शिक्षण आणि विटाळ पाळणे
"शिक्षण प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. पण शिक्षित म्हणजे कोण? हा प्रश्न मनात येणारच. ज्ञान आपण गुरु/ शिक्षकाकडून मौखिक आणि पुस्तकी स्वरुपात प्राप्त करतो. या शिवाय जगाचा व्यवहार पाहून ही आपण ज्ञान प्राप्त करतो. ज्याला प्राप्त ज्ञानाचा अर्थ कळतो आणि प्राप्त ज्ञान कृतीत उतरवू शकतो तो व्यक्ति शिक्षित, असे म्हणता येईल. एक निरक्षर व्यक्तीही शिक्षित असू शकतो आणि उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर आणि अर्थशास्त्री ही अर्ध-शिक्षित असू शकतात. असे अर्ध-शिक्षित लोक त्यांच्या कृतीने ते अशिक्षित आहेत हे दाखविण्याचा कोणताही मौका सोडत नाही.
आता दूसरा प्रश्न विटाळ म्हणजे काय? स्त्रीच्या शरीरातून महिन्यातून काही दिवस अनुपयोगी आणि अपायकारक स्त्राव बाहेर पडतात. या दिवसांना, स्त्रीची मासिक पाळी किंवा स्त्री विटाळशिण झाली, असे शब्द भाषेत आहे. अश्या अनुपयोगी, अपायकरक स्त्रावतून कुणाचाही जन्म होत नाही. अजून तरी जेंव्हा स्त्री आणि पुरूषांचे बीज एकाकार होतात आणि त्यांचे पोषण स्त्रीच्या गर्भात होते, तेंव्हाच नवे बाळ जन्माला येते. विटाळातून कुणाचाच जन्म होत नाही.असो. स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडणारे अनुपयोगी आणि अपायकरक स्त्राव जमिनीवर पडू नये, त्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून आजच्या आधुनिक स्त्रीया पैड इत्यादि वापरतात. पण शंभर वर्षांपूर्वी आपल्या देशात अधिकान्श स्त्री आणि पुरुष अंतर्वस्त्र वापरत नव्हते. मी स्वत: सहावीत गेल्या पहिल्यांदा अंडर वेयर घातली होती. ही 1980 पूर्वी महानगरातील परिस्थिति होती. बहुतेक ब्रा-पेंटी इत्यादिंचा वापर महानगरात 100 वर्षांपूर्वी सुरू असेल. अजूनही 100 टक्के ग्रामीण भागात या अंतर्वस्त्रांचा प्रसार झाला नसेल. पूर्वीच्या काळात स्त्रीच्या शरीरातील बाहेर पडणारे अनुपयोगी आणि अपायकरक स्त्रावाने घरातील आणि बाहेरचे वातावरण प्रदूषित होऊ नये यासाठी उपाय शोधणे गरजेचे होते. या शिवाय मासिक पाळीच्या काळात रक्तस्त्राव होण्याने स्त्रीला शारीरिक विश्रांतीची ही गरज असायची. त्या काळच्या शिक्षित आणि ज्ञानी वर्गाने स्त्रीला विहीरीतून पाणी काढणे, जात्यावर पीठ दळने, इत्यादि अनेक शारीरिक कष्टांच्या कामांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली. स्त्री विटाळशिण झाली की तिला विश्रांति मिळावी या हेतूने विटाळशिण स्त्रीला वेगळे ठेवण्याची परंपरा समाजात रूढ झाली. त्याकाळच्या सामाजिक स्वास्थ्य दृष्टीने ती व्यवस्था सर्वोत्तम होती. आजच्या काळात अधिकान्श कामांसाठी आधुनिक उपकरण उपलब्ध असतात तरी ही शिक्षित डॉक्टर स्त्रीला मासिक पाळीच्या काळात जास्त शारीरिक श्रमांचे काम न करण्याचा सल्ला देतात.
काळानुसार समाज आणि परिस्थिति बदलत रहाते. कोणतेही विधान करण्यापूर्वी त्याकाळच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितींचा विचार करणे ही गरजेचे असते. मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते. पण चिंतन आणि मनन करण्याची क्षमता नसलेले अर्ध-शिक्षित सर्व जुन्या सामाजिक परंपरांबाबत निरर्थक विधान करतात त्यासाठी हा लेख.
प टाईट
न बा, काका फेसबुकावर भक्तुल्ल्यांच्या बिनडोक पोस्टवर रिप्लाय म्हणून काहीबाही लिहितात आणि तिकडे येडपट लोकांचे लाइक्स मिळाले की उत्साहाने तेच मटेरियल इथे कॉपी पेस्ट करतात.
