ही बातमी समजली का? - १००
हैद्राबाद विद्यापीठ आणि जातीयतावाद -
अशोक वाजपेयी यांनी हैद्राबाद विद्यापीठाने दिलेली डी.लिट. ही पदवी परत केली आहे. बातमीचा दुवा
रोहोत वेमुला या दलित विद्यार्थ्याने काल आत्महत्या केल्यानंतर आज आणखी धक्कादायक बातमी मटात आहे - 'विद्यापीठातील जातिभेदाला कंटाळून गेल्या दशकभरात दलित समाजातील ९ विद्यार्थ्यांनी स्वत:चं जीवन संपवलं आहे,' अशी धक्कादायक माहिती तेथील शिक्षणतज्ज्ञांनी दिली आहे.
रोहितचं शेवटचं पत्र - (भाषांतराचं श्रेय कोणाचं हे माहीत नाही. बहुदा प्रज्ञा पवार यांनी भाषांतर केलंय.)
शुभ सकाळ,
तुम्ही हे पत्र वाचत असाल तेव्हा मी नसेन. रागावू नका. मला माहीत आहे, तुमच्यातल्या काहींना माझी चिंता होती, प्रेम होतं माझ्यावर, आणि मला चांगली वागणूकही दिलीय. माझी कुणाबद्दलच काही तक्रार नाही. खरं सांगायचं तर माझी माझ्याबद्दलच तक्रार होती. माझा आत्मा आणि माझं शरीर यात अंतर पडू लागल्याचं मला जाणवू लागलं होतं. दैत्यवत झालो होतो मी. लेखक व्हावं हे माझं कायमच स्वप्न होतं. विज्ञान-लेखक, कार्ल सेगनसारखा. अखेरीस आज हे शेवटचं पत्र मी लिहू शकतोय.
मला विज्ञान आवडायचं. ग्रहतारे आवडायचे. निसर्ग आवडायचा. आणि मी माणसांवरही प्रेम करायचो. मी हे विसरून गेलो होतो की, माणसं निसर्गापासून फारच पूर्वी तुटलेली आहेत. आपल्या भावना आपल्या स्वतःच्या राहिलेल्या नाहीत. आपलं प्रेम बनावटी आहे. आपले विचार गंजलेले आहेत. आपल्यातली सर्जनशीलता कृत्रिम कलेचा आधार घेऊन उभी राहात आहे. वेदना सहन करण्याची तयारी ठेवल्याशिवाय प्रेम करणं शक्यच राहिलेलं नाही.
माणसाचं मूल्य हे त्याच्या तातडीच्या ओळखीवर आणि जवळपासच्या शक्यतांवर ठरतं. मतदार म्हणून. आकडा म्हणून. वस्तू म्हणून. एक मन असलेली व्यक्ती म्हणून, ग्रहतार्यांच्या धुळीतून निर्माण झालेली एक देदीप्यमान वस्तू म्हणून माणसाचा विचार केलाच जात नाही. कुठल्याही क्षेत्रात, अभ्यासात, रस्त्यावर, राजकारणात आणि मरताना नि जगतानाही.
खरं तर अशा प्रकारचं पत्र मी पहिल्यांदाच लिहितो आहे. शेवटचं पण पहिल्यांदा लिहिलेलं पत्र. जर माझ्या लिहिण्याचा अर्थ लागत नसेल तर मला माफ करा.
कदाचित मी आजवर कायमच जग समजून घेण्यात चूक केली असेल. प्रेम, वेदना, आयुष्य, मरण, काहीच समजलं नसेल मला. तातडी कसलीच नव्हती, पण मी सतत धावत होतो. आयुष्य सुरू करण्यासाठी अनावर. सारखं. काही लोकांसाठी आयुष्य हाच शाप ठरतो. माझा जन्म एक जीवघेणा अपघात होता. मी माझ्या बालपणाच्या एकाकीपणातून कधी बाहेरच पडू शकलो नाही. माझ्याच भूतकाळातलं एक नावडतं मूल होतो मी.
या क्षणी मला कसलीच वेदना नाहीय. मी दुःखी नाहीय. रिकामा आहे मात्र मी. माझी मला तमा वाटेनाशी झालीय. केविलवाणं आहे हे सगळं. आणि म्हणून मी हे करू धजतोय.
लोक मला कदाचित भेकड म्हणतील. स्वार्थी म्हणतील. मी गेल्यावर मला मूर्खही ठरवतील. मला कोण काय म्हणेल याची अजिबात पर्वा नाही. मृत्यूनंतरच्या जगण्याच्या भाकडकथांवर माझा विश्वास नाही. भूतांवर नाही, प्रेतात्म्यांवर नाही. जर काही असलंच तर, मला तार्यांच्या दिशेने जाता येईल. तिथल्या जगांबद्दल जाणून घेता येईल.
तुम्ही माझं हे पत्र वाचत आहात, जर तुम्हाला माझ्यासाठी काही करायचं असेल तर एवढं करा की, माझी सात महिन्यांची फेलोशीप आलेली नाही. एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये. हे पैसे माझ्या घरच्यांना मिळतील असं बघा. फक्त त्यातले 40,000 मला रामजीला द्यायचे आहेत. खरं तर त्याने ते कधीच मागितले नाहीत मला. पण कृपया त्याचे पैसे द्या.
माझे अंत्यविधी शांततेने आणि साधेपणाने पार पाडा. मी आलो आणि निघून गेलो एवढाच भाव ठेवा. माझ्यासाठी आसवं ढाळू नका. जिवंतपणापेक्षा मला मरण्यात अधिक आनंद मिळतो आहे हे लक्षात ठेवा.
अंधारातून प्रकाशमान तार्यांकडे.
भावा उमा, तुझ्या खोलीत मी हे करतोय, मला माफ कर.
माझ्या संघटनेतील मित्रांनो, मी तुमची निराशा करतो आहे, मला माफ करा. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलंत. सर्वांचं भवितव्य चांगलं असेल अशी माझी भावना आहे.
अखेरीस एकदाच,
जय भीम
रोहित वेमुला
काही औपचारिक बाबी लिहायच्या राहून गेल्या.
माझ्या आत्महत्येला कुणीच जबाबदार नाहीय.
यासाठी कुणीही मला भरीला घातलेलं नाहीय, ना शब्दांनी ना कृतींनी.
हा माझा निर्णय आहे आणि केवळ मीच याला जबाबदार आहे.
मी गेल्यावर माझ्या मित्रांना अथवा माझ्या शत्रूंना त्रास देऊ नका
दलितांनी स्वत:ला दलित समजावं
दलितांनी (किंवा त्यांच्या मुलांनी) स्वत:ला दलित समजावं अशीही अपेक्षा असते का? माणसाचं मूल्य कशावरुन ठरतं त्यावर त्याने लिहीलंय. मी दलित असल्याने झालेल्या त्रासामुळे आत्महत्या करतोय असे फक्त पॉलिटिसाइझ्ड मन असलेलाच माणूस लिहील. ज्याला सगळी माणसे समान असावी असे वाटते त्याला माणसाचं मूल्य ठरवण्यावरुन दु:ख वाटेल फक्त.
