शेजारच्या काकूकाकांनी केसावरून गाठला स्वर्ग
कोथरूड, १२ फेब्रुवारी
शेजारच्या काकांना साबुदाण्याची खिचडी खूपच आवडते. "माझ्याएवढी साबुदाण्याची खिचडी कुणालाच आवडत नाही,?" असं काका संध्याकाळी कॉलनीतल्या मुलांना सांगत होते. दर शनिवारी संध्याकाळी काका साबुदाण्याची खिचडी करतात. "आपल्याकडे पाहुणे बोलावायचे तर ते शनिवारी संध्याकाळीच" असंही काकांनी ठरवून टाकलं आहे.
काकांचं खिचडीवरचं प्रेम बघून शेजारच्या काकूंनी त्यांना खिचडी करायलाही शिकवली आहे. अशाच एका शिकवणीसत्रानंतर त्यांना खिचडीमध्ये केस सापडला. केस कुणाचा यावरून काका-काकूंनी चिकार खल केला. केस लहान असल्यामुळे तो काकांचा आहे, अशी शंका पाहुण्यांनाही आली असती. पण काकू खूप शिकलेल्या आहेत. काकू म्हणाल्या, "कशावरून हा केस काकांचाच आहे? माझे केस गळतात; आणि मी आजवर पूर्ण टकली झाले नाही याचा अर्थ मला नवीन केस येतात. हे नवे केस आधी लहान असतील आणि नंतर लांब होतील. अशा एखाद्या तरुण केसांपैकी कुणी अकाली वृद्ध होऊन गळला नसेलच याची काय शक्यता किती? तर काकांच्या डोक्यावर किती केस आहेत ते मोजावं लागेल; आणि मग माझ्या डोक्यावर किती तरुण केस आहेत ते मोजावं लागेल; त्यावरून काकांच्या डोक्यावरचा केस होता का माझ्या, याची निव्वळ शक्यता वर्तवता येईल. या केसाचे डीएनए तपासल्याखेरीज हा केस कुणाचा हे ठामपणे सांगता येणार नाही!"
काकूंचा हा पवित्रा बघून काकांना अभिनव कल्पना सुचली. काका काकूंपासून फक्त दोन फूट अंतरावर आले आणि म्हणाले, "तू नेहमी माझ्या बाजूनं बोलतेस, नेहमीच माझी बाजू घेतेस आणि आता मला खिचडी करायलाही शिकवली आहेस. तर पुन्हा केसांवरून स्वर्ग गाठण्याची सोय परक्या कुणाला मिळू नये म्हणून मीही आता माझे केस तुझ्याएवढेच लांब राखणार आहे. तुझ्या केसांसारखेच दिसण्यासाठी मी माझ्या केसांना रंग लावून काळे करायला सुरुवात करणार आहे. म्हणजे पुढच्या वेळेस कुणाचा केस यावरून जे काही होईल, त्यात तुला माझ्या बाजूनं एवढं तुंबळ युद्ध करावं लागणार नाही." असं म्हणून शेजारच्या काकांनी काकूंच्या दोन पिना आपल्या केसांमध्ये अडकवल्या.
केस म्हटल्यावर तो डोक्यावरचाच
केस म्हटल्यावर तो डोक्यावरचाच का? केसांचे उगमस्थान अन्य ठिकाणी असू शकत नाही काय? केसाचा आकार व तंतुजन्यता यावरुन डिटेक्टिव कथेतील एखादा जासूस त्याचे उगमस्थान नक्कीच शोधून काढू शकेल. केस तो शेवटी केसच मग तो इथला काय अन तिथला काय? असा युक्तिवाद काही जण करु पाहतील. पण तो फसवा आहे. तुम्हाला मग रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, लंगडा,तोतापुरी अशा स्थानमहात्म्य असलेल्या आंब्याचा भाव एकच असतो का? आंबा तो आंबा मग तो इथला काय आन तिथला काय? असे म्हणुन चालत नाही. थोडक्यात जिओटॅगला महत्व आहेच.
