अखंड हिंदुस्तानचा नकाशा बघून शेजारच्या काकांची झाली निराशा.
मेंफीस, अमेरिका, ४ सप्टेंबर.
शेजारचे काका बालपणापासूनच देशसेवा आणि समानतेचं बाळकडू पीत आलेले आहेत. काकांनी शाळेत कायमच चांगले गुण मिळवले आणि काका सीओईपीमधून इंजिनियर झाले. त्यानंतर काकांनी कमी पगाराच्या नोकऱ्या डावलून अमेरिकेत शिकण्याचा निर्णय घेतला. बफेलोमधून मास्टर्स केल्यावर काकांनी मेंफीसमध्ये मोठ्या पगाराची नोकरीही मिळवली. मात्र राष्ट्रप्रेम झळकवण्याची संधी मिळत नसल्यामुळे काका बरीच वर्षं दोलायमान अवस्थेत होते. सिलिकन व्हॅली आणि सॉफ्टवेअरमध्येच सगळ्या जागतिक प्रश्नांचं उत्तर दडलेलं आहे, याबद्दल काकांची आता खात्री पटली आहे. फेसबुकवर राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाल्यामुळे काका गेली अनेक वर्षांच्या दोलायमान अवस्थेतून आनंदी अवस्थेत पोहोचले होते.
मात्र आता ते बदललं आहे. अफगाणिस्तानावर पुन्हा तालिबाननं कब्जा मिळवण्याच्या निमित्तानं फेसबुकवर फिरणाऱ्या अखंड हिंदुस्तानच्या नकाशामुळे शेजारचे काका निराश झाले आहेत. "आमच्या काळी असं नव्हतं; असं मी म्हणालो तर तुम्ही त्याची लिबरल टिंगल कराल. पण तेच खरं सत्य आहे. आमच्या काळी आम्ही अखंड हिंदुस्थान म्हणजे फक्त भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश असं समजत नव्हतो. अक्साई चीन हा सुद्धा भारताचा भाग आहेच. शिवाय नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश, आणि जावा हासुद्धा अखंड हिंदुस्थानचा भाग होता. तुम्ही म्हणाल की रावण हा राक्षस लंकेचा राजा होता, तर लंका भारताचा भाग नसणार. तर तसं नाही. श्रीरामांनी रावणाचा वध करून बिभीषणाला लंकेचा राजा केलं, तेव्हापासून लंका नेहमीच भारताची ऋणी राहिली आहे. लंकेच्या नावातला श्री हा श्रीरामांकडून आलेला आहे. दक्षिण भारतातल्या राजांचा जावा-सुमात्राशी फक्त व्यापारच नव्हता. तर तो सगळा भारताताच भाग होता. तुम्ही पु. ल. देशपांडेंचं लेखन आतापर्यंत फक्त विनोद म्हणून वाचलं असेल. पण ते तेवढंच नाहीये. त्यांच्या लेखनातूनही तुम्हांला समजेल की भारताचे राजे तेव्हा इंडोनेशिया, बाली आणि बोर्नियोवरही राज्य करत असायचे. अंगकोर वाटतर विष्णूचं मंदिर आहे. म्हणजे तो अखंड भारतच ना?"
"आजकालचे लिबरल लोक तालिबानला नावं ठेवतात, म्हणून अफगाणिस्तान नको म्हणतात. पण पाहा, आपल्या होळी सणातच भांग समाविष्ट आहे. आणि अफगाणिस्तानातून सगळ्यात जास्त कसली निर्यात होते, अफूची! पाहा, हा सगळा आपलाच प्रदेश आहे. तुम्ही ज्यांना तालिबान म्हणता ते खरं तर ताल-ब्राह्मण आहेत. तालिबान हा काळानुसार झालेला अपभ्रंश आहे," काका खेदानं मान हलवत म्हणाले.
"पण आजकाल लोकांना आपल्या खऱ्या इतिहासाची काही पडलेली नाही. त्यांचं सगळं लक्ष स्वातंत्र्यलढा आणि नेहरूंकडेच लागलेलं असतं. आणि भारताच्या गौरवशाली आधुनिकपूर्व इतिहासाचा कुणी विचार करत नाहीत. त्यामुळे मी हताश, निराश आणि हतोत्साह होतो. पण आपला भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल आहे."