'द हिंदू'मधून - Death of a
'द हिंदू'मधून - Death of a Dalit scholar
हा लेखातला काही भाग -
Vemula was one of five Dalit students, all belonging to the Ambedkar Students Association (ASA), who had been suspended by the administration. The ‘suspension’ order allowed them to continue their studies in the university but denied them entry to the hostels, administration building and other common places in groups. It is difficult to imagine a more blatant exhibition of social boycott than such a punitive measure, directed at a group of students from a socially disadvantaged community. .... It was against this punitive measure that they had been protesting.
ही जी वर्तणूक आंबेडकर स्टडी सर्कलच्या सभासदांनी दिली जात होती त्यात आणि एकेकाळी दलितांना सवर्णांच्या वस्तीबाहेर ठेवलं जात असे, सवर्णांच्या विहीरींना हात लावला जाऊ देत नसे यांमध्ये साधर्म्य दिसतं का?
खरंयएकतर ज्या आयसीसच्या
खरंय
एकतर ज्या आयसीसच्या नावाखाली ही मखलाशी चाललीये ते आयसीस उघड उघड लढतच नाही तेव्हा अश्या सेनेचा उद्देश मुळातच आयसीस वगैरेंच्या विरूद्ध नाही.
दुसरे असे की भारतीय सैन्य बाह्य आक्रमणाला सज्ज व पुरेसे आहे. सद्य सरकारही तशी वेळ आली तर देशाच्या रक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलेल असा विश्वास आहे. मग या अशा सेनेची गरजच काय?
कारण सरळ आहे अश्या लुटुपुटूच्या सेनेच औपयोग आयसीसविरूद्ध नाही पण स्थानिक दंगलींमध्ये उत्तम होतो. :(
म्हणून म्हटले ही युपी निवडणूकांची नांदी म्हणावी तर पिक्चर रिरीजच होऊ नये असे वाटू लागले आहे.
अखिलेश सरकारने खरंतर यावर त्वरीत कारवाई केली पाहिजे नाहि केली तर केंद्राने अखिलेश सरकारला तसे आदेश दिले पाहिजेत!
दलित कर्मचारी,दलित विद्यार्थी
दलित कर्मचारी,दलित विद्यार्थी हे सरकारी नियमाने अनुसूचित जाती जमाती आरक्षणातून अधिकृतरित्या प्रवेश घेतलेले आहेत म्हणून तसा शिक्काच. रेल्वेच्या यांच्या युनिअन्स वेगळ्या आहेत.एकदा आत आल्यावरही ते दलितच म्हणून मिरवताहेत.त्यांनी स्वत:लाच ही उपाधि लावून घेतल्यावर इतरही तसेच म्हणणार ना?त्यांचे वा इतरांचे रक्त लालच असते वगैरे कविंसाठी दोन ओळी छंदात बसतात म्हणून फक्त.
मला या गदारोळात दोन प्रश्न
मला या गदारोळात दोन प्रश्न पडतात
१. जर यात केंद्रीय मंत्र्यांचे नाव आले नसते व त्यायोगे मोदी सरकारचा याच्याशी संबंध जोडणे शक्य झाले नसते तर मिडीयाने व विरोधकांनी याला इतके प्रकाशात आणले असते का? माझ्या मते नाही. ही स्थानिक बाब आहे आणि स्थानिक सरकारने ती हाताळली पाहिजे. (काही प्रमाणात हाच निकष व तर्क मी दादरीलाही लावला असता परंतु तिथे केंद्रीय मंत्र्यांकडून ज्या प्रकारची वक्तव्ये निवडणुकीदरम्यान येऊ लागली ती पूर्णतः वेगळी केस ठरली)
२. सदर विद्यालय/विद्यापिठ केंद्रीय आहे का? नसल्यास आपल्याच पक्षाची सत्ता असणार्या राज्यातील विद्यापिठात हे प्रकार घडल्यानंतरही राहुल गांधींनी इथे भेट देऊन आसवे ढाळणे याला कोडगेपणा म्हणावा, निरागसपणा, कावेबाजपणा की राजकीय अपरिपक्स्वता?
पोळी भाजणे
इथे भेट देऊन आसवे ढाळणे याला कोडगेपणा म्हणावा, निरागसपणा, कावेबाजपणा की राजकीय अपरिपक्स्वता?
याला तापल्या तव्यावर पोळी भाजायचा प्रयत्न करणे, असे म्हणतात!
अशी पोळी भाजायचा प्रयत्न भाजपानेदेखिल मालद्यात जाऊन केला होता. परंतु 'माछेर झोल' समवेत पोळी चांगली लागत नसल्याने तो प्रयत्न फसला! इथे 'मुर्ग मुसल्लम' बरोबर पोळी बरी लागते!!
http://www.hindustantimes.com
http://www.hindustantimes.com/india/delhi-police-issues-alert-after-tax…
पुन्हा अतिरेकी हल्ले?
शेवटचा परिच्छेद भीतीदायक आहे.
In Mumbai, the police are yet to trace six mysterious paragliders who were seen near the city’s coast on January 13. Authorities said they have taken the incident seriously because of a 2010 intelligence report that the terrorist group Lashkar-e-Taiba had procured 50 paragliders from Europe and was conducting a training in Pakistan to launch an aerial attack.
In Mumbai, the police are yet
In Mumbai, the police are yet to trace six mysterious paragliders who were seen near the city’s coast on January 13. Authorities said they have taken the incident seriously because of a 2010 intelligence report that the terrorist group Lashkar-e-Taiba had procured 50 paragliders from Europe and was conducting a training in Pakistan to launch an aerial attack.
पाकिस्तानचे यश.
१) त्यांना हवं तेव्हा ते आपल्यावर हल्ले करतात. त्यांचे काही हल्ले यशस्वी होतात. त्यांचे जे हल्ले यशस्वी होत नाहीत (आपली सुरक्षा दले हाणून पाडतात) त्याबद्दल आपल्याला बोलता येत नाही कारण मग आपल्या इंटेलिजन्स केपेबिलिटीज जगजाहिर होतात.
२) अतिरेकी हल्ल्यात जे नुकसान होतेय त्याहीपेक्षा जास्त नुकसान नको म्हणून भारत सरकार युद्ध हा विकल्प चर्चेस घेतच नाही. गरिबांना फार त्रास होईल, त्यांचे नुकसान होईल, युद्ध आपल्याला परवडणारे नाही वगैरे वगैरे. जोडीला आपल्याला आपली प्रतिमा महत्वाची वाटते. की बघा आम्ही शांतिपूर्ण वातावरणास कसे कटिबद्ध आहोत ते. प्रणव मुखर्जी सुद्धा मागे "वॉर इज नॉट अ सोल्युशन" असं काहीतरी म्हणाले होते संसदेत. कबूतर जा जा जा कबूतर जा !!
