Skip to main content

शब्द

शब्द भोई अरूपाचे
शब्द दूत अमूर्ताचे
शब्द धूसर सावली
शब्द झळाळ बिजली
शब्द हलाहल निळे
शब्द सृजनाचे मळे
शब्द व्योमापार शिडी
शब्द गहनडोही बुडी
शब्द आभासी रिंगण
शब्दापार मुक्तांगण

सामो Thu, 05/09/2019 - 02:22

खूपच सुंदर!!
एकेक उपमा पाणीदार मोत्यासारखी पारखून वापरली आहे.