Skip to main content

म्हशीची कथा

म्हैस निळसर काळ्या रंगाची असते. काळ्या रंगाची महिमाच न्यारी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी सृष्टी निर्मात्याला निळाई म्हणून संबोधित केले आहे. सृष्टीचे पालनहार विष्णुही श्याम रंगाचे आहेत. सृष्टीचे विनाशकर्ता भगवान शिव ही काळ्या रंगाचे आहेत. अर्थात ईश्वर किंवा गॉड हा काळ्या रंगाचा आहे. दुष्टांचा विनाश करणारी काळी माता ही श्याम रंगाची आहे. काळ्या गायीला पवित्र मानल्या जाते. म्हैस तर काळीच आहे. मग म्हशीच्या शरीरात देवतांचे निवास का नाही, म्हशीला कामधेनु प्रमाणे महत्व का नाही, असे अनेक प्रश्न माझ्या मनात नेहमीच येतात. पण एक कथा धार्मिक ग्रंथात आहे, महादेवाने महिषाचे रूप धारण केले होते. आज केदारनाथ मध्ये महादेवाच्या महिष स्वरूपाची पूजा होते. यमराज ही महिषावर स्वार होऊन पृथ्वी लोकातील प्राण्याचे प्राण हरतात. अर्थात काही प्रमाणात म्हशीला ही देवत्व प्राप्त झाले, असे म्हणता येईल. पण गायीशी तिची तुलना होऊ शकत नाही. कामधेनु समुद्र मंथनातून प्रगट झाली होती म्हणून गायीला देवांपेक्षा श्रेष्ठ दैवीय स्वरूप प्राप्त झाले. म्हैस तर पृथ्वी लोकातील, त्यात ही भारतातील मूळ प्राणी. हिंदीत म्हण आहे, "घर की मुर्गी दाल बराबर" म्हणून कदाचित म्हशीला दैवीय स्वरूप प्राप्त झाले नाही. आज ही म्हैस भारतात काजिरंगा आणि छत्तीसगढच्या जंगलात मूळ जंगली स्वरुपात आढळते. असो.

जंगलात राहणार्‍या म्हशीला पाळीव कोणी आणि केंव्हा केले. याबाबत अनेक कथा आहेत. राजा सत्यव्रताला स्वर्गात प्रवेश मिळाला नाही. ऋषि विश्वामित्राने सत्यव्रतासाठी पृथ्वीवर प्रतिसृष्टी निर्मित केली. विश्वामित्राने जंगलात राहणार्‍या म्हशीला दुधासाठी पाळीव प्राणी बनविले. त्याचे मुख्य कारण म्हैस ही गायी पेक्षा जास्त दूध देते. म्हशीच्या दुधात स्निग्धता आणि प्रथिने जास्त असतात. म्हशीचे दूध प्राशन करून शरीर बलवान बनते. याशिवाय म्हैस शांत स्वभावाची असते. विश्वामित्राला हेच पाहिजे होते. चक्रवर्ती सम्राट नहुषपाशी म्हशीचे दूध प्राशन करून बलवान झालेले सैन्य होते म्हणून त्याला स्वर्गाचे इंद्रपद मिळाले. सदेह स्वर्गात जाऊन इंद्रपदावर बसणारा एकमात्र मानव, हा सम्राट नहुष होता. म्हैस शक्तीची प्रतीक आहे. गाय मात्र दीन दुबळ्यांचे प्रतीक. राजाच्या प्रमुख राणीला राजमहिषी म्हणून संबोधित केले जाते. राजगौ म्हणून नाही. हीच आहे म्हशीची महत्ता. म्हशीचे दूध प्राशन करून पंजाब, हरियाणात पैलवान तैयार होतात. महाराष्ट्रात ही कोल्हापूर क्षेत्रे म्हशीचे दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तिथे ही पैलवान जास्त आहे. कोल्हापूर येथील म्हशीच्या दुधाची रबडी प्रसिद्ध आहे. तीन दिवस नृसिंहवाडी आणि कोल्हापुरात होतो. कोलेस्ट्रॉल वाढण्याची पर्वा न करता रोज म्हशीच्या दुधापासून बनलेल्या रबडी वर ताव मारला. सैन्यात जाण्याची इच्छा असणार्‍या, खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या मराठी तरुणांनी म्हशीचे दूध अवश्य प्राशन केले पाहिजे.

गाय म्हातारी झाली किंवा तिने दूध देणे बंद केले की तिला गोपालक गोशाळेत सोडतात. तिथे जागा नाही मिळाली की रस्त्यावर सोडतात. जिथे कचरा खात गाय शेवटची घटका मोजते. याशिवाय गो तस्कर आणि गो भक्त यांच्यात होणार्‍या हाणामारीत अनेकांचे प्राण ही जातात.

