Skip to main content

तारकांचा चंदेरी झगमगाट


तारकांचा चंदेरी झगमगाट
मोहवत असला कितीही
तरी सूर्य झाकोळता येत नाही त्यांना
हे सत्य कधीच बदलत नसतं.

आपलं आपण ठरवावं प्रत्येकानं
आकाशातल्या चांदण्या मोजत
बसून राहावं रात्रभर गच्चीवर .
कि तळपणारा सूर्य
डोक्यावर घेवून
दिवसभर चालत जावी
आपापली वाट ….

दिवस ओसरेपर्यंत….!
आयुष्य सरेपर्यंत….!!

- गजानन मुळे

चक्रपाणि Wed, 29/02/2012 - 00:47

कविता बोधप्रद, अभिनिवेशशून्य (आणि त्यामुळेच आकलनीय आणि साधीसोपी) झाली आहे.
एक सुचवणी -
दिवस ओसरेपर्यंत….!
आयुष्य सरेपर्यंत….!!

या दोन ओळी कवितेत नसल्या तरीही तिच्या सौंदर्यास आणि गर्भितार्थास बाधा यायची नाही. उलट या ओळी नसल्याने कवितेचा गर्भितार्थ अधिक उठून दिसेल, असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.