एक प्रयोग करा. एक केस घ्या. तूर्तास त्याच्या उगमस्थानाचा विचार करु नका. त्याचे एक टोक डाव्या हाताच्या चिमटीत पकडा. उजव्या हाताच्या आंगठा व मधले बोट यांच्या नखांमधे पकडून तो घट्टपणे खालपासून वरपर्यंत खर्रकन ओढा. एक स्प्रिंग तयार होईल. आता केसांचे उगमस्थान बदलून दुसरा एखादा केस घ्या. त्यावर हाच प्रयोग करा. त्यातील तंतुजन्यता पहा. त्यातून केसांचे उगमस्थान व तंतुजन्यता याचे एक समीकरण तयार होईल. ते मनातच ठेवा.
अवांतर- डीएनए चाचणीसाठी केस घेतल्यास त्याचे उगमस्थान कोणते यावर त्याचे रिझल्ट अवलंबून नसतात
चूक!
"कशावरून हा केस काकांचाच आहे? माझे केस गळतात; आणि मी आजवर पूर्ण टकली झाले नाही याचा अर्थ मला नवीन केस येतात. हे नवे केस आधी लहान असतील आणि नंतर लांब होतील. अशा एखाद्या तरुण केसांपैकी कुणी अकाली वृद्ध होऊन गळला नसेलच याची काय शक्यता किती? तर काकांच्या डोक्यावर किती केस आहेत ते मोजावं लागेल; आणि मग माझ्या डोक्यावर किती तरुण केस आहेत ते मोजावं लागेल; त्यावरून काकांच्या डोक्यावरचा केस होता का माझ्या, याची निव्वळ शक्यता वर्तवता येईल. या केसाचे डीएनए तपासल्याखेरीज हा केस कुणाचा हे ठामपणे सांगता येणार नाही!"
चूक! हा केस शेपटीचा आहे. घरातली मांजर खिचडीवर बसली होती, किंवा कसे, ते तपासा आधी!
(एलेमेंटरी, माय डियर चडफडकर!)
----------
(टीप: काकाकाकूंपैकी कोणास - अथवा दोघांसही - शेपटी असल्यास मंडळ जबाबदार नाही.)
केसपुराण किंवा इतर कोणतेही उपपुराण करण्यात वेळ जातो.
एवढाच उद्देश असतो म्हाताऱ्यांचा. पटकन काढून टाकला आणि पदार्थ खाल्ला यास महत्त्व नसते.
----
बशीचा आकार - -
खिमट ( पॉरिज) खाण्यासाठी बनवलेला आकार आहे. काही जण या आकाराची पितळी परात वापरतात. पेण,अलिबागकडे यामध्ये पोहे ( साधे कच्चे) टाकून त्यावर चहा ओततात आणि चहापोहे खातात अजूनही. किंवा चहापोळीसुद्धा.
तरीच!
मला अगाथा ख्रिस्ती अतिशय बोअर वाटायची. दोनशे पानांचे जर पुस्तक असेल, तर शंभरावे पान उलटले, तरी हिचे आपले पात्रपरिचय, वातावरणनिर्मिती वगैरे दळण अजून चालूच असायचे. कंटाळा यायचा, नि पेशन्स सुटायचा. नि मग, सरळ एकशे नव्व्याण्णवाव्या पानावर जाऊन अखेरीस या सगळ्या रामरगाड्यातून नेमके निष्पन्न काय होते (The butler did it!), ते जाऊन तपासून ‘हुश्श!’ म्हणण्याची घाई अनावर व्हायची. आणि, एकदा ते जर केले (किंवा करावेसे वाटले), तर मग मजा काय राहिली?
