अद्भुताचे निळे पाणी
anant_yaatree
आडबाजूच्या अंगणी
बिना खांब तुळयांचा
एक वसतो महाल
जीवलग कवितांचा
नभापार पोचतसे
त्याची बेलाग ही उंची
रेलचेल महालात
जे न देखे रवि त्याची
महालात जाण्यासाठी
जिना जपल्या शब्दांचा
आणि उतरण्या साठी
सोपान हा गहनाचा
चुनेगच्ची सौधावर
नवरस पुष्करणी
पितो मन:पूत तेथे
अद्भुताचे निळे पाणी
परवलीची एकच
खूण इथे चालतसे
एका हृदयीचे दुज्या
सोपवावे लागे पिसे
कविता आवडली. पिसें शब्द
कविता आवडली. पिसें शब्द बऱ्याच वर्षांनी पाहिला. “अद्भुताचे निळे पाणी” ही कल्पना वाचून जीएंची आठवण झाली.