anant_yaatree Fri, 18/04/2025 - 11:00 जर्द पिवळी दुपार दार ठोठावत येते आत आत कोंडलेले झळीनेच धुमसते घोर फुफाटा धुळीचा अणु रेणू तापलेला मृगजळाच्या काठाशी निवडुंग फोफावला गारव्याची शीळ निळी पुन्हा पुन्हा बोलाविते तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते Like Dislike Log in or register to post comments