म्हातारी मांजर
आमच्या गावाला शेजारील घरात एक मांजर पाळलेली होती.( नाव वैगेरे काही ठेवत नाही) तिची प्रकट होण्याची कथा अशी.
सन १९८९ साली म्हणे महापूर आलेला. आमच्या गावात सुद्धा खूप नुकसान झालं. पुराच्या आदल्या रात्री शेजारील काका मासे पकडण्यासाठी खाडीत गेलेले, पाणी एकदम जोरात तेव्हा त्यांना एका तरंगणार्या चिंपाटावर* २-३ दिवसांची सापडली. तिला घेवून ते परत आले गावात पण पाणी आलेलं. अक्खा गाव उंचीवर गेलेला. मांजर पण वाचली.
ती मांजर इतकी भारी होती म्हणजे कधी चोरी करणार नाही. कधी म्याव म्याव करून त्रास नाही. जेवढं देणार तेवढंच खाणार.२०१३ मध्ये शेजारी वारले. त्याचे घरवाले तिला पुरेशी इज्जत(जी सर्व म्हातार्याना पाहिजे असते) देत नसल्याने, ती आमच्या कडे आली. शेवटच्या दिवसात ती फक्त डाळ-भात खायची
शेवट
तर अश्या शाकाहारी मांजरीचे केस गळायला लागलेले, सतत झोपून राहायची. दुपार पर्यंत काही खायला उठली नाही म्हणून आई उठवायला गेली. ती हि नश्वर दुनिया सोडून गेली होती(मे २०१३,वय ~२३)
चिंपाट म्हणजे?
..