काकांना विटाळशीण बायांचा एवढा कळवळा आणि सार्वजनिक आरोग्याची इतकी काळजी असेल तर सरकारला लाडक्या बहिणींना चार दिवस खास सुट्टी द्यायला लावण्याकरता त्यांनी काही आंदोलन वगैरे करायला पाहिजे. तारा भवाळकरांची लायकी काढण्याची उठाठेव त्यांना कशाला (संदर्भ फेबु) ? स्त्रियांच्या 'अपायकारक' स्त्रावांपेक्शा काकांचे अपायकारक विचार आणि ते आवडणारे xx हा चिंतेचा विषय आहे.
.
स्त्रियांच्या 'अपायकारक' स्त्रावांपेक्शा काकांचे अपायकारक विचार आणि ते आवडणारे xx हा चिंतेचा विषय आहे.
ते तर झालेच. परंतु, गेला बाजार त्यांच्याकडून आपण हीच अपेक्षा करू शकतो. आश्चर्य याचे वाटते, की या सगळ्या प्रकाराला (आणि यांना – म्हणजे, काकांना) काकू कशा काय टॉलरेट करतात.
की, कदाचित परंपरावादी बायका या परंपरावादी पुरुषांहूनही अधिक भिकारचोट असाव्यात? The female of the species is deadlier than the male म्हणतात, तद्वत्?
.
मानवी शरीरात केवळ प्रजोत्पादनासाठी म्हणून तयार होणाऱ्या सर्व "स्त्रावांचे" स्त्री/पुरुष असे वर्गीकरण केले, तर कोणतीही विदा गोळा करायचा प्रयत्नही न करता मी खात्रीने सांगू शकते की पुरुषांकडून अनुपयोगी स्त्राव नक्कीच जास्त होत असणार. किमान स्त्रियांना तो टाळता येत नाही. आणि त्या महिन्याला एखादंच स्त्रीबीज वाया घालवतात!
पुरुषांनी असा अनुपयोगी स्त्राव केल्याबद्दल त्यांनाही बाहेर बसवून ठेवावे. त्यासाठी त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवावे लागेल आणि त्यांंचे इंटरनेट कानेक्शन रेशन करावे लागेल. बायकांनी महिन्यातून एकदा आणि पुरुषांनी रोज काही तास बाजूला बसावे.
चांगला मुद्दा!
शिवाय, स्त्रियांकडून होणारे ‘अनुपयोगी’ स्राव हे बव्हंशी अनैच्छिक (involuntary) असावेत. उलटपक्षी, पुरुषांकडून होणारे ‘अनुपयोगी’ स्राव हे बव्हंशी very much ऐच्छिक (voluntary) (किंवा, anything but अनैच्छिक) असावेत. (चूभूद्याघ्या.)
जाणूनबुजून केलेल्या ‘अनुपयोगी’ स्रावांकरिता बाजूला बसविण्याची (झालेच तर इंटरनेट कनेक्शन राशन करण्याची) शिक्षा बोले तो पुष्कळच सौम्य झाली. खरे तर या गुन्ह्याकरिता याहून कडक शिक्षा पाहिजे!
(अर्थात, आमचे पूर्वज तसे शिक्षित आणि ज्ञानी असल्याकारणाने, पुरुषांनी जाणूनबुजून ‘अनुपयोगी’ स्राव स्रवू नयेत, यास्तव, तसे केल्यास अंधत्व येण्याची (अनाठायी) भीती त्यांनी घालून ठेवली होती, ही गोष्ट लक्षात घेता, पूर्वजांचा तथा परंपरेचा मान ठेवून, प्रस्तुत गुन्ह्याकरिता डोळे काढण्याची शिक्षा कशी वाटते? हिंदू तालिबान झिंदाबाद!)
करा गोळा
फक्त हवेत गोळीबार नको.
भारतात कुटुंब व्यवस्था नष्ट झाली तर च भारत बरबाद होईल हे त्रिवार सत्य आहे.
वाम पंथी लोक भारत कसा कमजोर होईल ह्या साठी च प्रयत्न करत असतात
म्हणून भारताच्या कुटुंब व्यवस्थे वर हल्ला करत असतात.
स्त्री मुक्ती म्हणजे काय?.हे अजून पण मला काय पूर्ण भारताला समजले नाही.. कुटुंब व्यवस्था नष्ट करून भारताला नष्ट करणे म्हणजे स्त्री मुक्ती हे वाम वाम पंथीय लोकांचे स्वप्न आहे.
स्त्री ही मानसिक दृष्टया पण कमजोर असल्या मुळे तिला च स्त्री मुक्ती नावाखाली टार्गेट केले जाते
???
स्त्री ही मानसिक दृष्टया पण कमजोर असल्या मुळे तिला च स्त्री मुक्ती नावाखाली टार्गेट केले जाते
स्त्री, मानसिकदृष्ट्या कमजोर???
विद्यमान स्त्रियांपैकी कोणी आजवर तुमच्या कानाखाली जाळ काढलेला नाही, हे त्यांच्या दुर्बलतेचे नसून सहिष्णुतेचे (आणि/किंवा भूतदयेचे) लक्षण असावे (चूभूद्याघ्या), असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.