३) पाक कडे अण्वस्त्रे असल्यामुळे आपण हल्ला करण्याचा विचार करत नाही. पाक कडे अण्वस्त्रे नव्हती तेव्हा सुद्धा आपण हल्ला केला असता असं नाही. पण आपण कन्व्हेन्शनल वॉर मधे त्यांना सरस ठरू हे आपल्याला व त्यांनाही चांगले माहीती आहे. आपण "नो फर्स्ट युज" साठी कटिबद्ध आहोत. व पाकिस्तान् म्हणते की तुम्ही आमच्याशी "नो वॉर पॅक्ट" करा. ते आपण करत नाही व पाकिस्तान "नो फर्स्ट युज" शी कटिबद्ध नाही कारण ते म्हणतात की आम्ही अण्वस्त्रे ही "न वापरण्यासाठी बनवलेलीच नैय्येत". नॅश इक्विलिब्रियम ??
४) पाकिस्तानी आर्मी ला फायदाच फायदा. त्यांना भारताशी "लो इन्टेन्सिटी वॉर" चालू ठेवता येते. पाक मधे नेमकी नेगोशिएटिंग अथॉरिटी कुणाकडे आहे हे नेहमीच गुलदस्त्यात राहते. गुलद्स्त्यात खरंतर नसते पण तसे मेंटेन केले जाते. पण म्हणून पाक शी वाटाघाटी करणे हे हस्तिदंती मनोर्यातले इरादे ठरत नाहीत. फक्त प्रत्याक्रमण हे मात्र लगेच हस्तिदंती मनोर्यातल्या वल्गना ठरतात. कारण वाटाघाटी केल्यातरी त्यातून निष्पन्न जे काही होईल त्यानुसार कार्यवाही होईल याची शाश्वती असते का ? ( पण गब्बर, म्हणून वाटाघाटी करायच्याच नाहीत हे योग्य कसं ? )
५) प्रत्याक्रमणाचे समर्थन करणे म्हंजे लेबल लावले जाणार. युद्धखोर, मुस्लिमद्वेष्टा, देशभक्तीखोर, कम्युनल, अतिउत्साही, राष्ट्रीय सेक्युलर फॅब्रिक बिघडवणारे, अमानवतावादी, military keynesian, military–industrial complex (MIC) चा हस्तक. आपल्या देशात एक मजा आहे. आपल्या विरोधकांना स्वयंघोषित अमका ढमका म्हणणे चालवून घेतले जाते. म्हंजे विरोधकांना "स्वयंघोषित युद्धखोर" असे लेबल लावणारा "स्वयंघोषित" शांतिखोर नसतो. तो आपोआप "सर्वानुमते शांतिवादी" असतो. सर्वानुमते कशावरून ते विचारायचं नाही.
६) दहशतवाद किती परिणामकारक आहे ते पहा. की पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यास प्रतिसाद म्हणून आपण ५ प्रमुख गोष्टी करू शकतो - अ) प्रत्याक्रमणाचा विचार करणे, ब) प्रत्याक्रमणाची चर्चा करणे, क) प्रत्याक्रमण करणे, ड) पाक बरोबर वाटाघाटी करणे, इ) काहीही न करणे. यातल्या कोणत्या गोष्टी आपण करतो व कोणत्या करत नाही ?? व त्या दहशतवाद्यांच्या मनाप्रमाणे घडतात की आपल्या ?
७) प्रत्याक्रमणाचे प्रकार, परिणाम व प्रत्याक्रमण न करण्याचे परिणाम यांची तुलना कधी केली जाते ? कोण करतं ? कोणी करायला हवी ?
८) पण मग अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे त्याचे काय होणार ?
पाकिस्तानचे यश?
यात पाकिस्तानला "यश" म्हणजे नक्की काय मिळतं? पाकिस्तानचा लो इंटेन्सिटी वॉरफेअरमागचा उद्देश काय असावा? असल्या कारवायांनी भारत देशोधडीला लागेल असे पाकिस्तानला वाटत असेल का?
बाकी वाटाघाटी करणे हा बोटचेपेपणा (किंवा आणखी काय ती शेलकी विशेषणे) हे समीकरण मे २०१४ पूर्वीच फक्त लागू होतं. आता ते लागू नाही. आता ५६ इंची लोकसुद्धा वाटाघाटीच करत असतील तर त्याची कारणे इतरत्र शोधायला हवी.
>>अतिरेकी हल्ल्यात जे नुकसान होतेय त्याहीपेक्षा जास्त नुकसान नको म्हणून भारत सरकार युद्ध हा विकल्प चर्चेस घेतच नाही.
१९७१ मध्ये भारत सरकारने युद्ध हा विकल्प "चर्चेस" घेतला होता का?
>>जोडीला आपल्याला आपली प्रतिमा महत्वाची वाटते. की बघा आम्ही शांतिपूर्ण वातावरणास कसे कटिबद्ध आहोत ते.
२५ डिसेंबरच्या बड्डे पार्टीनंतर "आता काही घडले तर आम्ही मैत्री करतो पण ते पहा काय करतात !!" असे म्हणता येईल असे आर्ग्युमेंट गब्बर सिंगच करीत होते. हे आर्ग्युमेंट भारताची इमेज जपण्याचेच होते ना?
>> त्यांचे जे हल्ले यशस्वी होत नाहीत (आपली सुरक्षा दले हाणून पाडतात) त्याबद्दल आपल्याला बोलता येत नाही कारण मग आपल्या इंटेलिजन्स केपेबिलिटीज जगजाहिर होतात.
बोलता येत नाही? अमुक तमुक कट उधळला, तमुक अतिरेकी अटकेत अशा बातम्या आम्ही वाचतो की पेपरातून !!
>>प्रत्याक्रमणाचे समर्थन करणे म्हंजे लेबल लावले जाणार. युद्धखोर, मुस्लिमद्वेष्टा, देशभक्तीखोर, कम्युनल, अतिउत्साही, राष्ट्रीय सेक्युलर फॅब्रिक बिघडवणारे, अमानवतावादी, military keynesian, military–industrial complex (MIC) चा हस्तक. आपल्या देशात एक मजा आहे.
मिलिटरी इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्सचा आरोप भारतात कोणी करत नाही. भारतात तसा कॉम्प्लेक्स अस्तित्वात नाही. आता खाजगीकरण होऊ घातले आहे. यापुढे असा कॉम्प्लेक्स निर्माण झाला तर सांगता येत नाही.
>>पण मग अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे त्याचे काय होणार ?
हे काय आणखी मध्येच?
>>प्रत्याक्रमणाचे प्रकार, परिणाम व प्रत्याक्रमण न करण्याचे परिणाम यांची तुलना कधी केली जाते ? कोण करतं ? कोणी करायला हवी ?
ही चर्चा लष्करातील उच्चपदस्थ आणि सरकारमधील उच्चपदस्थ यांनी करायला हवी. ती केली जात नाही/नव्हती असा गब्बरसिंग यांचा दावा आहे का?