म्हातार्‍या म्हशींची काळजी घेण्यासाठी गोशाळा प्रमाणे म्हैसशाळा नाही. अधिकान्श म्हशी म्हातार्‍या होण्यापूर्वीच कसायांना विकल्या जातात. आयुष्यभर दूध देणारी म्हैस ही, तिला कसायाला देणार्‍या कृतघ्न माणसाला, मरण्यापूर्वी काही हजार रुपये देऊन जाते. म्हशीला खरे गांधीवादी म्हणता येईल. म्हशीचे मांस आणि चर्म विकून भारताला भरपूर विदेशी मुद्रा मिळते. असो.

Node read time
2 minutes
2 minutes

अबापट Wed, 28/05/2025 - 13:14

म्हणून मला पटाइतकाका आवडतात.
कुठल्याही विषयाला पुराणकाळ ते आंतरराष्ट्रीय व्यापार असा व्यापक आढावा घेण्याचे दुर्मिळ कसब त्यांच्याकडे आहे.
पटाइतकाका, तुमचं वय विचारू शकतो का ? (माझा असा समज आहे की आपण एकाच पिढीचे असावोत. पण माझ्याकडे तुमच्यासारखा व्यापक दृष्टिकोन नाही ) असो चालायचेच

'न'वी बाजू Wed, 28/05/2025 - 16:00

In reply to by अबापट

पुराणकाळ ते आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे सगळे ठीकच आहे. परंतु,

म्हशीला खरे गांधीवादी म्हणता येईल. म्हशीचे मांस आणि चर्म विकून भारताला भरपूर विदेशी मुद्रा मिळते.

या दोन वाक्यांचा परस्परसंबंध/कार्यकारणभाव काही केल्या समजला नाही.

असो चालायचेच.

विवेक पटाईत Thu, 29/05/2025 - 09:04

In reply to by 'न'वी बाजू

गांधीजी म्हणतात, एका गालावर मारले की दूसरा गाल पुढे करा. म्हैस दूध आणि मांस आणि चर्म ही देते. कोणतीही तक्रार करत नाही. तिच्या साठी म्हैस शाळा नाही की म्हैस सेवक नाही. त्या अर्थाने खरी गांधीवादी.

'न'वी बाजू Fri, 30/05/2025 - 03:51

In reply to by विवेक पटाईत

एक तर, गांधीजी असे मुळात म्हणालेले नाहीत. (हा मुळातला ख्रिस्ताचा, बायबलातून उद्धृत केलेला उपदेश आहे. गांधीजींनी त्याचा केवळ पुनरुच्चार केला — व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड केल्यासारखा — इतकेच. आता, यामुळे जर का गांधीजी आणि/किंवा म्हैस हे ख्रिस्ती अथवा ख्रिस्तवादी ठरत असतील, तर ते ठरोत बापडे.) परंतु, ते एक असो.

तसे पाहिले, तर गायसुद्धा केवळ दूधच नव्हे, तर मांस आणि चर्मसुद्धा देते. हं, आता, भारतात त्यावर निर्बंध आहेत (आणि, त्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर शिक्षा तर होतेच; शिवाय, उल्लंघनाच्या नुसत्या संशयावरून (किंवा, क्वचित संशयाविनासुद्धा) हिंदुत्ववादी गुंड धरून जिवे मारतात), ही बाब अलाहिदा. अन्यथा, भारताबाहेर उभ्या जगात गाय ही केवळ दूधच नव्हे, तर मांस आणि चर्मसुद्धा देते. परंतु, येथे तो मुद्दा नाही.

(खरे तर, भारतातसुद्धा, हिंदूंना गोमांस वर्ज्य आहे ही गोष्ट केरळमधील अनेक हिंदूंना अगदी परवापरवापर्यंत ठाऊकसुद्धा नसे. तेथे हिंदुत्ववादी राजकीय पक्षांचा जोर वाढू लागल्यापासून ते प्रस्थ (पक्षी: गोमांस न खाण्याचे) अगदी अलीकडे तेथील हिंदूंमध्ये मूळ धरू लागले आहे. तेही सोडून द्या. आपल्या महाराष्ट्रातील बलुतेदारी व्यवस्थेत, परंपरेने अस्पृश्य मानल्या गेलेल्या अनेक हिंदू जाती या (बहुधा नाइलाजास्तव) त्यांना दिल्या गेलेल्या मेलेल्या गायींच्या मांसावर गुजराण करीत, नि त्यांचे चर्मसुद्धा काढीत. (त्यातील अनेकजण हे पुढे धर्मांतर करून बौद्ध झाल्याने तांत्रिकदृष्ट्या ‘हिंदू’ राहिले नाहीत, असा जर यावर आपला युक्तिवाद असेल, तर अर्थात बोलणे खुंटले.) हं, ते जिवंत गाय मारून तिचे मांस खात अथवा चर्म काढीत नसतीलही. मात्र, भारतातल्या हिंदूंनासुद्धा, गाय मांस अथवा चर्म देत नाही, असा दावा खचितच करता येणार नाही. (गाय देते. तुम्ही जर घेत नसाल, तर तो तुमचा प्रश्न!) परंतु, अर्थात, येथे तोही मुद्दा नाही.)

