प्रवास
अथांगाचा तळठाव
अज्ञेयाचा पैलतीर
विराटाची पराकाष्ठा
सूक्ष्मातील शून्याभास
खुणावती ऐसे सारे
अनाहूत अवचित
जरी जटिल तरीही
जीवा लावतात ध्यास
नादावतो या ध्यासाने
ठेचाळतो जागोजाग
असे खडतर तरी
भूल घाली हा प्रवास
!
यावरून एक जुना विनोद आठवला.
एकदा एक मनुष्य आपल्याशीच मोठ्याने गाणे म्हणत असता त्याच्या मित्राने ते ऐकले, नि त्यासि वदता झाला: “मित्रा, तू रेडिओवर का बरे गात नाहीस?”
मनुष्य, खूष होत्साता: “का रे बुवा? मी इतका चांगला गातो काय?”
“तसे नव्हे रे! परंतु, रेडिओ बंद करता येतो.”
—————
(अवांतर: रेडिओ त्यासाठीच असतो.)
अर्थातच नाही!
स्वयंघोषित गायकाची मुंडी पिरगळून त्यास गप्प करण्याने जितके समाधान मिळेल तेवढे रेडिओची खुंटी पिरगळून तो बंद करण्याने मिळेल काय?
अर्थातच नाही!
त्या परमोच्च सुखाची सर दुसऱ्या कशालाच नाही.
मात्र, समाजात काही गोष्टी करता येत नाहीत. सबब, कशाचीतरी तहान दुसऱ्या (समाजमान्य) कशानेतरी भागवावी लागते, झाले.१
(या प्रकारास sublimation असे संबोधले जाते.)
असो चालायचेच.
—————
१ “तुझे अपना नहीं सकता, मगर इतना भी क्या कम है, कि कुछ घड़ियाँ तेरे ख़्वाबों में खो कर जी लिया मैं ने?”? (साहिर लुधियानवी.)
ब्रह्मांड
संपूर्ण ब्रह्मांडात फिरवून आणण्याची ताकद असलेली ही कविता, तिसऱ्या ओळीत आम्हां मर्त्य मानवांना IPL मध्ये पोचवते.