Skip to main content

माय (मराठीची) poem

मराठी असे आमुची मायबोली
जरी एव्हरी डे यूजमध्ये नसे
नसो आज ऐश्वर्य त्या माऊलीला
सक्सेसची तिच्या होप आम्हा असे ॥१॥

जरी पंचखंडांतही मान्यता घे
पाॅवरफुल नि पाॅप्युलर इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही
तिचा offspring तीस केवीं त्यजी ॥२॥