यात पाकिस्तानला "यश" म्हणजे
यात पाकिस्तानला "यश" म्हणजे नक्की काय मिळतं? पाकिस्तानचा लो इंटेन्सिटी वॉरफेअरमागचा उद्देश काय असावा? असल्या कारवायांनी भारत देशोधडीला लागेल असे पाकिस्तानला वाटत असेल का?
यश नेमके कसे ते मी माझ्या मुद्दा क्र. ६ मधे मांडलेले आहे.
----
१९७१ मध्ये भारत सरकारने युद्ध हा विकल्प "चर्चेस" घेतला होता का?
१९७१ मधे पाकिस्तानने दहशतवाद हा मार्ग भारतात अवलंबला नव्हता. व दुसरे म्हंजे पाकिस्तानने भारताच्या हवाई तळांवर थेट हल्ला केला होता. व म्हणून भारताने प्रत्याक्रमण केले होते. भारताने युद्ध जाहीर केले होते.
इथे मुद्दा हा आहे की पाक पुरस्कृ दहशतवादी हल्ला भारतीय सीमेच्या आत व तो सुद्धा सिव्हिलियन्स वर झाल्यानंतर भारताने प्रत्याक्रमण करणे.
----
२५ डिसेंबरच्या बड्डे पार्टीनंतर "आता काही घडले तर आम्ही मैत्री करतो पण ते पहा काय करतात !!" असे म्हणता येईल असे आर्ग्युमेंट गब्बर सिंगच करीत होते. हे आर्ग्युमेंट भारताची इमेज जपण्याचेच होते ना?
अगदी.
मला आता असं म्हणायचं आहे की भारताने - Doing the same thing over and over again and expect different results - थांबवून वेगळा विचार करावा.
----
मिलिटरी इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्सचा आरोप भारतात कोणी करत नाही. भारतात तसा कॉम्प्लेक्स अस्तित्वात नाही. आता खाजगीकरण होऊ घातले आहे. यापुढे असा कॉम्प्लेक्स निर्माण झाला तर सांगता येत नाही.
मुद्दा एकदम मान्य. मिलिटरी इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्सचा आरोप हा संभाव्य प्रतिवादात्मक आरोप असू शकतो म्हणून नोंदवला.
----
ही चर्चा लष्करातील उच्चपदस्थ आणि सरकारमधील उच्चपदस्थ यांनी करायला हवी. ती केली जात नाही/नव्हती असा गब्बरसिंग यांचा दावा आहे का?
असा माझा दावा नक्कीच नाही.
अशी चर्चा गोपनीय असते हे सगळ्यांनाच माहीती आहे.
पण चर्चे चे काहीतरी रिझल्ट्स केव्हा दिसणार ?
पण चर्चे चे काहीतरी रिझल्ट्स
पण चर्चे चे काहीतरी रिझल्ट्स केव्हा दिसणार ?
नक्की काय रिझल्ट्स अपेक्षित आहेत हे कळलेलं नाही.
अमर अकबर अॅंथनी या सिनेमात गब्बरचा दुष्मन अमिताभ बच्चन म्हणतो 'आपूनने एकीच फाइट मारा, लेकिन क्या मारा, है ना?' सौ सोनार की एक लोहार की - या न्यायाने पाकिस्तानने १९४७ सालपासून शंभर कुरापती काढल्या, पण भारताने १९७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे करून एक प्रचंड मोठा दणका दिला. आता या दोनपैकी नक्की कुठचं जास्त परिणामकारक हे तुम्ही समजावून सांगाल का? पाकिस्तानला भारताचे दोन तुकडे करण्यात यश मिळालं का?
नक्की काय रिझल्ट्स अपेक्षित
नक्की काय रिझल्ट्स अपेक्षित आहेत हे कळलेलं नाही.
नक्की हे रिझल्ट्स अपेक्षित आहेत की - Completely preventing Pakistan from being able to launch further attacks within Indian territory.
---
अमर अकबर अॅंथनी या सिनेमात गब्बरचा दुष्मन अमिताभ बच्चन म्हणतो 'आपूनने एकीच फाइट मारा, लेकिन क्या मारा, है ना?' सौ सोनार की एक लोहार की - या न्यायाने पाकिस्तानने १९४७ सालपासून शंभर कुरापती काढल्या, पण भारताने १९७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे करून एक प्रचंड मोठा दणका दिला. आता या दोनपैकी नक्की कुठचं जास्त परिणामकारक हे तुम्ही समजावून सांगाल का? पाकिस्तानला भारताचे दोन तुकडे करण्यात यश मिळालं का?
गब्बर चा दुष्मन ? ओह ... शोलेतल्या गब्बर चा शोलेतला व अमर अकबर अॅंथनी मधला दुष्मन. जय अँथनी गोन्साल्विस.
मुद्दा एकदम दणकट आहे. पण इथे सुद्धा आम्हाला असेच रिझल्ट्स हवे आहेत. बलुचिस्तान चा तुकडा पाडा. गब्बर चा दुष्मन विकी कपूर म्हणतो तसे - इंतेहां हो गयी इंतजार की !!!
पण आत्तापर्यंतच्या इतिहासात
पण आत्तापर्यंतच्या इतिहासात भारताने युद्धाचा विकल्प सर्जिकल प्रिसिजनने वापरला आणि मिनिमम कॉस्टमध्ये मॅक्झिमम डॅमेज केला हे तुम्हाला मान्य नाही असं वाटतं. तुम्हाला अजून मोठी कॉस्ट घेऊन त्यामानाने कमी परिणाम साधणारं युद्ध हवं आहे. या प्रस्तावित युद्धाच्या कॉस्टपेक्षा आत्ता भारत जी कॉस्ट इनकर करतो आहे ती मोठी कशी हे सांगण्याची जबाबदारी तुमची आहे.
पण आत्तापर्यंतच्या इतिहासात
पण आत्तापर्यंतच्या इतिहासात भारताने युद्धाचा विकल्प सर्जिकल प्रिसिजनने वापरला आणि मिनिमम कॉस्टमध्ये मॅक्झिमम डॅमेज केला हे तुम्हाला मान्य नाही असं वाटतं. तुम्हाला अजून मोठी कॉस्ट घेऊन त्यामानाने कमी परिणाम साधणारं युद्ध हवं आहे. या प्रस्तावित युद्धाच्या कॉस्टपेक्षा आत्ता भारत जी कॉस्ट इनकर करतो आहे ती मोठी कशी हे सांगण्याची जबाबदारी तुमची आहे.
ऑ ?
१) मी तुमचा मुद्दा दणकट आहे हे आधीच मान्य केलेले आहेच की.
२) तुम्हाला अजून मोठी कॉस्ट घेऊन त्यामानाने कमी परिणाम साधणारं युद्ध हवं आहे - असं मला वाटतं ? कसंकाय ?
