ऋणनिर्देश
'ऐसी अक्षरे'चा हा कितवा तरी दिवाळी अंक. अंक प्रकाशित करताना, नेहमीप्रमाणेच, बऱ्याच ढोबळ आणि किरकोळ चुका बाकी आहेत. त्या करून ठेवणाऱ्या निरागस लोकांची नावं नेहमीप्रमाणेच जाहीर केली जाणार नाहीत. कोणाकोणाकडे, कोणकोणत्या विषयांवर लेख(न) मागवलं होतं आणि त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या, हे सांगण्याची नवी पद्धतही सातव्या अंकात सुरू होणार नाही.
मात्र गेल्या वर्षभरात अनेकांनी खाजगीत, जाहीररीत्या आमच्या चुका काढल्या. त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून 'ऐसी'साठी कामं करायला लावलं आहे. अशाच एका अंकावर टीका केल्यामुळे संदीप देशपांडेवर अंकाच्या दृश्यरूपाची जबाबदारी ढकलली. दुसरं नाव नंदनचं. या इसमानं अजूनपर्यंत एकदाही 'ऐसी'च्या दिवाळी अंकात लेखन न केल्यामुळे त्याला अंकाच्या कामाला जुंपण्याचा निर्णय परस्परसंमतीनं घेण्यात आला. तिसरं नाव अबापट यांचं. 'तुम्ही स्वतःला फार उच्चभ्रू समजता; 'ऐसी'ची प्रतिमाच काय ती उच्चभ्रू आहे' असं त्यांनी बोलण्याची खोटी, त्यांनाही या गर्तेत ओढून घेतलं आहे.
तर गेल्या वर्षभरात 'मीटू' प्रकरण फार गाजलं आहे. ३_१४ विक्षिप्त अदितीला जर 'मीटू' म्हणायचं असेल तर आधी तिथे आणखी एक स्त्री पाहिजेच. (नाहीतर 'मीवन' नाही होणार!) मुक्तसुनीत यांनी फेसबुकवर अथक श्रम करून अवंती कुलकर्णी यांना 'ऐसी'च्या कामाला लावलं आणि त्यामुळे अदितीला ... असो. बाकी नेहमीचे कलाकार म्हणजे चिंतातुर जंतू, आदूबाळ आणि राजेश घासकडवी आहेतच. या लोकांनी नेहमीपेक्षा फार जास्त काम केलं नाही, किंवा त्रासही दिला नाही. अनेक लेखांचं मुद्रितशोधन करून देणारे मिहिर आणि अमुक कधीतरी अंकात आणि 'ऐसी'वर लेखन करतील अशी आशा ही या ठीकानी, या माध्यमा तून व्यक्त करन्यात येत आहे.
एक नाव ऋणनिर्देशात जरूर दिसेल असं व्यक्तिगत संवादात कबूल केलं होतं. त्यांनी या प्रसिद्धीला थोडा विरोधही करून बघितला. दुदैवानं आज त्या हयात नाहीत. "विनोद विशेषांकासाठी काही लेखन द्याल का आणि काही नावंही सुचवाल का", अशी चौकशी केल्यावर कविता महाजनांनी दत्तू बांदेकरांबद्दल स्वतः लिहिलेला लेख पाठवला. बांदेकरांचं काही लेखन पाठवलं. एक भाषांतरित लेखही पाठवला; आणि 'ऐसी'बद्दल आपला मित्र बब्रूवान रुद्रकंठावार यांच्याकडे शब्द टाकून त्यांचाही लेख आणून दिला. त्यांच्या अकाली मृत्यूबद्दल नेहमीच हळहळ राहील.
'ऐसी'ला मदत करणाऱ्या, वेळेत लेख पाठवणाऱ्या आणि ऐनवेळीही लेख पाठवणाऱ्या सगळ्यांचे आभार. प्रस्थापित माध्यमांशी तुलना करता संस्थळाची ताकद असते ती देवाणघेवाण करण्यात, संवाद घडवून आणण्यात. तर सर्व वाचकांचेही आभार; विशेषतः 'धुरिणत्वाच्या छायेतील विखुरलेली सत्ये' असल्या अवली शीर्षकांचे लेख प्राण कंठाशी आणत वाचून त्यावर प्रतिक्रियाही देण्याबद्दल विशेष आभार.
ऋण
एका अनाम इजिप्शियन चित्रकाराचे ऋण मान्य केलेले नाहीत. अंक येऊ लागला आणि लगेच ऐसीच्या संपादकांना स्वामित्वहक्काचं काही पडलेलं नाहीए हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
उगाच इकडे तिकडे खोचक टिका
उगाच इकडे तिकडे खोचक टिका करणारे आम्ही दिवाळी अंकासाठी एखादा लेख पाडू शकत नाही. अंकासाठी काम केलेल्या लोकांचे आभार.
मुखपृष्ठ
वरच्या आडव्या पट्टीत 'विनोद विशेषांक मुखपृष्ठ' हा दुवा आहे. तिथून अंकाचं मुखपृष्ठ, अनुक्रमणिका सापडतील.
लैच गचाळ
मुखपृष्ठ कैतरी फालतू केलं आहे. कारागिरी, रंग, फॉन्टस, विषय आणि सादरीकरण सगल्याच बाबतीत दारिद्र्य जाणवतेय. चक्क टेक्निकल टर्मिनेटरसारखा फॉन्ट दिवाळी अंकाच्या टायटलला तेहि विनोदी विषेषांकाला हाच सलामीचा विनोद असेल तर चालू द्या.
तेच रडगाणं सजावटीचं, टिका करुनही असे काम असेल तर अवघड आहे.
(ह्या टिकेत मला काम मिळावे हि अपेक्षा नाही, इच्छाही नाही)
ओ बेरजेचं राजकारण करणारे चालक
ओ बेरजेचं राजकारण करणारे चालक मालक त्या अस्वलाला ढाबळीत घ्या हो जरा ... बऱ्याच वर्षात काही लिहिलं नाही त्याने . आणि अभ्याला पण ...
सिंहावलोकन करून ऐसीच्या
सिंहावलोकन करून ऐसीच्या मागील तीनचार दिवाळी अंकांत मधच नव्हता चित्कारणारे अस्वल या २०१८ चा दिवाळी अंक वाचताना गडबडा लोळणार आणि मग झोपी जाणार?
कालनिर्णय दिवाळी अंक नेहमी
कालनिर्णय दिवाळी अंक नेहमी चांगला असतो.
आजपर्यंत अर्धा प्रसिद्ध झालेला ऐसी अक्षरे दिवाळी २०१८ अंक कोणत्याही दुसऱ्या अंकांपेक्षा सरस आहे.
सर्व लेखक आणि ऐसी संपादक मॅाण्डळाचे काम भारी झाले आहे.