बाकी चालू द्या.
(अतिअवांतर)
गांधीजींना एकदा एका पाश्चात्त्य पत्रकाराने म्हणे (मुलाखतीत) विचारले होते, की “Mr. Gandhi, What do you think of Western civilization?”, म्हणून. त्यावर गांधीजींनी उत्तर दिले होते, “I think it would be a good idea!”
आता, गांधीजींच्या witचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून हे ठीकच आहे. परंतु, वास्तववादी दृष्टिकोनातून जर पाहायचे झाले, तर, मी जर त्या पाश्चात्त्य पत्रकाराच्या जागी असतो, तर त्या उत्तरावरून जागच्या जागी गांधीजींना भोसडले असते. की ठीक आहे, आम्ही पाश्चात्त्य लोक तुझ्या म्हणण्याप्रमाणे uncivilized असूही कदाचित, परंतु, शिंच्या, तुझ्या देशबांधवांचे काय? (पण बोलूनचालून पाश्चात्त्य लोक पडले पराकोटीचे नम्र, त्याला कोण काय करणार?)
ही परंपरावादी हिंदू मंडळी (आणि विशेषेकरून त्यातील पुरुष), पाश्चात्त्य संस्कृतीपेक्षा आमची पारंपरिक हिंदू संस्कृती श्रेष्ठ म्हणून टेंभा मिरवितील. परंतु, सगळीकडे घाण नि ओल केल्याशिवाय साधे हगतामुतता येत नाही साल्यांना! आणि त्यातसुद्धा, सार्वजनिक ‘सुविधा’ असेल, तर विचारायलाच नको! ‘गर जहन्नम बर्-रू-ए-जमीं अस्त, हामी अस्तो, हामी अस्तो, हामी अस्त!’ सार्वजनिक स्वच्छता कशाशी खातात, याचा गंधही नसतो!
आजच सकाळचीच गोष्ट घ्या. मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ! (भारतातून बाहेर पडण्याच्या वाटेवर) गेलो होतो. एरवी चकाचक विमानतळ आहे. चेकइन काउंटर उघडायला वेळ होता, तोवर वाट पाहात बसलो होतो. म्हटले तेवढ्यात सार्वजनिक सुविधा वापरून घ्यावी. गेलो. कमोड तुलनेने खूपच स्वच्छ होता. मात्र, जमिनीवर थारोळे! आता, ती सार्वजनिक सुविधा स्वच्छ ठेवू पाहणाऱ्या सफाई कामगारांना मी याबद्दल दोष देणार नाही. ते बिचारे शक्य तितक्या तत्परतेने आपले काम करू पाहात असतात. परंतु, त्यांनाही मर्यादा आहेत! आपले पब्लिकच भिकारचोट आहे, त्याला कोण काय करणार! (आणि, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ही गत आहे – इतरत्र विचारायलाच नको.)
(बाहेर आल्यावर बायकोला वर्णन करून सांगितले. तिचे म्हणणे पडले, typical male problem आहे, म्हणून – नेम चुकतो. अरे, नेम चुकतो, पण इतका? म्हणजे, कमोडच्या सीटवर जर ओल सापडली असती, तर ते अर्थात गलिच्छ वाटले असतेच, परंतु निदान समजू तरी शकलो असतो, कदाचित अपेक्षेबाहेरचे वाटलेही नसते. परंतु, कमोड स्वच्छ आहे, कमोडची सीट कोरडी आहे, परंतु जमिनीवर मात्र सर्वत्र, जिकडे तिकडे चोहिकडे… जाऊदे! माणसाचा नेम इतकाही चुकावा?)
(आणखी एक प्रकार म्हणजे, आजकाल कमोड वापरतील. ते ठीक आहे. परंतु, त्याबरोबर कागद वापरणार नाहीत; परंपरेस अनुसरून पाणी वापरतील. तेही समजू शकतो; त्याशिवाय स्वच्छ वाटत नाही अनेकांना. पण, तसे करताना, सीटवर थारोळे केलेच पाहिजे काय? साधी सीट वर घ्यायला काय होते? तुमची स्वच्छता होते; पुढच्याला/पुढचीला त्यानंतर ती सुविधा वापरणे निव्वळ अशक्य होऊन बसते. परंतु, पुढच्याचा विचार करतो कोण? आपले काम झाल्याशी मतलब! हे काय civilizationचे लक्षण आहे?)
(कम टू थिंक ऑफ इट, सार्वजनिक ठिकाणी असताना जर तुम्हाला ‘लागली’, तर भारतात त्याकरिता किती ठिकाणी नि कितीशी ‘सोय’ आहे, आणि तिची अवस्था कितपत आहे? (स्त्रियांकरिताच्या ‘सुविधां’बद्दल तर बोलूच नये!) भारताला स्वातंत्र्य मिळून आज किती वर्षे झाली? एवढी मूलभूत गोष्टसुद्धा जर शक्य होत नसेल, तर हे काय civilizationचे लक्षण आहे? अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे?)