कैच्याकै अवांतर
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले तेव्हा आम्हाला पडलेले स्वप्न असे होते -
राज्याभिषेक होऊन मोदीजी पंतप्रधान भवनात माप ओलांडून प्रवेश करतात आणि चहाही घेण्याआधी गाऊ लागतात -
"या भवनातील गीत पुराणे, मवाळ हळवे सूर जाऊद्या आज येथुनी दूर"
(२०१५ च्या दिवाळीनंतर हे स्वप्न "रिपीट" झाले ; यावेळी मात्र मोदीजी "सुर से सजी संगिनी" गात होते, हा तपशिलाचा फरक)
गब्बरचं मला कौतुक वाटतं. भारत
गब्बरचं मला कौतुक वाटतं. भारत सोवळा असण्यावर त्याचा मनोमन विश्वास आहे.
पाकिस्तान जर इथे कारवाया करतो व त्या पुराव्यांसकट उघड होतात याचा अर्थ त्यांचे व्यवस्थापन गंडलेले आहे. भारत तसेच करत नाही याबद्दल इतका विश्वास तुम्हाला कसा काय वाटतो? पेशावर हल्यानंतर लगेच तिथे विद्यापिठात हल्ला झाला, मला ही बाब योगायोग म्हणून दुर्लक्षण्यासारखी खचितच वाटत नाही.
Stephen Hawking Says We
Stephen Hawking Says We Should Really Be Scared Of Capitalism, Not Robots
If machines produce everything we need, the outcome will depend on how things are distributed. Everyone can enjoy a life of luxurious leisure if the machine-produced wealth is shared, or most people can end up miserably poor if the machine-owners successfully lobby against wealth redistribution. So far, the trend seems to be toward the second option, with technology driving ever-increasing inequality.
केशरी डाळ
मज्जासंस्थेवर परिणाम करणार्या केशरी डाळीवर गेली ५० वर्षे लागू असलेली बंदी भारत सरकारने उठवली आहे. भारतीय वैज्ञानिकांनी नवी व्हरायटी विकसित केली आहे जिच्या सेवनाने मज्जासंस्थेवर "तितकासा परिणाम होत नाही".
पाठोपाठच्या दुष्काळावर उपाय म्हणून हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.
ह्या विषयावरूनही
ह्या विषयावरूनही राजकारणापलिकडे काही प्रतिक्रिया दिसत नाहीये. (अपेक्षाच भारी!)
Despite the ban placed on the lentil in 1961, khesari is still eaten in eastern India and neighbouring Bangladesh, mainly as a cheap source of protein for millions of poor people.
याचा अर्थ किती, काय, कसा परिणाम होतो याचं मोजमाप करता येईल. हे असं काही केलंय का नाही, याचा पत्ता वृत्तपत्रालाही नाही.
http://economictimes.indiatim
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/probe-sugg…
पोलिस देखील म्हणतायत की रोहित वेमुला दलित नाही. त्याचे आई-वडील दोघेही दलित नाहीत.
पाकिस्तानमधे घुसुन हल्ले करा ___ प्रकाश आंबेडकर
पाकिस्तानमधे घुसुन हल्ले करा ___ प्रकाश आंबेडकर
--------------------------
BJP gives Shah full term; L K Advani, MM Joshi give ceremony a miss
अडवाणी व जोशींनी अटेंड केला काय अन न केला काय - काय फरक पडतो ? ( तसं तर अमित शहांनी अटेंड केला तरी काय फरक पडतो ? )
"प्रेश्या" आणि नयनतारा सहगल
सहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत घेतलेला नाही. त्यांच्या नावाने खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.
लौटाया गया अवॉर्ड वापस नहीं ले रही हैं नयनतारा सहगल
हा पुरस्कार सध्या 'दोन्ही घरांनी नाकारलेला पाहुणा' झालेला दिसतोय.
पद्म पुरस्कारांची घोषणा - उधारउसनवारच्या टिप्पण्या
रजनीकांत ‘पद्मविभूषण’; इंदू जैन, सायना ‘पद्मभूषण’
रजनीकांतला पद्मविभूषण देऊन पद्म पुरस्कारांचा गौरव वाढला आहे.
सानिया मिर्झाला पद्मभूषण पुरस्कार दिला. उत्तम. सध्या ती मार्टिना हिंगिसच्या जोडीने सुंदर डबल्स टेनिस खेळत आहे. पण, पण, पण तिच्या सासरच्या देशाने तिला निशान-ए-पाकिस्तान जाहीर केला तर भक्तांच्या काय प्रतिक्रिया असतील? तिच्या लांड्या गणवेशाबद्दल फतवे निघून जुनेच झाल्येत.
पंप्रंचा जाहिरात विभाग सांभाळणाऱ्या पीयुष पांडे यांना पद्मश्री मिळाली. पंप्र अगदीच काही विसरभोळे नाहीत हो!
अनुपम खेरला पद्मभूषण पुरस्कार मिळाला. चांगल्या चित्रपटांत त्याचं काम मला आवडतं. त्याचं काय म्हणणं -
१.
२.
अनुपम खेरच्या ट्वीट्सची मटाने एक बातमी बनवली आहे.
आणि माझं नेहेमीचंच - मटाच्या मते प्रियांका चोप्रा महाराष्ट्रपुत्र आहे. महाराष्ट्र आणि पुत्र! याला मटारी बातम्या म्हणायचं का नेहेमीचंच?
---
(खवचट मोड सुरू) शरद जोशी यांच्या कुटुंबियांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार परत करायची भानगड करायला आता श्री. जोशी जिवंत नसल्यामुळे ही मानहानी टळली म्हणायचं का? (खवचट मोड संपला.)
अनुपम खेर ने पुरस्कार नाकारला
अनुपम खेर ने पुरस्कार नाकारला असता तरी आरडाओरडा झाला असता. (१) की अनुपम खेर "पुरस्कार वापसी ब्रिगेड" ला अप्रत्यक्ष साथ देत आहेत, (२) सरकार जनतेच्या भावनांचे प्रतिनिधीत्व करते. पद्म पुरस्कारातून जनतेच्या भावना प्रतीत होतात. जनतेच्या भावनांना नाकारून नेमके काय साध्य होते ? ( असा आक्षेप आत्ता कॉमन नाही पण मागे सितारा देवींनी पद्म भूषण नाकारले होते व "I will not accept any award less than Bharat Ratna" असा आग्रह धरला होता तेव्हा अशा प्रतिक्रीया उमटल्या होत्या. )
( अरे ओ सांबा !!! कितना इनाम रख्खे है सरकार हम पर ? )
योग असतात
>> अनुपम खेर ने पुरस्कार नाकारला असता तरी आरडाओरडा झाला असता.
ते साहजिकच नव्हे का? पुरस्कारवापसीविरोधात अनुपम खेरच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला होता. मोर्चात सामील झालेल्या मधुर भांडारकरलाही एक पद्म प्राप्त झालं हाही एक योगायोगच म्हणायचा झालं.
