Skip to main content

खेकडा आणि कासव

"काकी, काल तुम्ही खेकड्याचं कालवण दिलं ते आम्हाला दोघांनाही खूप आवडलं!"

"छान. रेसिपी हवीय का तुला?"

"नाही हो, तुमच्या हातची चव ती निराळीच. रेसिपी दिलीत तरी मला तसं बनवता नाही येणार. बाय द वे, तुम्ही कासवाचं कालवण बनवता का?"

"नाही गं. आम्ही कासव नाही खात."

"हे छान झालं!"

"म्हणजे?"

"म्हणजे आम्ही पुढच्या महिन्यात युरोप टूरला चाललोय. आमचं टेरापिन कासव महिनाभर सांभाळाल का?"

तिरशिंगराव Sat, 09/04/2022 - 14:24

तिन्ही स्वल्पकथा एकाच धाग्यांत लिहिल्या असत्या तर आमचा कळफलक कमी झिजला असता. अपेक्षा फार असल्याने सदगदित्
झालो, म्हणून
का सवें ही आसवें ? अशी स्थिती झाली.

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 02:32

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)