मुद्दा हा आहे, की गाय काय किंवा म्हैस काय, ही दूध काय किंवा मांस/चर्म काय, ‘देत’ नसते; तुम्ही ते तिच्याकडून घेत असता (अथवा घेत नसता). यात तिला कोठल्याही प्रकारे agency नाही. तिचे मत यात कोठल्याही प्रकारे विचारात घेतलेले नाही, आणि तिला यात नकाराधिकारसुद्धा नाही. आपण (म्हणजे माणसाने) आपल्या स्वार्थाकरिता चालवलेला हा सगळा उद्योग आहे. (लक्षात घ्या; हे योग्य आहे की अयोग्य, याबद्दल कोठल्याही बाजूने कोठलाही दावा मी केलेला नसल्याकारणाने, ती टरफले मी उचलणार नाही. मी फक्त वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन करीत आहे, इतकेच.) फार कशाला, आपल्याकरिता गोशाळा (अथवा म्हैसशाळा) असाव्यात, झालेच तर, आपल्या दिमतीला गोसेवक (अथवा म्हैससेवक) असावेत, अशी मागणी आजतागायत एकाही गायीने (अथवा म्हशीने) केलेली नाही; स्वार्थी मानवाने केवळ स्वतःच्या मनाच्या समाधानाकरिता या (तथाकथित) सुविधा तिच्यावर एकतरफी लादलेल्या आहेत.

सांगण्याचा मतलब, गाय (अथवा म्हैस) ही कोठलीही गोष्ट आपल्याला देते (अथवा देत नाही), त्या बदल्यात ती कशाची अपेक्षा किंवा मागणी करते (अथवा करीत नाही), अत एव या कारणास्तव ती गांधीवादी आहे (अथवा गांधीवादी नाही), या संदर्भातील आपले एकूण एक मुद्दे हे बिनबुडाचे तथा भंपक आहेत, इतकेच अत्यंत विनम्रतेने सुचवू इच्छितो.

बाकी आपले चालू द्या.

मारवा Wed, 28/05/2025 - 21:24

In reply to by अबापट

मी पुण्यात जन्मलो नाही अन्यथा आमचीही बुद्धी कुशाग्र झाली असती तर ते एक राहिलेच. म्हणून बापटराव आता एक अतिशय नम्र विनंती आहे. आता तो दृष्टिकोन जसा आहे तसा त्याला अखेरचे दिवस राहू द्या. तो expand वगैरे करण्याच्या नादी लागू नका. दृष्टी वाचवू शकलात तरी बरे झाले असे म्हणण्याचा काळ आहे.
बाकी पुण्यात नाटकांच्या जाहिराती अशा असतात म्हणे
धागाकार नेहमीचेच यशस्वी
स्थळ. ऐसी चे हिरवेगार कुरण
तिकीट. विनामूल्य
निर्माता ऐसी अक्षरे
प्रतिसादक नेहमीचेच यशस्वी
तर या पावसाळी धुंद वातावरणात मस्तपैकी कॉफी पिऊ या मंडळा साठी आयोजित नाटकाच्या विशेष खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मूळ इंग्रजी नाटकाचे शीर्षक Empire Strikes back असे आहे.
मराठी रूपांतरण टोळ धाडींचा कर्दनकाळ असे आहे.

अबापट Thu, 29/05/2025 - 13:12

In reply to by विवेक पटाईत

अरेच्या उगाचच तुम्हाला काका वगैरे केला. खरं तर अरेतुरे करायला पाहिजे इतके कमी अंतर आहे वयात.
एकाच पिढीचे आपण (आणि आमचे न बा). पण विचारात किती तो फरक. असो . काही लोक मोठे होतंच नाहीत आणि काही लोक लहानपणापासूनच मोठे होतात , त्यातला प्रकार

'न'वी बाजू Thu, 29/05/2025 - 17:39

In reply to by अबापट

एकाच पिढीचे आपण (आणि आमचे न बा).