नोकऱ्यांचे भविष्य
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे केवळ पाच वर्षात ५० लाख नोकऱ्या नामशेष होणार.
http://www.businesstoday.in/magazine/management/career/over-5-million-j…
Never thought of leaving
Never thought of leaving India… was born here, will die here, says Aamir Khan
महिन्याभरापूर्वी तो जे म्हणाला होता तेव्हा वादळ उठले होते. त्याची चर्चा ऑफीसात करीत होतो तेव्हा आमच्या एका मित्राने "आमीर ला पाकिस्तानात जा असं सांगायचा सल्ला देणं म्हंजे भारताची पाकिस्तानशी तुलना करणं आहे व भारताची पाकिस्तानशी तुलना होऊ शकत नाही" असा क्षीण युक्तीवाद केला होता.
त्यावेळी (Nov 25, 2015) आमिर खान असंही म्हणाला होता की "I still stand by...".
आता आमिर म्हणतो की मी भारत सोडण्याचा विचार करूच शकत नाही. "जीना यहां और ..." आता तो असंही म्हणतो की "his wife had made him realise that he shouldn’t have shared their private conversation at a public platform".
मग त्यावेळी नेमकं काय असं म्हणाला होता की ज्याच्या बद्दल तो - he can still stand by ?
------------------------------------
मला समजत नाहीये की हसावे की
मला समजत नाहीये की हसावे की रडावे -
जगाचा पोशिंदा आत्महत्या करतोय आणि आपण नुसते पाहतोय: सरसंघचालक
रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर
नागपूर: नागपुरात संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. भारतीय जवानांचं मोहन भागवतांनी कौतुक केलं. तर त्याचवेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
“जगाचा पोशिंदा आत्महत्या करतोय आणि आपण नुसते पाहतोय. शेतकरी आत्महत्यामुळे भविष्यात मोठे संकट निर्माण होईल. त्या संकटाचा सामना किमान बळीराजा करु शकेल. शेतकरी त्याची शेती फायद्याची करू शकेल असे तंत्र त्याला शिकविले पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या अनेक असून त्यापैकी काही उपाय सरकारला करायचे आहे. तर काही समाजाला करायचे आहे.” असं भागवत म्हणाले.
“सरकार आपलं कर्तव्य करेल तेव्हा करेल, पण समाज म्हणून आपण आपलं कर्तव्य केलंच पाहिजे. आत्मविश्वासाचा अभाव आणि आपल्या पाठीमागे कोणी नाही. या भावनेतून शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहेत.” असं मोहन भागवत म्हणाले.
“जी वस्तू देशात बनू शकते. ती परदेशातून किंवा परकीय कंपनीकडून खरेदी करू नका. जी वस्तू शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकता. ती त्यांच्याकडून खरेदी करा. लग्नात खूप खर्च करण्यापेक्षा खर्च वाचवून ते गरजू व्यक्तींना द्या. अशा छोट्या उपायांनीही काही प्रमाणात बदल होईल. 121 कोटींच्या देशात शेतकऱ्यांची समस्या खूप मोठी नाही. सर्वानी त्यांचे त्यांचे भार उचलले तर नक्कीच समस्येचे हे गोवर्धन पर्वत उचलले जाईल.” असा सल्लाही भागवत यांनी दिला.
दरम्यान, याचवेळी मोहन भागवतांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ‘संघ नेहमीच धर्मनिरपेक्ष भूमिका घेतं. मात्र, विरोधकांकडून संघावर धर्मनिरपेक्षविरोधी असल्याचा आरोप होतो.’ असं भागवत म्हणाले.
घिसपीटं --कंटाळलोय ; पण सांगतोच
http://www.aisiakshare.com/node/1549 धागा; इथला माझा प्रतिसाद पहावा.
.
.
किंवा http://www.aisiakshare.com/node/3722 इथला
"गाजलेल्या हत्यांत बिग शॉट्सचा सूचित होणारा सहभाग" ह्या शीर्षकाचा प्रतिसाद पहावा.
.
.
सावरकरांच्या चाहत्यांपैकी कैकजण सावरकर हेच गांधींच्या खुनाचे मास्टरमाइंड आहेत असे अप्रत्यक्षपणे सूचित करतात.
नथुराम गोडसे ह्यांचे बंधू गोपाळ गोडसे ह्यांच्या पुस्तकातही हाच छुपा टोन आहे. गोडसे बंधू स्वतःस सावरकरभक्त म्हणवितात.
गांधी हत्येत त्यांना शिक्षा झालेली. कित्येक गोडसे चाहते/समर्थकही खाजगी गप्पांत गांधींच्या खुनाला सावरकरांचा पाठिंबा असल्याचं सूचित/मान्य करतात. ह्यामुळे "काँग्रेसच काय ती गांधींच्या खुनाबद्दल सावरकरांची बदनामी करतेय" हे पटत नाही. सावरकरांच्या चाहत्यांचाच एक मोठा सबसेट ही तथाकथित बदनामी करीत असतो.
.
.
टिळकांचेही तेच. रॅण्डच्या खुनात त्यांचे साह्य्/समर्थन चापेकर (की चाफेकर ?) बंधूंना होते; असे टिळक विरोधकांव्यतिरिक्त टिळकांचेच कैक चाहते सूचित करतात . "हा आमच्या विरुद्धचा अपप्रचार आहे" ही सबब त्यामुळेच पटत नाही.
.
.
संघ आणि मोदींचे चाहते ह्यांच्याबद्दलही हे धर्मांध, खुनशी असल्याबद्दल फक्त कॉम्ग्रेसच बोलते असे नाही.
"त्यांना" अद्दल घडवायची मोदीच फुल्ल पॉवरमध्ये हवेत; असे म्हण्णारे लै मोदीसमर्थक आहेत.
हे आहेत मोदीसमर्थक मुस्लिमद्वेष्टे.
कैक मोदीसमर्थक "मोदींनी गुजरातेत काही विपरित केलेच नाही; सुयोग्य अशीच भूमिका कायम घेतली" असं म्हणतात; त्यांना विकासकामांसाठीच आमच्यासरख्या (मोदीसमर्थक विकासप्रेमी) पब्लिकनं निवडून दिलय म्हणतात.
.
.
म्हणजे मोदींची बदनामी /गैरसमज खरं तर कॉम्ग्रेस वगैरे मोदीवोर्धक करण्यापेक्षा जास्त; त्यांच्याच चाहत्यांचा एक मोठ्ठा सबसेट पसरवत आहे..
.
.
हेच सर्व संघ, शिवसेना, ठाक्रे वगैरेंबद्दल लागू आहे.
ह्यांच्याबद्दल्चे तथाकथित गैरसमज ह्यांचेच चाहते पसरवत असतात.
.
.
आता गैरसमज म्हंजे नेमके काय ते मात्र ठौक नै.
.
" मोदी खुनशी आहेत" गैरसमज आहे; की "मोदी/संघ फक्त विकासप्रेमी, विशुद्ध देशप्रेमी आहे" हा गैरसमज आहे; ते मात्र मला समजत नाही.
