012 - 09:42

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फटु काढायला घेणार्‍या पोजेस काय, 'नॉईजी' काय, आय एस ओ काय!!१
छ्या! दुर्बिटणे बै आता आमेरिकन फुल्टु फटुग्राफर झालेल्या दिसताहेत! ;)

सागर Tue, 31/01/2012 - 14:38

In reply to by सागर

काल रात्री ऑफिसातून घरी यायला उशीर झाला.

साधारण साडेआठच्या सुमारास आकाशात चंद्र आणि गुरु यांची युती इतकी विलोभनीय दिसत होती की बास :)
त्यात भर म्हणजे शुक्राची ठळक उपस्थिती पश्चिम क्षितिजावर अगदी मावळतीला टेकलेला....

एक विलोभनीय दृष्य होते ते. अंदाजाने पाहिलेली चित्रे व प्रत्यक्ष दृष्य यात बरीच तफावत असते हेच खरे... :)

कोणी गुरु चंद्राची युती पाहिली का?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 31/01/2012 - 02:34

In reply to by ऋषिकेश

अरे नॉईज काय कुठेही दिसतो, आंजावरही दिसतो. तो काढावा किंवा टाळावा कसा हे शिकणं महत्त्वाचं. मी नॉईज हा शब्द कामामुळेच वापरायला शिकले.

अवांतरः हे काय ग्रहयोगच म्हणावेत का, ज्यामुळे ऋसुद्धा खोड्याळ लोकांच्या खोड्या काढायला शिकला?