असेच नेमके कितपत म्हणता येईल, याबद्दल साशंक आहे. मी तुम्हां दोघांहूनही वयाने बहुधा थोडा लहान असेन. (कदाचित अर्ध्या ते एक पिढीचा फरक? असो.)

अरेच्या उगाचच तुम्हाला काका वगैरे केला.

पण विचारात किती तो फरक.

इथेच चुकताय! Age alone doth not a काका make. (किंवा, Not age alone, but attitude maketh a काका.)

(यावरून काहीसे अवांतर (आणि काहीसे वैयक्तिक). मला एक अत्यंत वाईट खोड आहे. हे विचार, attitudes वगैरेंच्या बाबतीत, मी स्वतःला माझ्या स्वतःच्या पिढीशी कधीच फारसा identify करू शकलेलो नाहीये. कधी एक ते दीड पिढी वर, तर कधी दोनअडीच पिढ्या खाली. But rarely with my own generation. (कदाचित म्हणूनच पूर्णपणे नाही, तरी निदान काही अंशी तरी तुमच्याशी identify करू शकत असेन. Not that it is necessarily a bad thing.) (थोडक्यात, शिंगे मोडून वासरांत नि (पांढरी) दाढी चिकटवून बुजुर्गांत, दोन्हींकडे शिरण्यातला प्रकार!) असो चालायचेच.)

काही लोक मोठे होतंच नाहीत

हं! ऐकतोय.

खरं तर अरेतुरे करायला पाहिजे इतके कमी अंतर आहे वयात.

अरेतुरे करण्याचा (केवळ) वयातील अंतर कमी असण्याशी थेट संबंध नसावा.

आपल्याहून वयाने पुष्कळच कमी असलेल्या लोकांशी अरेतुरे करता येते. झालेच तर, आई, आजी वगैरे बुजुर्गांशीही अरेतुरे (खरे तर अगंतुगं) करता येते. फार कशाला, अगदी अलीकडील पिढ्यांत अनेकदा (किंवा, विशेषतः कोंकणातील काही समाजांत पूर्वापार) बाप, आजा वगैरे बुजुर्गांशीही अरेतुरे करण्याकडे कल दिसतो. ती सर्व उदाहरणे तूर्तास बाजूस ठेवून केवळ साधारणतः समवयस्क लोकांचाच विचार करायचा झाला, तरीसुद्धा, पॅटर्न इतका सोपा नसावा.

लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये, साधारण समवयस्कांना अरेतुरे केले जाते, हे ठीकच आहे. मात्र, वय जसजसे वाढत जाते, तसतसा अरेतुरे करण्याकरिता समवयस्क असणे एवढा एकच निकष पुरत नाही; जवळीक-फॅक्टरही येतो. साठ वर्षांचे दोन रँडम थेरडे एकमेकांना थेट अरेतुरे करत नाहीत, नि (mutual consent असल्याखेरीज) सहसा करू शकतही नाहीत. ते दोघेजण एकमेकांना लहानपणापासून किंवा गेला बाजार तारुण्यापासून ओळखत असणे, किंवा अन्य कारणांनी त्यांच्यात तितकी जवळीक असणे, हे पूर्वावश्यक असते. (आणि, त्यातसुद्धा, आधी म्हटल्याप्रमाणे, mutual consent (उघड वा अध्याहृत, परंतु nevertheless mutual) ही अत्यावश्यक. अन्यथा, त्याचा अर्थ insult, taking for granted, contempt, condescension यांपैकी काहीही घेतला जाण्याचा संभव असतो.)

थोडक्यात, केवळ वयात अंतर कमी आहे, हे अरेतुरे करण्यासाठी पुरेसे नसावे.

(सांगण्याचा मतलब, कितीही झाले, तरी पटाईतकाका हे पटाईतकाकाच. किंबहुना, त्यांना पटाईतआजोबा म्हणत नाहीत (कदाचित आजोबा-लोकांबद्दलच्या आदराखातर), हे नशीब समजावे.)

सई केसकर Fri, 30/05/2025 - 09:28

In reply to by 'न'वी बाजू

>>>इथेच चुकताय! Age alone doth not a काका make. (किंवा, Not age alone, but attitude maketh a काका.)