(नाही, पाश्चात्त्य जगतातसुद्धा या बाबतीत सर्वत्र आलबेल आहेच, असा माझा दावा नाही. तिथेही अनेकदा सार्वजनिक सुविधांमध्ये घाण आढळते; नाही असे नाही. परंतु, प्रमाण तुलनेने बरेच कमी आहे. म्हणजे, पाश्चात्त्य जगतात घाण हा कदाचित अपवाद असू शकतो; भारतात तो norm आहे. (म्हणजे, मुळात सुविधा उपलब्ध असली, तर!) अर्थात, अभिमान बाळगायला काही पैसे पडत नाहीत, म्हणा!)
Sorry, Mr. Gandhi! The Western world may, as you say, be uncivilized. But your average traditional Indian male, I am sorry to say, is neither uneducated nor uncivilized. Rather, he is uneducable and uncivilizable. So there!
.
अगदी!
Using a public toilet anywhere in India fills me with dread. त्यामुळे प्रवासाला निघताना आधी रस्त्यात उत्तम टॉयलेट असलेले रेस्त्रा कुठे कुठे आहेत याचा सर्व्हे घेऊनच निघावं लागतं.
भारतीयांना इकोलाय, कोलीफॉर्म वागैर जंतू इतके आवडतात, की त्यांनी ते भूजलात infuse करून ठेवले आहेत. इतकंच नव्हे, एखाद्या जलाशयात हे जंतू सुरक्षित पातळी ओलांडून वाढताहेत असा पुरावा मिळाला तरी त्या पाण्यात भारतीय अंघोळ करायला जातात.
…
Bacteriophages बोले तो, साध्या शब्दांत सांगायचे झाले, तर हिंदू (अथवा भारतीय नागरिक) व्हावेत, नव्हे काय?
(Correct me if I am wrong, परंतु, Bacteriophages या शब्दाच्या लॅटिन फोडीच्या अन्वये त्याचा अर्थ those who eat bacteria असा कायसासा व्हावा, नाही काय?)
(मग तसले bacteriophages – इच्छेने, वा नाइलाजाने – भारतात पुष्कळ असावेत. (चूभूद्याघ्या.))
असो चालायचेच.
bacteriophage : जिवाणूच्या…
bacteriophage : जिवाणूच्या पेशीमध्ये जाऊन अंतिमतः जिवाणूचा नायनाट करणारे विषाणू .
तर झाले असे की प्रयागराज मध्ये महाकुंभ निमित्ताने संगमावर रोज अनेक लाख लोकं पापक्षालनाकरिता डुबकी मारण्यास रोज जमत आहेत.
तिथल्या पाण्याच्या दर्जाविषयी राज्य प्रदूषण मंडळाने व नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल यांनी " हे प्रदूषित पाणी आहे , त्यात तुम्ही .... " वगैरे टिप्पण्या केल्या.
त्यानंतर गंगेच्या पाण्यात अकराशे प्रकारचे Bactetiophages आहेत , त्यामुळे ते ' वाईट " बोले तो कोलिफॉर्म्सना खाऊन टाकत आहेत असे ' संशोधन ' व असे 'संशोधक' निर्माण झाले ,व या कारणे गंगामैय्या मैली नसून त्याचे पाणी ' शुद्धच' आहे हे सांगण्याची त्यांच्यात चढाओढ लागली .
उत्तम प्रदेश चे आदरणीय मुख्यमंत्री श्री योगीजीं यांनी तर गंगेचे पाणी प्रदूषित ? हॅट !! , ते तर पिण्यायोग्य आहे असे सर्टिफिकेटही देऊन टाकले.
तर सध्या एकूण चाळीस , पन्नास कि पंचावन्न कोटी भाविकांनी पापक्षालनार्थ प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात डुबकी मारूनही तिथले पाणी पिण्यायोग्यच राखण्याचे कर्तृत्व या बॅक्टरिओफाजेस चे आहे असे अधिकृत मत असावे.
ही पार्श्वभूमी . बाकी आपण जाणते आहातच , तेव्हा .....
तर कधी भेटताय त्रिवेणी संगमावर ?
पश्चिमत्या संडास
म्हणजे ज्या वर, •••• टेकवून बसून संडास केली जाते.
ती पद्धत एक च व्यक्ती वापरत असेल तर उत्तम आहे पण सार्वजनिक ठिकाणी त्या पश्चिमत्या पद्धतीची संडास सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणारी आहेत
सरळ स्किन to स्किन कॉन्टॅक्ट येतो.त्वचेचा आजार असणारा व्यक्ती नी ते वापरले आणि त्या नंतर दुसऱ्या व्यक्ती ने ते वापरले तर जंतू संसर्ग पक्का होणार.