.
.
बाकी "कोर्टानं क्लीन चीट दिल्ये" हा मुद्दा नका आणू ब्वा.
.
.
अहो, कोर्टानं सलमानला सजा केलेली नैय्ये; वाड्रालाही अजून फायनल सजा झालेली नैय्ये. नेहरुंचा तर संब्म्धच
नाही.
त्याच्मे रेफरन्सेस काढले की की "ते लोक कायद्याच्या कचात्यातून सुटाले " म्हनायचं; आणि मोदींचा विषय निघाला की त्यांनी त्यांना क्लीन चीट मिळालिये म्हणायचं; हे काय पटत नाही.
.
.;
भारतात क्लीन चीट देण्याचं फार फार मोठं काम न्यायालयं करत असतात. शंभरामागे नव्व्याण्णव गुन्हेगाराला सोडायचं म्हणतात.
आदर बिदर आहेच.
.
.
फापटपसार्यात मूळ मुद्दा विसरला जाइल म्हणून पुन्हा सांगतो.
संघाची जी काही बरीवाईट इमेज आहे; ती फक्त त्यांच्या विरोधकांमुळे बनलेली नाही.
त्यांच्या समर्थकांचाच त्यात फार फार मोठा वाटा आहे.
हे कन्फ्यूजन
हे कन्फ्यूजन क्रांतीकारकांच्या समर्थकांमध्ये नेहमीच दिसते.
शेजारच्या संस्थळावर नेहमी क्रांतीकारकांच्या कथा लिहिणार्या एका सदस्यांनी भगतसिंगांच्या कथेत "सॉण्डर्सच्या खुनात ब्रिटिशांनी भगतसिंगांना आकसाने गोवले" असे वाक्य लिहिले होते. त्यावर तेथील एका सदस्यांनी* "मग सॉण्डर्सच्या खुनात भगतसिंगांचा सहभाग होता की नव्हता? आणि नसेल सहभाग तर भगतसिंगांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान काय?" असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर काही नीटसे मिळाले नाही.
*ते सदस्य इथे सध्या आहेत असा संशय आहे.
संघाची जी काही बरीवाईट इमेज
संघाची जी काही बरीवाईट इमेज आहे; ती फक्त त्यांच्या विरोधकांमुळे बनलेली नाही.
त्यांच्या समर्थकांचाच त्यात फार फार मोठा वाटा आहे.
हा मूट प्वाईंट आहे असा मलाच भास होतोय की इतरांना सुद्धा असं वाटतं ?
समर्थक व विरोधक दोन्हींमुळे इमेज बनत असेल (व बाकीचे नगण्य असतील) तर व्हॉट इज द प्वाईंट ... रियली ? की आयम हॅल्युसिनेटिंग ?
जातीव्यवस्थेचा, आपल्याच जातीत
जातीव्यवस्थेचा, आपल्याच जातीत लग्न करण्याचा गुणसूत्रांवर झालेला परिणाम आणि ते वापरून शोधलेला इतिहास - The caste system has left its mark on Indians’ genomes
इन्टरेस्टिंग.
पण अशा व्याप्तीच्या संशोधनासाठी फक्त ३५७ सॅम्पल्स फारच कमी वाटतात. दुसरे म्हणजे ७० पिढ्यांआधी स्वजातीतच लग्ने करण्याची प्रथा रूढ झाली असे म्हणून हा काळ गुप्त-शेवट-काळ असे म्हटले आहे. जर एक पिढी वीस वर्षांची असे मानले तरच हे शक्य आहे. त्या काळात आयुरपेक्षितता कितीही कमी मानली तरी हे शक्य नाही. आता असे मानता येईल की या सत्तर पिढ्यांमधील प्रत्येक व्यक्तीला विसाव्या वर्षी झालेले मूलच पिढीगणतीसाठी पकडले आहे; तर शक्य आहे. सत्तर गुणिले वीस म्हणजे १४०० वर्षे होतात, म्हणजे काळ मागे मोजल्यास इ.स.६००. मग उत्तरगुप्तकाळ बरोबर आहे.
भारतीय संविधानाची मूळ प्रत ही
भारतीय संविधानाची मूळ प्रत ही हस्तलिखित होती. पण ती प्रत म्हणजे फक्त लिखाण नव्हते. त्यावर वेगवेगळी चित्र देखील होती. हस्तलिखितावरच्या चित्रांची ओळख करून देणारा हा लेख.
http://www.opindia.com/2016/01/the-hidden-beauty-within-the-indian-cons…
पटेलो सामे ठाकोरो- आजची बातमी (गुजरात समाचार)
आजच्या (२८-१-१६)गुजरात समाचारमधली बातमी :'गुजरातमां वर्गविग्रहनां मंडाण : पटेलो सामे ठाकोरो'
राजकारणीओ पोतानी सत्ता जाळववा केवा नवनवा खेल खेले छे एनो उत्तम नजारो गई काले अमदावादना जी.एम.डी.सी. ग्राउन्डमां जोवा मळ्यो. छेल्ला छ मासथी भाजपना एक जूथ द्वारा चलावातुं पाटीदार आंदोलननो जवाब आपवा संतुलन करवाना हेतुथी गुजरातमां ठाकोर समाजने व्यसनमुक्तिना नामे एकठो कराई रह्यो छे. व्यसनमुक्ति एक एवी निर्दोष अने हकारात्मक वात छे के, भलभला अंजाई जाय परंतु तेनी पाछळनी व्यूहरचना खतरनाक अने खोफनाक छे. गुजरातमां राजकीय महत्त्वाकांक्षा संतोषवा भूतकाळमां आवा आंदोलनो क्यारेय नथी थया. आ तो सत्ताधीश राजकीय पार्टीना बे जूथो पोत पोतानो रोटलो शेकवा महाभयानक खेल खेली रह्या छे एनुं ठाकोर समाजना निर्दोष अने भोळा लोकोने खबर नथी.'
पुढे पुष्ट्यर्थ बरेच काही आहे. फोटोवरून सभा खूपच मोठी असावी असे वाटले.
Sweden sends sharp signal
Sweden sends sharp signal with plan to expel up to 80,000 asylum seekers
Sweden is to reject up to 80,000 people who applied for asylum in the country last year, as many as half of whom will be forced to leave against their will, according to official estimates.
The interior ministry has called on police and migration authorities to prepare for a sharp increase in deportations, and to arrange charter flights to expel refused asylum seekers to their country of origin. Sweden is also approaching other EU countries, including Germany, to discuss cooperation to increase efficiency and make sure flights are filled to capacity, it said.
पोपच्या ताठर भुमिकांमधील बदल
पोपच्या ताठर भुमिकांमधील बदल चालु असताना आता शंकराचार्यांनाही नमते घ्यावे लागलेसे दिसतेय
शनी हा देव नाही तो ग्रह आहे त्याची पुजा करू नका म्हणे :)
या विधानाचे स्वागत!