LOL! याबाबतीत तुमच्याशी १००% सहमत आहे. मला कुणी पहिल्यांदा काकू म्हणालं तो दिवसही मला आठवतो आहे. बिल्डिंगखाली चालत असताना, काकू बॉल देता का? अशी हाक ऐकू आली. आजूबाजूला मी सोडून कुणीच नव्हतं त्यामुळे मीच काकू आहे याचा साक्षात्कार झाला. पण त्या दिवशी मी केवळ दिसण्याने काकू झाले. मनानी मी कधीच काकू झाले होते. मराठीत काकू हे संबोधन उगाच बदनाम आहे. माझ्या मते काकू होणे हा बहुमान समजावा. जिला जगाची समज आली आहे, घरगुती राजकारणाला सर्कमव्हेण्ट करून आपल्याला जे हवं ते मिळवता येतं, जी गल्लीतली पोरं, सासू-सासरे, यांच्यापासून ते थेट ऑफिसमधल्या बॉसवरही अधिकाराने दादागिरी करू शकते ती काकू!

>>अरेतुरे करण्याचा (केवळ) वयातील अंतर कमी असण्याशी थेट संबंध नसावा.
सहमत. आमच्या ओळखीत एक ९८ की ९९ कुळी राजघराण्यातलं कुटुंब आहे. त्यांच्याकडे पाळण्यातल्या बाळालाही, अहो म्हणतात. त्या काकांची बायको एकदा सांगत होती की सासरी गेल्यावर तिकडच्या कुत्र्यालाही अहो, हाडा! असं म्हणावं लागतं.

चिमणराव Sun, 01/06/2025 - 12:01

In reply to by सई केसकर

वय वाढत गेले की .....आपल्याला अरे तुरे एकेरी नावाने उल्लेख करणारी लोकं कमी होत जातात हा वाईट भाग.

मारवा Fri, 30/05/2025 - 21:06

In reply to by 'न'वी बाजू

सुविचार

Age is not an achievement and youth is not qualification.

विनोद
हा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. एकदा एक मेडिकल दुकानावर मी उभा होतो. तिथे गर्दी होती म्हणून औषधीं द्यायला दुकानदाराला थोडा उशीर होत होता. एक अतिशय चालू असा.म्हातारा तिथे आला बहुधा लावलेली असावी किंवा गमत्या असावा. दुकानावरील एकदम तरुण मुलाला तो म्हणतो कसा
"ओ अंकल , ओ अंकल जल्दी दो ना जरा लेट हो रहा है "
मला त्या दोघांकडे बघून हसू आले.
तरुण मुलगा फार चतुर आणि हजरजबाबी, तो.म्हणाला
"बेटे रुक ना जरा, क्यो इतनी जल्दी कर रहा, स्कूल नही है ना आज तेरी बेटे !"
Situational joke होता खूप हसलो तिथे.

प्रश्न

नुकत्याच झालेल्या चर्चेत अशी आवई उठली की तुम्ही म्हणे 65 च्या आसपास आहात तर मग अधून मधून जे तुम्ही थेरडेशाही ला बुकलून काढत असतात तो नेमका कुठला वयोगट आहे ? की ते मानसिक वय वगैरे आहे ?

Age is not an achievement and youth is not qualification.

चोक्कस!

फक्त एकच (nitpicking स्वरूपाची) दुरुस्ती सुचवू इच्छितो:

…youth is not a qualification.

बाकी ठीक.

Situational विनोद छान आहे. (कदाचित, तो गिऱ्हाईक आणि तो दुकानदार एकमेकांना सामील असू शकतील, ही शक्यता विचारात घेतली आहेत काय?)

आता, प्रश्नास उत्तर, वगैरे. (Although, जे, माझ्या “I don’t owe the world an explanation” या ब्रीदास अनुसरून, मी देणे लागत नाही. परंतु, तरीही. केवळ लहर आली, म्हणून.)

नुकत्याच झालेल्या चर्चेत अशी आवई उठली की तुम्ही म्हणे 65 च्या आसपास आहात…

नाही. चर्चेत काहीही असो, परंतु, मी (अद्याप) तितकाही वयस्कर/वयोवृद्ध नाही. (म्हणजे, शारीरिक/कालाधिष्ठित वयानुसार.) (Not that that is necessarily a good or a bad thing.)

तर मग अधून मधून जे तुम्ही थेरडेशाही ला बुकलून काढत असतात तो नेमका कुठला वयोगट आहे ? की ते मानसिक वय वगैरे आहे ?

थेरडेशाहीचा वयोगटाशी (मग तो वयोगट शारीरिक असो, वा मानसिक) नेमका काय संबंध?

थेरडेशाही is not a function of relative age or age group, whether physical or mental. It is but a function of attitude, masquerading as that of relative age or age group.

थेरडेशाहीला वयाचे बंधन नाही. (एक विनोद सांगतात. आलोक नाथ जेव्हा जन्माला आला, तेव्हा म्हणे बाळंतपण करणाऱ्या सुइणीने बाहेर येऊन सांगितले, की “बधाई हो, आप को बाबूजी पैदा हुए,” म्हणून.) उलटपक्षी, केवळ एका विशिष्ट वयोगटात पदार्पण केल्याने कोणालाही थेरडेशाही क्लबचे सदस्यत्व आपोआप मिळत नाही; त्याकरिता कर्तृत्वही तसे लागते.