स्वच्छ दिसलें म्हणजे रोगजंतू मुक्त आहे हेच अशास्त्रीय आहे त्या पेक्षा भारतीय पद्धती च्या संडासात असा स्किन to कॉन्टॅक्ट येत नाही
शास्त्रीय दृष्टी कोनातून. अतिशय योग्य रचना भारतीय पद्धती मध्ये आहे.
…
सरळ स्किन to स्किन कॉन्टॅक्ट येतो.त्वचेचा आजार असणारा व्यक्ती नी ते वापरले आणि त्या नंतर दुसऱ्या व्यक्ती ने ते वापरले तर जंतू संसर्ग पक्का होणार.
त्याला उपाय आहे. कागदी टॉयलेट सीटकव्हर नावाचा एक प्रकार उपलब्ध असतो. सीटवर ते कव्हर ठेवायचे नि त्यावर बसायचे; स्किन-टू-स्किन काँटॅक्टचा प्रश्न उद्भवत नाही. शिवाय, त्याला पुढे एक फ्लॅप असतो, तो थेट संडासात सोडायचा असतो. ज्यायोगे, कर्तव्यपूर्तीनंतर संडास फ्लश केला असता, त्या पाण्याच्या जोराने तो फ्लॅप आणि त्यायोगे ते आख्खे कागदी सीटकव्हर पाण्यात ओढले जाऊन आपोआप विसर्जित होते.
सार्वजनिक ठिकाणी अशी कागदी सीटकव्हरे संडासात उपलब्ध करून देणे हे शक्य आहे. (पाश्चात्त्य जगतात सार्वजनिक संडासांतून ती बहुतकरून उपलब्ध असतातही.)
शास्त्रीय दृष्टी कोनातून. अतिशय योग्य रचना भारतीय पद्धती मध्ये आहे.
या मुद्द्यावर दुमत असू शकते. परंतु, मुळात आपण ज्याला ‘भारतीय पद्धतीचा संडास’ म्हणून संबोधता, त्यात (कोठल्याही अँगलने) ‘भारतीय’ असे काहीही नाही. हा squat toilet नावाचा जुना युरोपीय आविष्कार आहे.
- एक तर (वर म्हटल्याप्रमाणे) याचा उद्गम भारतीय परंपरेत नसून, हा ब्रिटिशांनी कधीतरी भारतात आणलेला प्रकार आहे.
- मुळात हा प्रकार युरोपात सार्वजनिक ठिकाणच्या संडासांत सफाई कामगारांना चटाचट स्वच्छता करण्यास सुलभ म्हणून आणला गेला. (घरगुती संडासांतून नव्हे.)
- पुढेमागे ब्रिटिशांनी आपल्या राजवटीत कधीतरी तो हिंदुस्थानात प्रचलित केला.
- मात्र, आजमितीस हा प्रकार पाश्चात्त्य जगतात क्वचितच आढळतो. (निदान मी तरी पाहिलेला नाही. परंतु, ‘क्वचित आढळतो’ असे विकिपीडिया सांगतो.)
- दुसरे म्हणजे, या प्रकाराचा वापर केवळ भारतापुरता किंवा भारतीय उपखंडापुरता मर्यादित नसून, पश्चिमेस पार इजिप्त वा तुर्कस्थानापासून ते पूर्वेस पार जपानपर्यंत अनेक देशांतून हा प्रकार वेगवेगळ्या वेळेस प्रचलित होता. (मात्र, यांपैकी अनेक ठिकाणी आजमितीस कमोडकडे स्थित्यंतराकडे कल आहे, असे कळते.)
- तुर्कस्थानात इस्तंबूलमध्ये तोपकापी राजवाड्यात या (तथाकथित ‘भारतीय’) प्रकारचे संडास मी स्वतः पाहिलेले आहेत. (म्हणजे, तेथे पूर्वी राहणाऱ्या सुलतानांचे वैयक्तिक संडाससुद्धा, नि आजकाल तेथे जाणाऱ्या टूरिष्टांच्या सोयीकरिता बांधलेले सार्वजनिक संडाससुद्धा.) (बादवे तुर्कस्थानातील सुलतानशाही ही पहिल्या महायुद्धानंतर १९२२ सालापर्यंत हळूहळू संपुष्टात आली.)
- (इस्तंबूलमध्ये इतरत्र मात्र (हॉटेलांतून वगैरे) जे संडास आढळले, ते सहसा पाश्चात्त्य पद्धतीचे आढळले. (चूभूद्याघ्या) अर्थात, याचा काही मी विस्ताराने अभ्यास केलेला नाही. आपले सहज निरीक्षण. त्रुटी असू शकतील.)
- मागे कधीतरी श्री. नितिन थत्ते यांनी सिंगापुरात कोठेतरी तथाकथित “भारतीय पद्धती”चा संडास पाहिल्याचा उल्लेख केल्याचे अंधुकसे आठवते. (चूभूद्याघ्या.)
