Skip to main content

चला अयोध्येला जाऊ

विडंबन

लई दिसाची हौस गड्या
चला आता भगवी करु
माणसं भरूनी एसी गाड्या
चला अयोध्येला जाऊ

खळखट्याक पाट्या तोडा
सुपारीच्या सभेत व्हिडीओ लावा
सैनिकांनो गाडीत बसा
मी हेलिकॉप्टरमध्ये बसून
जगाला कौतुक दावू
चला अयोध्येला जाऊ

अयोध्या नगरीत जाऊ
देव रामलल्ला पाहू
आपण सगळे आळीपाळीने
नवहिंदुत्वाचा शेंदूर वाहू
चला अयोध्येला जाऊ

© भूषण वर्धेकर
१८ एप्रिल २०२२
दौंड

तिरशिंगराव Tue, 19/04/2022 - 18:34

'चला आता भगवी करु', या ओळीची रचना समजली नाही. त्यांत भगवी हा शब्द एका भलत्याच शब्दाशी उच्चार साधर्म्य राखून आहे त्यामुळे कविला काय सुचवायचे आहे ते स्पष्ट होत नाही.

'न'वी बाजू Tue, 19/04/2022 - 18:40

In reply to by तिरशिंगराव

त्यांत भगवी हा शब्द एका भलत्याच शब्दाशी उच्चार साधर्म्य राखून आहे

तुम्ही तो शब्द त्या अर्थाने वाचलात. मी 'भगवी करणे' हा वाक्प्रचार 'लाल करणे'च्या धर्तीवर वाचला. ज्याचात्याचा नज़रिया. चालायचेच.

स्वयंभू Tue, 19/04/2022 - 22:32

In reply to by तिरशिंगराव

मी 'चला आता भगवं करू' असं लिहिले होते. पण नंतर 'भगवी करू' लिहिलं.
पण काही लोकांना उगाचंच हिंदुत्ववादी उमाळा येतो मग उसासे टाकून जूनेच मुद्दे उकरले जातात. महत्त्वाचे मुद्दे रखडले जातात.
सगळे येडछाप आहेत भारतातील राजकारणी. मीम मटेरियल नेते लाभणं हसण्यावारी ठिक.

स्वयंभू Wed, 11/05/2022 - 12:29

In reply to by अतिशहाणा

लई  दिसाची  हौस  राया
चला  आता  पुरी  करू  - २
चला  जेजुरीला  जाऊ  - ६

एक  आना  अबलक   घोडा  - २
त्याची  रेशीम  खाली  सोडा  - २
माग  बसा   मी  पुढ्यात  बसते  - २
जगाला  कौतुक  दावू
चला  जेजुरीला  जाऊ  - ६

जेजुरी  गडावर  जाऊ  - २
देव  माल्हारीला पाहू  - २
आपण   दोघ  जोडीजोडीने   -
बेल  भंडारा  वाहू 
चला  जेजुरीला  जाऊ  - ६

Rajesh188 Wed, 11/05/2022 - 14:12

महाराष्ट्र मध्ये पंढरपूर आहे .महाराष्ट्राचे आराध्य दैवत,शिर्डी आहे,तुळजापूर आहे.
शेवटी श्रध्देचा खेळ आहे.
यूपी वाले स्वतःला श्री रामाचे वंशज समजतात एक पण चांगला गुण अंगात नसून पण .
मग महाराष्ट्र नी विठोबा चे वंशज समजा.
दक्षिण भारतीय कधी aayodhya , काशी हे शब्द तरी उच्चारतात का?
राज ठाकरे लं हिंदुत्व दाखवण्यासाठी तिरुपती,पंढरपूर, का चालत नाही.