(‘थेरडा’(/‘थेरडी’) आणि ‘वृद्ध’/‘म्हातारा’(/‘वृद्धा’/‘म्हातारी’) हे समानार्थी शब्द नाहीत.)

बाकी चालू द्या.

तिरशिंगराव Fri, 30/05/2025 - 09:06

म्हशीचा आणखी एक उपयोग सांगायचा राहिला. पूर्वीच्या काळातले जावई म्हशीचा वापर करण्यात पटाईत होते. बायको तिच्या माहेरी जाऊन बसली असेल तर, जावई सासरच्या म्हशीची शेपूट धरुन," अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी" असं म्हणत सासरी पोचत असे म्हणे!

चिमणराव Sun, 01/06/2025 - 11:58

In reply to by तिरशिंगराव

सासर माहेर एकाच गावात किंवा एकाच गावातील जवळच्या वस्तीत असले की हे साध्य होत असे.
दूरचे असल्यास काय कारण देत असतील माहीत नाही.

Rajesh188 Fri, 30/05/2025 - 15:26

इक पण प्रतिसाद उत्तन बुद्धीचे प्रतीक वाटत नाहीत.
फक्त agenda वर सर्व चिकटून आहेत.

तिरशिंगराव Sat, 31/05/2025 - 18:11

प्रतिसादांची श्रेणी देण्याची बंद केल्यामुळे काही लोकांची कुचंबणा होत असावी. परत कधी ती पद्धत चालु केली तर बाकीच्या ऑप्शन्स मध्ये बुध्यांक क्रमांक देण्याचीही सोय करावी.

Rajesh188 Sun, 01/06/2025 - 22:17

In reply to by तिरशिंगराव

कसला दर्जा देताय.
गाय असू किंवा म्हैस सर्व पाळीव प्राणी आहेत.
त्या प्राण्या चीं काही मत नाहीत.
गाय ही भारतात उपयोगी च आहे तिच्या बैला मुळे जी बैल शेतातील सर्व काम करतात त्ता मुळे.
हिंदू नी ना त्यांचे महत्व माहित आहे बाकी लोकांना पण माहित आहे.
पण एक भावना म्हणून हिंदू नी गाय ला देवाचा पवित्र दर्जा दिला आणि बाकी लोकांनी तो दिला नही

मनीषा Wed, 11/06/2025 - 23:56

राजमहिषी या शब्दातील महिषी म्हणजे म्हैस असे नसावे बहुदा.
राजघराण्यातील महत्त्वाची, आदरणीय स्त्री असा अर्थ आहे असे वाट्ते.

"म्हैस शांत स्वभावाची असते."
हे बरोबर आहे पण काहींच्या मते म्हशी मट्ठ आणि आळशी असतात.(हे काही खरे वाटत नाही कारण ज्ञानेश्वरानी तिच्याच एका वंशजाच्या मुखी वेद वदवले होते म्हणे) म्हणून म्हशीचे दूध पिणारे मट्ठ असतात. जर तुम्हाला स्मार्ट व्हायचे असेल तर चपळ, चलाख गयीचे दूध प्यायला पहीजे.

पण म्हशीवर अन्याय होतो हे खरे आहे. उदा. "भरवशाच्या म्हशीला टोणगा" ही म्हण. तिने नेहमी कालवडच जन्माला घालावी अशी अपेक्षा का?
तसेच,
लोळतीय बघ म्हशी सारखी, तोंडावरची माशी हालत नाही.. म्हैस आहे नुस्ती -- असे ड्वायलॉक प्रसिद्ध आहेत. हे किती अपमानास्पद आहे?

'न'वी बाजू Thu, 12/06/2025 - 03:04

In reply to by मनीषा

लोळतीय बघ म्हशी सारखी, तोंडावरची माशी हालत नाही.. म्हैस आहे नुस्ती -- असे ड्वायलॉक प्रसिद्ध आहेत. हे किती अपमानास्पद आहे?

 म्हशीच्या तोंडावरची माशी हालत नाही, यात कितपत तथ्य आहे, याबद्दल (मी म्हैस किंवा माशी यांपैकी कोणीही नसल्याकारणाने, झालेच तर, माझे तितके निरीक्षण नसल्याकारणाने) साशंक आहे, त्यामुळे, तेवढा भाग सोडून देऊ.

