नवीन ऐसीवर नवीन चर्चा.
गुहेत राहणाऱ्या आदिमानवापासून ते आज पृथ्वीच्या पाठीवर कुठेही राहात असलेल्या माणसांत सामान धागा कोणता? माणसाच्या माणूसपणाची कधीही न बदललेली ओळख कोणती?
प्रयत्न…
शेपूट नसणारा, (मागच्या) दोन पायांवर उभे राहून चालणारा प्राणी?
(शिवाय, हाताच्या आंगठ्याची काही विशिष्ट रचना असल्याबद्दल कधीकाळी काही वाचले होते, परंतु ते नक्की काय, ते आता आठवत नाही. (चूभूद्याघ्या.))
(बादवे, गुहेत राहणारा आदिमानव हसत असे काय? नक्की ठाऊक नाही.)
खूप समान थागे आहेत
माणूस हा प्राणी आहे. थोडाफार बुद्धिमान आहे पण फक्त पृथ्वी वरील जिवसृष्टी च्या तुलनेने.
प्राण्यांची एक जन्मजात वृत्ती असते हुकूमत गाजवणे.
ही नैसर्गिक वृत्ती माणसात पण आहे उलट अगदी तीव्र आहे.
वंश वाढवण्यासाठी सभोग करणे ही प्राण्यांची वृत्ती आहे नैसर्गिक तीच वृत्ती माणसात पण आहे.
फक्त कृत्रिम नैतिक अनैतिक बंधनात त्याचे वर्गीकरण केले जाते.
माझी च हुकूमत असली पाहिजे आणि ती प्रस्थापित करण्यासाठी हिंसा करणे ही नैसर्गिक वृत्ती प्रयेक प्राण्यात आहे पण माणसात ती तीव्र आहे.
हिरोसीमा, नागसकी उत्तम उदाहरणं.
जमिनी वर सत्ता स्थापित करणे ही जन्मजात वृत्ती जीव सृष्टी मध्ये आहे तशी ती माणसात पण आहे.
आदिमानव ते आताच मानव.
काही फरक नाही मानव हा पहिला पण प्राणी होता आणि आज पण प्राणी च आहे.
रानटी प्राणी.
काही ही फरक पडलेला नाही
.
"गुहेत राहणाऱ्या आदिमानवापासून ते आज पृथ्वीच्या पाठीवर कुठेही राहात असलेल्या माणसांत सामान धागा कोणता? माणसाच्या माणूसपणाची कधीही न बदललेली ओळख कोणती?"
हा चर्चेचा विषय निवडला होता. पण तो "समरी" या बॉक्समध्ये टाकल्यावर दिसत नाही. एनीवे. चर्चा धागा नीट चालत नाही यावर चर्चा न करता मूळ चर्चेच्या विषयावर चर्चा व्हावी.