Skip to main content

जालवाणी

मी एक यूजर तू एक यूजर
इंटरनेटचा जागर जागर

अक्षरांचे दिवे हवे हवे
पोस्टिंग रोज नवे नवे

अभिव्यक्तीचे दौडले घोडे
प्रतिसादांची चकमक झडे

मुद्द्याचं बोला गुद्द्याचं सोडा
चर्चाविश्वाचा अडलाय गाडा

अनुभव सारे टंकित करा
नाहीतर सरळ स्माईली ठेवा

मेल दुपानी चॅट सुहानी
स्टेटसच्या हाका करुण वाणी

पेजेसची नुसती भागमभाग
सगळीकडे ब्लॉगमब्लॉग

लाईक्सचा सुळसुळाट, कमेंट्सचा खणखणाट
एकावर एक उताऱ्यांचा गजबजाट

मनातलं तळं फेसबुकवर बघा
दिसता काठ उचलून धरा

वॉलची उंची ओलांडून जाऊ
तिकडे काय डोकावून पाहू

प्रत्येक प्रश्नावर गूगलची सत्ता
गूगल सांगेल देवाचा पत्ता

विकीच्या झाडाखाली समाधी लावा
इंटरलिंकिंगचा साक्षात्कार नवा

अॅड्सचं जंगल सांभाळा माऊस
क्लिक्सची तस्करी पैशाचा पाऊस

नेटचं विश्व सपाट की गोल
सध्यातरी व्याख्येचा झोल

नेकी कर शेअरिंग में डाल
ऑनलाईन बंदे तेरी दुनिया कमाल...

श्रावण मोडक Fri, 17/02/2012 - 16:39

'...झोल'पाशीच कविता संपली. पुढची द्विपदी उगाच आली. ती आधी कुठं बसवली असती तरी चाललं असतं. :)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/02/2012 - 05:36

In reply to by श्रावण मोडक

मलाही असंच वाटलं. पण 'नेकी कर और शेअरिंग मे डाल' फारच आवडलं.

खणखणाट, सुळसुळाट हे शब्दही मजेशीर वाटले. कविता आवडलीच.

सुवर्णमयी Sat, 18/02/2012 - 01:27

काय झाले रे उत्पल?
नेटचं विश्व सपाट की गोल
सध्यातरी व्याख्येचा झोल
:)

सन्जोप राव Sat, 18/02/2012 - 06:28

प्रत्येक प्रश्नावर गूगलची सत्ता
गूगल सांगेल देवाचा पत्ता

हे भारीच. 'जे गूगलवर नाही, ते अस्तित्वातच नाही' असे समजणार्‍यांसाठी.
कविता आवडली.

ऋषिकेश Sat, 18/02/2012 - 12:18

कविता मजेशीर आहे.. ब्लॉगम्ब्लॉग वगैरे आवडले
कवितेला बडबडगीतासारखा फिल आहे..नाद आहे..
मस्तच!

उत्पल Sun, 19/02/2012 - 12:31

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...

श्रावण, तुम्ही म्हणताय तसं मलाही वाटून गेलं एकदा...पण अदिती म्हणतात तसं 'नेकी कर...'मला आवडलं होतं, ठेवायचं होतं आणि ते आधी घेणं योग्य वाटत नव्हतं..म्हणून शेवटीच ठेवलं...अर्थात कुठल्याही कलाकृतीचे एकापेक्षा जास्त शेवट संभवतात....त्याला ही कवितासुद्धा अपवाद नाहीच..... :)