राहता राहिला भाग 'लोळतीय बघ म्हशी सारखी' किंवा 'म्हैस आहे नुस्ती' यांचा. तर, या वाग्बाणांची जी कोणी लक्ष्य असेल, तिचा दृष्टिकोन जर काहीसा माझ्यासारखा असेल, तर ती हे वाग्बाण भूषणे म्हणून घेईल, दूषणे म्हणून नव्हे. (वर कौतुकाबद्दल आभारसुद्धा मानेल.)

बाकी,

राजमहिषी या शब्दातील महिषी म्हणजे म्हैस असे नसावे बहुदा. राजघराण्यातील महत्त्वाची, आदरणीय स्त्री असा अर्थ आहे असे वाट्ते.

म्हशी या आदरणीय स्त्रिया नसतात काय?

पण काहींच्या मते म्हशी मट्ठ आणि आळशी असतात.

चुकीची समजूत आहे!

म्हशी हालचाल करीत नाहीत, असे नाही. फक्त, स्वतःला वाटेल तेव्हा (नि तेव्हाच) हालचाल करतात. स्वान्तसुखाय, नि स्वतःच्या मर्जीने! मात्र, उगाच दुसर्‍यांच्या अपेक्षा पुर्‍या करायला नाहीतर दुसर्‍याला खूष करायला म्हणून ढिम्म हलणार नाहीत.

आता, यावरून कोणाला जर म्हशी मठ्ठ आणि आळशी वाटत असतील, तर तो पाहणार्‍याचा दृष्टिदोष आहे. परंतु, मनात आणले तर... कधी उधळलेली म्हैस पाहिली नाहीत काय?

(आमच्या काळच्या नारायण पेठेत हाही अनुभव अनेकदा येत असे. भर न.चिं. केळकर रस्त्यावर उधळलेली म्हैस पाहाणे हा किती अवर्णनीय अनुभव असतो, हे तो स्वतः घेतल्याशिवाय समजणार नाही.)

जर तुम्हाला स्मार्ट व्हायचे असेल तर चपळ, चलाख गयीचे दूध प्यायला पहीजे.

कोण म्हणतो म्हैस चपळ नसते, म्हणून?

वर उल्लेखिलेली उधळलेली म्हैस पाहिलेला मनुष्य हा, म्हैस (१) आळशी असते, किंवा (२) चपळ नसते, अशा अर्थाचे विधान जन्मात कधीही करणार नाही!

बाकी, ते वेद घोकण्यात वगैरे काही स्मार्टनेस आहे, हे काही मी मानत नाही. (किंबहुना, ज्ञानेश्वरांच्या ष्टोरीतल्या त्या सुविख्यात रेड्याने केवळ च्यालेंज घेऊन ते वेद घोकून दाखविले असावेत. बोले तो, 'मनात आणले, तर मीसुद्धा वेद घोकून दाखवीन, काय समजलेत? पण आमच्यात हा असला फालतू टाइमपास करण्यात शहाणपणा समजत नाहीत!' असली काहीतरी प्रस्तावना करून.)

मात्र, स्वतःचे मन जाणणे (आणि, मुख्य म्हणजे, त्यास अनुसरून वागणे; मग भले कोणीही काहीही म्हणो) यासारखा दुसरा स्मार्टनेस नाही.

पण म्हशीवर अन्याय होतो हे खरे आहे. उदा. "भरवशाच्या म्हशीला टोणगा" ही म्हण. तिने नेहमी कालवडच जन्माला घालावी अशी अपेक्षा का?

तसेही, काय जन्मास घालावे, हे काही म्हशीच्या हातात नाही, हेही खरेच! त्यामुळे, म्हशीकडून ही अपेक्षा अन्याय्य आहे, हे म्हणणे पटण्यासारखे आहेच.

परंतु, म्हशीला त्याची पर्वा असते, असे तुम्हांस नक्की का बरे वाटते?

स्मार्ट! (बोले तो, म्हैस. तुम्ही नव्हे. (म्हणजे, तुम्हीसुद्धा स्मार्ट असण्यास माझा काहीही आक्षेप नाही, परंतु तरीही.))

(असो चालायचेच.)

मनीषा Thu, 19/06/2025 - 10:00

In reply to by 'न'वी बाजू

"परंतु, म्हशीला त्याची पर्वा असते, असे तुम्हांस नक्की का बरे वाटते?"
छे!! म्हशीला कसली आलीय पर्वा? तिची ती निवांत रवंथ करीत असते.

बाकी पुण्यातल्या रस्त्यावरील प्राणीजगताची मीही साक्षीदार आहे. हल्ली गाई, म्हशी फारशा दिसत नाहीत.. मोकाट कुत्री खूप असतात. पूर्वी एकदा सकाळी सकाळी कर्वे रस्त्यावर एका गर्दभाने माझ्या स्कुटीला धडक दिल्याची आठवण आहे मला अजून.