- तुर्कस्थानात इस्तंबूलमध्ये तोपकापी राजवाड्यात या (तथाकथित ‘भारतीय’) प्रकारचे संडास मी स्वतः पाहिलेले आहेत. (म्हणजे, तेथे पूर्वी राहणाऱ्या सुलतानांचे वैयक्तिक संडाससुद्धा, नि आजकाल तेथे जाणाऱ्या टूरिष्टांच्या सोयीकरिता बांधलेले सार्वजनिक संडाससुद्धा.) (बादवे तुर्कस्थानातील सुलतानशाही ही पहिल्या महायुद्धानंतर १९२२ सालापर्यंत हळूहळू संपुष्टात आली.)
सांगण्याचा मतलब, तथाकथित ‘भारतीय पद्धती’च्या संडासाचा भारतीय परंपरेशी, भारतीय पद्धतीशी, वा भारताशी, अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. झालेच तर, सार्वजनिक ठिकाणी सफाई कामगारांस चटाचट साफ करावयास सुलभ, हा त्याचा एकमेव फायदा आहे. उलटपक्षी, सर्वत्र ओल व घाण होते, जेणेकरून कपडे खराब न करता ही सुविधा वापरणे कठीण होऊन बसते; झालेच तर, उकिडवे बसणे हे (विशेषेकरून वयस्कर माणसांना, झालेच तर सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांना वा सांधे अवघड झालेल्या लोकांना) त्रासाचे होऊ शकते, हे त्याचे प्रमुख तोटे आहेत.
पारंपरिक भारतीय पद्धत बोले तो परसात जमिनीत खणलेला खड्डा, त्यावर बसण्यासाठी टाकलेली दोन फळकुटे, मग खाली ती सर्व घाण तशीच, त्यावर माश्या घोंगावणार, मग एके दिवशी भंगी परस्पर वेगळ्या वाटेने तेथे येऊन ती घाण गोळा करणार नि डोक्यावर वाहून नेऊन कोठेतरी त्याचा निचरा करणार. एक तर गलिच्छ, आणि त्यात पुन्हा ती घाण ज्याला साफ करावी लागते, त्याला अवमानकारक. (पण त्याचा विचार तसाही कोण करतो? गरजूंनी श्री. मुल्क राज आनंद यांची ‘अनटचेबल’ ही कादंबरी तथा त्यातील शेवटचे विचारमंथन अवश्य वाचावे.) त्या मानाने मग ब्रिटिशांनी प्रचलित केलेले हे तथाकथित ‘भारतीय पद्धती’चे फ्लशचे संडास पुष्कळच बरे! (परंतु, आदर्श नव्हेत.)
अर्थात, इंग्रजी/युरोपीय/पाश्चात्त्य परंपरा यादेखील नेहमीच याहून फार वेगळ्या वा स्वच्छ होत्या, अशातला भाग नव्हे. दोनएक शतकांपूर्वीपर्यंत तेथेही स्वच्छतेच्या बाबतीत आनंदीआनंदच होता. वाचलेल्या वर्णनांप्रमाणे, ‘चेंबर पॉट’ नावाचे एक मडके असायचे. ते एरवी झाकून, लपवून ठेवायचे. गरज पडेल, तसे बाहेर काढायचे, त्यात हगायचे, मुतायचे, नि कार्यभाग साधल्यावर पुन्हा झाकून लपवून ठेवायचे. नि ते एकदा भरले, की मग, विचारू नका! ते स्वच्छ करण्याची जबाबदारी असणारी व्यक्ती (मग ती घरातली स्त्री असेल, किंवा मोलकरीण असेल) ही तो पॉट उचलणार, नि मागचापुढचा विचार न करता, जुन्या काळातील मुंबईतील गिरगावातील चाळींतील बायका ज्याप्रमाणे केसांच्या गुंत्यांपासून ते घरातील कचऱ्यापर्यंत काय वाटेल ते ग्यालरीतून थेट खालच्या चौकात फेकून देत, तद्वत, तो पॉट खिडकीतून थेट खालच्या रस्त्यात रिकामा करणार! मग त्या वेळेस जर नेमका कोणीतरी खाली त्या रस्त्यातून येतजात असेल, तर एक तो जाणे, नि दुसरे त्याचे नशीब जाणे! अन्यथा, कोणी जातयेत नसल्यास, रस्त्यात अगोदरच जमा झालेल्या घाणीत ही आणखी भर! यातून सार्वजनिक रोगराई प्रचंड वाढली. परंतु, हे समजण्याची अक्कल होती कोणाला?
