Skip to main content

खजिना

होतात निरुत्तर प्रश्न
त्या तिथे अचानक जावे
शब्दांचा मांडुनी खेळ
तर्कास जरा डिवचावे

तर्काचे पडतील मोडून
मग सुघड, नेटके इमले
पडझडीत येईल हाती
शब्दांच्याही पलिकडले

तो अनवट खजिना येता
हातात क्षणार्धापुरता
मागणे अधिक ना उरते
चांदण्यात सचैल भिजता