एक व्यंगचित्र पाहिल्याचे स्मरते -- म्हशींचा कळप बसलेला आहे आणि त्यांना वळसा घालून रस्ता बांधलेला आहे. एक नागरिक दुसर्‍याला सांगतो -"काय करणार? म्हशी त्यांची जागा सोडायला तयारच नव्हत्या त्यामुळे रस्ता असा बांधावा लागला."

मारवा Thu, 19/06/2025 - 11:48

In reply to by मनीषा

पूर्वी एकदा सकाळी सकाळी कर्वे रस्त्यावर एका गर्दभाने माझ्या स्कुटीला धडक दिल्याची आठवण आहे मला अजून.

रस्ता कर्वे नावाच्या माणसाचा
धक्का दिला म्हणे
गदर्भमत किंवा D Times मध्ये काय बातमी आली असेल ?
माणसांची अती वस्ती वाढल्यानं आणि त्यांच्या वाहनांनी आता आम्हाला रस्त्यावर चालणे देखील मुश्कील झालेय
हे आकाशातल्या बापा माणसे कमी कर !

मारवा Thu, 12/06/2025 - 08:57

In reply to by मनीषा

पण काहींच्या मते म्हशी मट्ठ आणि आळशी असतात.(हे काही खरे वाटत नाही कारण ज्ञानेश्वरानी तिच्याच एका वंशजाच्या मुखी वेद वदवले होते म्हणे) म्हणून म्हशीचे दूध पिणारे मट्ठ असतात. जर तुम्हाला स्मार्ट व्हायचे असेल तर चपळ, चलाख गयीचे दूध प्यायला पहीजे.

तसे नाही यात एक तर रेड्याच्या (म्हशीच्या नव्हे इथे म्हैस protagonist आहे.). वेद वदविले होते (स्वतःहून नाही )
एकतर हे सर्व काल्पनिक आहे आणि उद्देश संदेश देणे असा आहे.
आणि संदेश उलट रेडा जो आहे त्याचे अधिकच अवमूल्यन अपमान करतो. की बघा अगदी रेडा सारखा नालायक जरी असला तरी त्याच्याकडून " वदवून" घेतले. शिवाय तेव्हाच्या ब्राह्मणी व्यवस्थेला ही एक चपराक सारखे हे घ्या तुमचे वेद even रेड्याच्या तोंडून सुद्धा वदवून घेतले. आता म्हशीचा ग्रुप आहे लिंग निरपेक्ष धोरण आहे तर रेडा धरून घ्या सोबत
पण थोडक्यात रेड्याचा सुद्धा मोठाच अपमान या उदाहरणातून दिसतो त्याला एकदम गये वाली केस म्हणून चमत्कारासाठी संदेशासाठी निवडलेले आहे.

Rajesh188 Thu, 12/06/2025 - 15:51

In reply to by मारवा

हा ताकत वाण प्राणी आहे पण त्याला ऊन सहन होत नाहीं.
भारतात त्या मुळे रेडा शेत कामाला योग्य समजले जात नाहीत.
भारतात शेताची जेव्हा काम असतात तेव्हा उच्च तापमान असते.

बैल उच्च तापमाणात काम करू शकतात त्या मुळे बैल भारतात पूजनीय आहेत.
तशी परंपरा आहे.
पण आज कल चे हिंदू द्वेशी शिक्षित फक्त डिग्री होल्डर आहेत अक्कल zero.
म्हणून काही ही लिहीत असतात.
अति द्वेष ह्यांचा मेंदू बंद करतो

मनीषा Thu, 19/06/2025 - 09:48

In reply to by मारवा

"संदेश उलट रेडा जो आहे त्याचे अधिकच अवमूल्यन अपमान करतो. की बघा अगदी रेडा सारखा नालायक जरी असला तरी त्याच्याकडून " वदवून" घेतले. शिवाय तेव्हाच्या ब्राह्मणी व्यवस्थेला ही एक चपराक सारखे हे घ्या तुमचे वेद even रेड्याच्या तोंडून सुद्धा वदवून घेतले."

ज्ञानेश्वरांचे देवत्व, दैवी गुण ठळकपणे दाखविणे हाही हेतू असू शकतो. किंवा जर योग्य गुरू, मार्गदर्शक लाभला तर सामान्याचे रुपांतर असामान्यात होते असेही सांगायचे असेल. पण रेड्याच्या मुखी वेद वदवले ही कथा सर्वश्रुत आहे हे नक्की.