Skip to main content

दिवाळी अंकासाठी आवाहन – २०२५

दिवाळी अंक आवाहन २०२५

नमस्कार.

 

गेल्या तेरा वर्षांप्रमाणे याही वर्षी ‘ऐसी अक्षरे’चा दिवाळी अंक काढण्याचं काम सुरू करत आहोत. या कामात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं स्वागत आहे. 

 

अंक काढण्यासाठी बरेच लोक बरीच कामं करतात; पण सुरुवात साहित्यापासून करू. ललित, अभ्यासपूर्ण, विनोदी, घनगंभीर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या लिखाणाला अंकात स्थान असेल. तसंच अंक डिजिटल माध्यमात निघत असल्यामुळे व्हिडिओ, ऑडिओ, चित्रं, फोटो, अशा प्रकारचं साहित्यही दिवाळी अंकात आलेलं आम्हाला आवडेल. 

 

साहित्यासाठी शब्दमर्यादा नाही; किंवा विषयाबद्दलही मर्यादा नाही. दर्जेदार असावं एवढीच अपेक्षा आहे. साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५. यापुढे साहित्य पाठवल्यास साहित्यावर संपादन वगैरे संस्कार करण्यासाठी वेळ लागतो, तो मिळणं कठीण होतं. 

 

साहित्य पाठवण्यासाठी –

  • ऐसीच्या इमेल आयडीवर इमेल करा. विषयात ‘दिवाळी अंक २०२५’ लिहा. ऐसीचा आयडी – aisiakshare@जीमेल.कॉम
  • लेखन युनिकोडमध्ये पाठवा. (युनिकोडमध्ये आहे हे कसं कळणार? लेखनातलं एक वाक्य घेऊन फेसबुक, इन्स्टा किंवा एक्सवर प्रकाशित केलं तर फोनमधून ते दिसत असेल तर ते युनिकोडमध्ये आहे.) हातानं लिहून किंवा श्रीलिपी छापाची, विशेष इन्स्टॉल करावी लागणारी सॉफ्टवेअरं वापरून लिहिलेलं लेखन पाठवू नका.
  • गूगल डॉकमधून लेखन पाठवल्यास, लेखन संपादित करण्याचीही सोय ऐसीच्या आयडीला द्या. नाही तर क्लाऊड वापरण्याचा फायदा काय?
  • ऱ्हस्व-दीर्घांबद्दल शंका असेल तर अरुण फडकेंचा कोश अँड्रॉइडवर ॲप म्हणून उपलब्ध आहे; ॲपचं नाव ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’. मिळाल्यास तो कोश पुस्तकरूपात विकत घेऊन ठेवा.

 

साहित्यनिर्मितीव्यतिरिक्त अंकातल्या साहित्याचं संपादन, मुद्रितशोधन, लेखनासाठी यथायोग्य चित्रं मिळवणं, अशी कामंही असतात; लेखांची आणि अंकाची समाजमाध्यमांवर जाहिरात करणं; आणि लेखनावर प्रतिसाद देणंही. अशा कामांतही कुणी सहभागी होऊ इच्छित असल्यास कळवा.

 

आणि तुम्हाला काही कारणानं लेखन पाठवणं शक्य नसेल तर तुमच्या परिचयातले तुम्हाला ऐसीसाठी सुयोग्य वाटणारे लेखक सुचवा. 

 

लोभ असावा.

ऐसी अक्षरे

ऐसीअक्षरे Fri, 04/07/2025 - 22:49

In reply to by अक्षरमित्र

Translated English story can be sent for " Diwali Ank 2025 "?

भाषांतरित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मूळ साहित्याचे प्रताधिकार ज्यांच्याकडे आहेत त्यांची परवानगी घ्यायला लागते.

आडकित्ता Thu, 28/08/2025 - 01:34

कित्येक वर्षांनंतर इकडे डोकावतो आहे.
मुख्य पानावर दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ दिसते आहे, त्यानुसार सोशल मेडिया ही थीम दिसते आहे.
या थीमला धरूनच लेखन अपेक्षित आहे की इतरही?

ऐसीअक्षरे Thu, 28/08/2025 - 10:45

In reply to by आडकित्ता

स्वागत आहे. 'सोशल मीडिया' गेल्या वर्षीची थीम होती आणि ते गेल्या वर्षीचे मुखपृष्ठ आहे. गेल्या वर्षीचा अंक - https://aisiakshare.com/index.php/diwali24_tracker
या वर्षी अंकाला थीम अशी नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 29/08/2025 - 06:09

In reply to by आडकित्ता

डॉक! तुम्हाला इथे बघून आनंद झाला!