शनि शिंगणापूर नंतर हाजी
"आता फक्त 'आमच्याच' ठिकाणी का 'त्यांच्या' का नाही?" " 'त्यांच्या'बाबतीत असे बोलून बघा - तिथे हिंमत नाही" असे प्रश्न विचारणार्यांची तोंडे बंद होतील अशी आशा आहे. बाकी डोळ्यावर कोणत्याही एका रंगाचे चष्मे चढवलेल्यांना केव्हाच माफ करून टाकले आहे!
Gujarat anti-terror Bill
Gujarat anti-terror Bill returned for 3rd time
-------
In France, kebabs get wrapped up in identity politics
In a country whose national identity is so closely connected to its cuisine, France's hard right has seized on a growing appetite for kebabs as proof of cultural "Islamisation".
Four kebab houses opened last month in Blois, bringing the total to over a dozen in the pretty Loire valley town where tourists come to see the castle. The far-right National Front party railed: "The historical center of Blois, the jewel of French history, is turning into an Oriental city".
The implicit message is clear: the now ubiquitous kebab, popular with the young and cash-strapped, is a sign that Middle Eastern culture has taken root in France, where not everyone is happy about the presence of 5 million Muslims.
"The kebab is a bit of a reflection of all the problems with immigration and integration in France," says Thibaut Le Pellec, founder of KebabFrites.com, a website that ranks kebab houses across the country and seeks to raise the reputation of the "kebabistes" who make and sell the food.
Damien Schmitz, who runs a kebab shop in Paris, puts it more bluntly: by criticizing the kebab, he says, "you can speak ill of Muslims without speaking ill of Muslims."
अरूणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट
अरूणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करताना राज्याच्या राज्यपालांनी गौ-हत्या हे त्यामागचं एक कारण आहे असं लिहिलं आहे अशी बातमी काल पासून फिरते आहे. राज्यपालांच्या त्या रिपोर्टमध्ये नक्की काय आहे आणि बातम्यांची हेडलाइन कशी दिशाभूल करणारी आहे ते दाखवणारा लेख.
http://www.opindia.com/2016/01/arunachal-pradesh-target-of-misinformati…
Here is the third para from report carried by The Hindu (emphasis mine):
The report, contents of which were accessed by The Hindu, says the first request for invoking Article 356 of the Constitution was made on December 17 by the Governor when demonstrators, led by Mr. Tuki and Speaker Nabam Rebia, “slaughtered a ‘Mithun’ [bovine] in front of Raj Bhavan.” The bovine is considered holy for Hindus. Mr. Rajkhowa also said Mr. Tuki was inciting Nyishi student bodies and other communal organisations against the Governor, referring to his “Assamese roots.” Mr. Tuki also belongs to the Nyishi tribe.
त्या पॅराग्राफमधील वाक्यांचा
त्या पॅराग्राफमधील वाक्यांचा अर्थ तसाच होतो.
१. निदर्शने करणार्यांनी राजभवनासमोर तो प्राणी मारला
२. निदर्शकांनी राज्यपालांच्या मूळस्थानावरून विद्यार्थ्यांना चिथावण्याचा प्रयत्न केला
असा अर्थ त्या पॅराग्राफमधील वाक्यांचा जाणवतो. या दोन कारणांवरून लॉ अॅण्स ऑर्डर धोक्यात आली असं कसं म्हणता येईल?
उदा. ही हेडलाइन
उदा. ही हेडलाइन बघा.
http://www.firstpost.com/politics/holy-cow-governor-cited-cow-slaughter…
या मथळ्यावरून 'गोहत्या = बिघडलेली कायदा सुव्यवस्था' असं राज्यपाल म्हणतायत असा बोध होतो. राजभवनासमोर मुद्दाम उचकवायला प्राणी बळी दिले गेले याचा उल्लेखही नाही.
संशयास्पद
राज्यपाल एक म्हणतात आणि मुख्यमंत्री वेगळं काही तरी म्हणतात. कोण खरं बोलतंय? राज्यपालांचा अहवाल मुख्यमंत्र्यांनाही न दाखवणं संशयास्पद आहे -
Mr. Tuki said the Governor had sent two reports on January 15 and January 18. However, he said that the “Governor’s representative” refused to divulge to him the contents of the two reports saying it was a “secret”.
यूपीमध्ये सरकार आहे का नाही/
यूपीमध्ये सरकार आहे का नाही/ मुख्यमंत्र्याकडे बहुमत आहे का नाही असे प्रश्न नव्हते. राजभवनाला घेराव घालून अधिवेशन होऊ न देणे हे झालं नव्ह्तं. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावरच केंद्राला शिफारस करायची का?
एनीवे, माझा मुद्दा अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट बरोबर्/चूक हा नाहीच. मुद्दा मिसलिडिंग बातमीचा आहे.
एका व्यक्तीला विनाकारण
एका व्यक्तीला विनाकारण (त्याने एखादा पादार्थ खाल्ला इतक्याशा संशयावरून) जमावाने येऊन ठार मारणे हे वर दिलेल्या कोणत्यही कारणापेक्षा कायदा सुव्यवस्था अधिक बिघडल्याचे लक्षण आहे. तेव्हा कायदा सुव्यवस्था राज्याचा विषय असल्याने केंद्राने हस्तक्षेप न करणे योग्य म्हटले गेले होते. तो राज्याचा विषय आहे असेही सांगितले गेले होते. मग आसामात मात्र वेगळा न्याय दिसतोय!
बातमी "चुकीची" किंवा मिसलिडिंग वाटली नाही. मुळ घटनेभोवती असलेल्या संशयाच्या वलयाला अधिक गडद करणारी वाटली आणि ते आवश्यकच होते.
कालचा लोकसत्तेचा अग्रलेखही केंद्राचे स्पष्टपणे वाभाडे काढणारा होता. बातमी त्यामनाने सौम्य आहे.
ऑपइंडिया
हे संस्थळ गंमतीशीर दिसतंय.
- शनि शिंगणापूर प्रकरणाबाबतची त्यांची भूमिका स्त्रियांना प्रवेश नको अशी असावी.
- मोदी प्रसारमाध्यमांना मुलाखती का देत नाहीत ह्याचं स्पष्टीकरण.
- 'फेक एनजीओं'नी केलेल्या प्रचंड धर्मांतरांमुळे भारताच्या डेमोग्राफीत घातक बदल.
- नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर फेसबुक काही चुकीचं करत नाही; लोक उगीच साप साप म्हणून भुई धोपटत आहेत.
- पाकिस्तानशी वाटाघाटी करण्यात अर्थ नाही.
बाकी आमिर खान, केजरीवाल किंवा तत्सम सिक्युलर लोकांवर टीका वगैरे वगैरे.
आजच वाचलं याबद्दल, बहुधा
आजच वाचलं याबद्दल, बहुधा प्रज्ञा पवार यांनी केलं आहे भाषांतर.