ऐसी अक्षरेची यशस्वी वाटचाल
मराठी दिनानिमित्त्य मटाने नेटवरील संकेतस्थळांचा आढावा घेतला आहे. त्यामधे 'ऐसी अक्षरेचा' समावेश नसता तरच नवल वाटले असते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12009945.cms
येथे मूळ बातमी वाचता येईल. या लेखात 'ऐसी 'ची माहिती तसेच संहिता जोशी, राजेश घासकडवी आणि राजेंद्र बापट या ऐसी अक्षरेच्या संस्थापकांचा उल्लेख आहे.
त्यांचे विशेष अभिनंदन.
ऐसी अक्षरेला अनेकोत्तम शुभेच्छा.
सोनाली
अभिनंदन पण....
बातमी वगैरे आली, अभिनंदन.
पण स्पष्टपणे सांगायचं तर अजूनही मलातरी ऐसीचं खास वेगळेपण काय हे समजलेलं नाही.
मी इथे येतो, ती इतर थिकाणी होतात, तशाच उत्तमोत्तम चर्चा वगैरे वाचायला, वेळ घालवायला.
पण कुणी विचारलं की "इथेच का येतोस" तर मात्र मी काहीही सांगू शकणार नाही.
ह्या दिशेने चालकांनी काही केल्यास आणि आहे तितक्यतच समाधानी न राहिल्यास सामान्य वाचक म्हणून शतशः आभारी राहिन.
थेट बोलल्याबद्दल क्षमस्व; पण आंतरजाल ह्या माध्यमाचे महाप्रचंड स्थितिज(पोटेंशिअल) लक्षात घेता अजूनही प्रचंड करण्यास वाव आहे. "इतके पुरेसे नाही" असे आम्ही म्हणत राहिलो तरच ती वाटचाल वेगाने होइल./
म्हणूनच "इतके पुरेसे नाही" असे मी इथे जाहिरपणे म्हणत आहे.
--मनोबा
"मन" यांना उत्तर
"ऐसी अक्षरे वर खास वेगळेपण काय " किंवा "ऐसी अक्षरेवर जे काही चाललेले आहे ते इतके पुरेसे नाही" असे प्रश्न आणि अशी विधाने "ऐसी अक्षरे" वर करता येतात; असं उत्तर मनोबा यांना देता येईल असं वाटतं.
अर्थातच यात काहीही "खास नाही" किंवा "इतके पुरेसे नाही" असं म्हणण्याचं स्वातंत्र्य त्यांना "ऐसी अक्षरे" वर आहेच :)
आभार
ऐसीअक्षरेच्या लेखक आणि वाचकांचे सर्वप्रथम आभार.
माहिती देण्याबद्दल सुवर्णमयी यांचे आभार. ऐसीअक्षरेची दखल घेतल्याबद्दल श्री. प्रसाद ताम्हणकर आणि महाराष्ट्र टाईम्सचेही आभार.