सांगण्याचा मतलब, दोनएक शतकांपूर्वी युरोपातसुद्धा पारंपरिक सार्वजनिक स्वच्छतेची अवस्था यथायथाच होती, नि हिंदुस्थानापेक्षा फार वेगळी किंवा चांगली वगैरे मुळीच नव्हती. फरक इतकाच आहे, की काळानुसार ते लोक जागृत होत गेले नि बदलत, सुधारत राहिले; आम्ही मात्र नसत्या गोष्टींना ‘परंपरे’च्या नावाखाली कवटाळीत राहिलो, इतकेच नव्हे, तर त्यांचा उदोउदो करीत राहिलो, नि उलट ‘हेच कसे शास्त्रीय दृष्टिकोनातून बरोबर आहे’, नि ‘आमच्या पूर्वजांनी याचा अगोदरच कसा विचार करून ठेवला होता’ म्हणून त्याचे समर्थन करीत राहिलो. (मग भले त्याचा आमच्या पूर्वजांशी काहीही संबंध नसला, तरीही.)
अर्थात, चालायचेच, म्हणा!
फक्त विरोध साठी विरोध केला जातो बाकी काही तथ्य नाही
Mc काळात.
- Mc काळात किंवा त्या अगोदर स्त्रियांना शारीरिक त्रास होतो का तर होतो हे उत्तर आहे.
2) mc काळात स्त्रियांचा मूड मध्ये चढ उतार होतो का?
तर होतो हे उत्तर आहे
3) mc काळात शाqरीरिक कष्ट केल्या मुळे त्रास होतो का?
तर त्याचे उत्तर पण होच आहे.
4)शरीर ज्या ज्या गोष्टी शरीरा बाहेर टाकते ते सर्व टाकवू पदार्थ च असतात.
शरीरासाठी घातक पदार्थ च असतात.
साधे उदाहरणं मूत्र आणि विष्ठा.
म्हणून ह्या काळात
1) स्त्री ला आराम देणे.
2} मूड सारख बदलत असतो म्हणून संवाद कमी ठेवणे.
संवाद कमी तर वादविवाद होण्याचे प्रसंग पण कमी..
3) कष्टाच्या कामापासून स्त्री ला लांब ठेवणे हे विचारअगदी योग्य आहेत.
त्या मध्ये काही hi अशास्त्रीय नाही.
पूर्वी च्या लोकांना हे कळत होते पण आताच्या लोकांना कळत नाही.
!
म्हणून ह्या काळात
1) स्त्री ला आराम देणे.
स्त्रीला आराम ‘देणारे’ तुम्ही कोण, भो**च्यो?
उपकार करता काय, साल्यो?
2} मूड सारख बदलत असतो म्हणून संवाद कमी ठेवणे.
संवाद कमी तर वादविवाद होण्याचे प्रसंग पण कमी..
वा! भले शाबास!
म्हणजे, स्त्री राहिली बाजूला (शब्दशः ‘बाजूला’!); यात तुम्ही फक्त स्वतःची सोय पाहून घेतलीत! तीदेखील ‘स्त्रीच्या कल्याणा’च्या नावाने!
3) कष्टाच्या कामापासून स्त्री ला लांब ठेवणे
अरे, पण, आपल्याला (या काळात) किती कष्ट झेपतात, नि किती नाहीत, हे (प्रत्येक) स्त्री स्वतः ठरवून त्याप्रमाणे (किती कष्टाची कामे करायची, नि किती नाही, यासंबंधीचे) आपापले निर्णय स्वतः घेऊ शकत नाही/नव्हती काय?
हे म्हणजे, अगोदर स्त्रीला स्वतःची एजन्सी नाकारायची, नि मग आपण स्त्रीच्या भल्याचा कित्तीकित्ती विचार करतो, म्हणून ‘विचारवंत’ म्हणून मिरवायचे! भले शाबास!
आणि, शाबास राजेशभाऊ! तुम्हीसुद्धा त्यातलेच निघालात. म्हणजे, पटाईतकाका निदान उघडपणे हरामी तरी आहेत (नि म्हणूनच, त्यांच्याकडून आम्ही याहून वेगळी अपेक्षा ठेवीत नाही). परंतु, तुम्ही तर निरागस म्हणून वावरता, नि फुसकुल्या मात्र त्यांच्यासारख्याच सोडता. ब्राव्हो! व्हेरी वेल डन!
वाढते शहरीकरण
वाढते शहरीकरण नद्या, नाले , पिण्या योग्य पाणी प्रदूषित करण्यात सर्वात मोठा वाटा आहे
विविध रासायनिक उद्योग, मोबाईल, कॉम्पुटर साठी लागणारे धातू निर्मिती करनारे उद्योग हे पिण्या योग्य पाणीनद्या, प्रदूषित करण्यात सर्वात जास्त आघाडीवर आहेत.
कुंभ मेळ्या मुळे पाणी प्रदूषण होत असेल पण वरील सर्व कारणाने होणाऱ्या कारणानं पेक्षा अगदी नगण्या प्रमाणात
थोडेफार तथ्य आहे --
त्या काळात स्त्रियांना कष्टाची कामे करणे त्रासदायक होते . पण म्हणून चार दिवस तिला बाहेर बसवून ठेवायचे हे क्रौर्य नाही का? याला हात लावू नको, तिकडे जाऊ नकोस, विटाळ होईल असे म्हणायचे?
