नियती
गर्दीत लहान मुलासारखं
शरिर हरवुन बसतं कधीतरी
सैरभैर, प्रश्नांकित!
आणि मनाला आपण हरवु देतो
कधीकधी वेगळं जगता यावं
म्हणुनसुद्धा....
पण नियती कधीच
हरवुन बसत नाही स्वतःला
आंधळ्या डोळ्यांनी
नी बांधलेल्या हाताने
धापा टाकत मूकपणे
चालत रहाते.
तिच्यात सापळ्याआड धडधडणारं
असं काहीच नसतं
कुण्याच्याही स्पर्शाने
उभे रहाणारे किंवा सुटणारे
प्रश्न नसतात
भंगणारी आकांक्षा,
फाटलेलं ह्र्दय
शोकाचे सुर
पश्चातापाचे निश्वास
जखमा आणि सारं काही
शवपेटीत बंद.
आणि चालताना सोबत असते फक्त
एक न संपणारी शवयात्रा
निराशावाद नाही
वेलकम साठी धन्यवाद. प्रस्तुत कवितेत, मी निराशावाद मांडलेला नाही. उलट 'अहं ब्रम्हास्मि' ठळक करायचा प्रयत्न केलाय. देव, नियती सर्वश्रेष्ठ मानणारे लोक नियतीची ही बाजु पहात नाहीत. नियती ही मुळात पोकळ आहे आणि अद्वैत ही तिची अंधारपोकळी. याउलट प्रत्येक माणुस त्याच्यापरीने स्वतःसाठी समग्र आहे. दुखःवैभवाचे वरदान नियतीला नाही. जगण्याचे वेगवेगळे पर्याय आणि भावनांचे वेगवेगळे पदर नियतीकडे नाहीत. पण मानवाकडे आहेत.
आवडली
हे विशेष. विस्तृत प्रतिसाद सावकाश देईन.