कॅलिफोर्निया!
California = कपिलारण्य, हे विसरलात!
(बादवे, 'Guatemala = गौतमालय' ही लोणकढी 'व्युत्पत्ती' दुसऱ्यातिसऱ्या कोणी नव्हे, तर खुद्दस्वयं सावरकरांनी ठोकून दिलेली आहे.१)
(आमची अटकळ: सावरकर बाकी काहीही असू शकतील, परंतु मूर्ख खचित नसावेत. त्यामुळे, ही 'व्युत्पत्ती' त्यांनी बहुधा टंगिन्चीक पद्धतीने ठोकून दिली असावी, अशी आमची अटकळ आहे. बोले तो, आपले 'अनुयायी' म्हणवून घेणारी, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता नसणारी बिनडोक मंडळी, आपण ठोकून दिलेले कायकाय 'बाबा वाक्यं प्रमाणम्' म्हणून खपवून घेतील, हे अजमावण्यासाठी त्यांनी हळूच सोडून दिलेली ती एक फुसकुली असावी, अशी शंका आम्हांस येते. आणि, while that फुसकुली stank to heaven, ती अशा रीतीने खपून गेलेली पाहिल्यावर स्वयं सावरकर all the way to the bank खदाखदा हसत गेले असले पाहिजेत, याची आम्हांस खात्री आहे.)
----------
१ संदर्भ: 'जात्युच्छेदक निबंध', पृष्ठ १४, प्रकरण १.६ ('परधार्जिणें विटाळवेड'), पहिलेच वाक्य. 'गौतमालया'बरोबरच तेथे 'झाांझीबार = हिंदू-बाजार' हेही ठेवून दिलेले आहे. अत्यंत गंभीरपणे. 'बाजार' हा शब्द म्लेंच्छोद्भव आहे, ही बाब सोयिस्करपणे बासनात बांधून. असो चालायचेच.
!
आजकालचे लिबरल लोक तालिबानला नावं ठेवतात, म्हणून अफगाणिस्तान नको म्हणतात. पण पाहा, आपल्या होळी सणातच भांग समाविष्ट आहे. आणि अफगाणिस्तानातून सगळ्यात जास्त कसली निर्यात होते, अफूची!
काय पण लॉजिक आहे!
(अवांतर: अफू आणि भांग हे दोन पूर्णपणे वेगळे, दोन पूर्णपणे वेगळ्या वनस्पतींपासून बनणारे पदार्थ आहेत. दोन्ही पदार्थ अमली आहेत, याव्यतिरिक्त त्या दोहोंचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.)
पुरोगामी म्हणतात जेव्हा पासून
पुरोगामी म्हणतात जेव्हा पासून मोदी सत्तेत आले तेव्हा पासून भारत आपला भारत वाटत नाही.
उजवे म्हणतात काँग्रेस सत्तेत आली की हा आपला हिंदुस्तान वाटत नाही .
Sounth इंडियन म्हणतात उत्तर भारत परका देश वाटतो.
स्वतच्या शेजारी राहणारे पण म्हणतात हा आपल्यातला वाटत नाही
मग नकाशात दाखवलेला प्रदेश हा अखंड भारत आहे असे नक्की कोणाच्या भावना आहेत.
ओह नो!
आयला! म्हणजे (चू. भू. द्या घ्या):
१. जगाचे जीडीपी आत्ताच्या तुलनेत एक दशांश होईल
२. जगातील अर्धे लोक भुकेकंगाल होतील
३. जगभरचे शेतकरी आत्महत्या करू लागतील
४. वैद्यकीय सेवेची वाट लागेल.
५. शिक्षणाच्या आईचा घो होईल
६. शेकडो कोटी स्त्रीभ्रूण धोक्यात येतील
७. भ्रष्टाचार हाच आचार होईल.
८. सर्व जग अस्वच्छ आणि प्रदूषित होईल
इ.इ.
अखंड हिंदुस्थानचे इतर भाग नकाशात दिसत नाहीत
Central Asia = आर्यांचे उगमस्थान
Guatemala = गौतमालय
Budapest = बुद्धप्रस्थ
Caspian Sea = कश्यप समुद्र
Thames नदी = तमसा नदी
आणि काही राहिलंच तर वसुधैव कुटुंबकम्!