"विटाळ" हा शब्द अपमानास्पद नाही का? जो नैसर्गिक शरीरधर्म आहे त्याला अपवित्र म्हणायचे?
मी हे स्वतः पाहिलेले आहे (माझ्या घरी नाही.) खूप पूर्वी .पाळी चालू असलेल्या बाईला वेगळ्या खोलीत बसवायचे. तिचे जेवणाचे ताट उंबऱ्याजवळ ठेवायचे. तिने ते धुवून ठेवले की परत पाणी घालून घ्यायचे. असे बरेच काही,. पाळी चालू आहे म्हणजे स्त्रीला अगदी ओशाळवाणे वाटले पाहिजे अशी वागणूक द्यायची.
अर्थात आजकाल असे काही राहिले नाही. मुळात बाई चार दिवस बाजूला बसली तर घर चालणार कसे? पूर्वी एकत्रित कुटुंबात शक्य होते. आता व्यवहारिक दृष्टीने तसे परवडणारे नाही म्हणून ... पण काही कर्मठ घरात असे अजून चालते.
काळ बदलत गेला तसें बदल घडत गेले
आता सर्वाना माहित आहे mc काळात स्त्रियांना मानसिक आणि शारीरिक त्रास होतो.
घरात काम करणारी नोकरांनी नी ने ह्या
काळात विनंती केली की मी थोडे कमी काम करेन.
किती त्यांच्या मालकीनी मान्या करतील आणि तिला जास्त काम लावणार नाहीत? एक अशी निघाली, निघाला तरी खूप झाला.
खूप मोठ्या मल्टिनेशनल कंपनी मध्ये स्त्री काम करत आहे.
तिने सूट मागितीली.
किती कंपन्या देतील एक पण देणार नाही.
मग उपाय काय तर कायदा करा.
त्या काळात कायदा हा प्रकार नव्हता आणि असला तरी त्या कालची सरकारी यंत्रणा लोकांच्या घरात नाकनक्कीच खुपसत नव्हती आता चीं सरकारी यंत्रणा लोकांच्या बेडरूम पर्यंत पोचली आहे. (ही पण अधोगतो च आहे )
अशा काळात त्या काळात जो धार्मिक प्रभाव लोकांवर होता त्याचाच वापर करून.
स्त्रिया न आराम मिळावं हा उध्येश पूर्ण केला जात होता.
आणि सर्वात महत्व च भारतात त्या काळात mc काळात स्त्री ला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो हे माहित होते.
ही एक नैसर्गिक क्रिया आहे पूर्ण जगात सर्व स्त्रिया न असा त्रास होतोच.
मग जगात त्या वेळेस काय रीती रिवाज होते हा संशोधन आणि चर्चेचा विषय असला पाहिजे.
पण ती वृत्ती आणि प्रवृत्ती कुठेच दिसत नाही.
त्या मुळे आरोप, प्रत्यरोप ह्या व्यतिरिक्त कोणताच निष्कर्ष अशा चर्चेतून निघत नाही.
वांझोटी चर्चा असते
किती बोलतात हे पुरुष!
आमच्याकडे गेले काही महिने एक वयस्कर आणि खंगलेली मांजर आहे. तिचं वजन अडीच किलोसुद्धा नसेल; त्या हिशोबात तिर्री मांजर आकारानं आटोपशीर आहे आणि तिचं वजन जवळजवळ चार किलो आहे.
तर ही आजी-मांजर, किरण, दिवसातून किमान एकदातरी तिच्या लिटरबाहेर शू करते. तिला समजत नाही, शू बाहेर जात्ये, हे मुख्य कारण आहे. मग ते साफ करेस्तोवर घराच्या किमान त्या भागात मुताचा वास पसरतो. बरा अर्धा आणि मी यावर चर्चा करणं बंद केलं आहे. काय फायदा! काही नवीन प्रॉडक्ट दिसलं, काही नवीन कल्पना सुचली की ती वापरून पाहतो; पुन्हा शू तिच्या ट्रेबाहेर येत राहतेच.
आता ती शू करायला निघालेली दिसली की तिच्या मागे जाऊन तिला थोडं ट्रेच्या आत ढकलता येतं, ते करतो. तिनं शू आत केली की आम्ही बोलतो.
या प्रतिसादाचं तसं काही खास कारण नाही. इतरांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रावाबद्दल चर्चा सुरू आहे, असं वाटल्यामुळे किरणच्या शूची कथा लिहिली.
कुतूहल
अशा तऱ्हेने सतीप्रथेचे (झालेच तर केशवपन वगैरे रूढींचे) कोणते समर्थन पटाईतकाका देतात, याबद्दल ज्याम कुतूहल तथा उत्सुकता लागून राहिली आहे. (त्यादेखील आपल्या जुन्या परंपराच आहेत, नव्हे काय?)