—————
त्याउलट, आमचा वुड्डहौससाहेब प्रचंड आवडायचा. विनोदी तर होताच, परंतु तेवढेच कारण नाही. सर्वप्रथम, पुस्तक दोनशे पानांचेच, परंतु, सुरुवातीस पात्रपरिचय, वातावरणनिर्मिती वगैरेंत दीड ते दोन पाने – अगदीच गंगेत घोडे न्हायले, तर तीन पाने – यांहून अधिक तो कधीही खर्ची करीत नसे. आणि त्यानंतर मग सरळ प्लॉटच्या कोलांट्याउड्यांना सुरुवात व्हायची. पात्रांना येनकेनप्रकारेण एकाहून एक अशक्य गोत्यांत अडकवून, शेवटी मग काहीही करून सुटका करायची, हा कथेचा एकंदर स्थायीभाव. त्यात परत विविध प्रसंगी केवळ वुड्डहौसच करू शकेल असे पात्रांच्या तात्कालिक विचारप्रक्रियांचे विश्लेषण. मजा यायची. आणि त्यात पुन्हा, अखेरीस हे सगळे कसे संपते, हे तपासून पाहायची अजिबात घाई होत नसे. कारण, अखेरीस काय घडते, हे तसेही महत्त्वाचे नसायचेच मुळी. वुड्डहौससाहेब अखेरीस येनकेनप्रकारेण प्लॉटला God’s in His Heaven, All’s right with the world या अवस्थेपर्यंत पोहोचवणार आहे, याची आगाऊ खात्री असायची. तेथे पोहोचविण्यापूर्वी तो पात्रांना कोणकोणत्या अग्निकंकणांतून उड्या मारायला लावतो, याबद्दल खरी उत्सुकता असायची. त्यात खरी मजा असायची. It used to be the journey, and not the destination, that was important. And enticing.
—————
तर, सांगण्याचा मतलब:
१. अगाथा ख्रिस्ती मला बोअर वाटायची.
२. लेखिका यातून काही हिंट घेईल, तर शपथ!
बऱ्याच जणांचं असे मत आहे खरे.
मला त्यांच्या कथेमधील 'जेन मार्पल' हे पात्र रोचक वाटते. एका लहान गावात, एकटी रहाणारी वृद्ध स्त्री. पण आजूबाजूच्या घडामोडींबद्दल जागरूक असणारी. कुठलीही घटना घडली, की तिला तशीच दुसरी कुठली घटना किंवा व्यक्ती आठवते. मानसशास्त्राचा गंध नसलेली, परंतु मानवी व्यवहार, वर्तन, आणि नातेसंबंध याची अचूक जाण/माहिती तिला असते. आणि त्या आधारावरच घटना, परिस्थिती आणि संबंधित पात्रे यांची संगती लावून ती केस सोडवते.
पण कथा संथगतीने पुढे सरकते हे बरोबर आहे.
केस सिरीयस झाली आहे.
काकांनी पटकन तिथल्या बुककेस मधे ठेवलेला चष्मा डोळ्यांवर ठेवून, केस विंचरले असते (कंगव्याने) तर.. अशी वेळ आलीच नसती.
काकु समजुतदार म्हणुन केस घटस्फोटापर्यंत गेली नाही. समजा काकुंनी रागाने सुटकेस मधे कपडे कोंबुन (हिंदी पिक्चर मधल्या हिरवीणीसारखी) बाहेरची वाट धरली असती म्हणजे मग?
काकांना केसकर वकीलांना फोन करावा लागला असता. आणि शेजारच्या केसरकर काकु म्हणाल्या असत्या.."मला वाटलच होते असे होणार.पर्वा केशरी भात करण्यासाठी साधे केशर मागीतले तर म्हणते कशी.. काश्मीरची तिकीटे काढायची आहेत. तिकडे जाऊन आले की देईन. आगऊच आहे, हं, आता म्हणत बस म्हणावे केसरिया बालमा..."
पण काकुंचे माहेर केसनंद इंडस्ट्रीजच्या परिसरात असल्याने त्या शहाण्या आहेत.
हे काय?
अशा काका काकुंचं आयुष्य ( ६५+बहुतेक) कसं असतं हे डोकवायची संधी मला मिळाली नाही.