Skip to main content

कृतांतकटकामलध्वज जरा जरी पातली (#)

केस पांढरे तरी हा
डाय लावतो हिरवा
पाखरांनो सावधान
घुमे टेचात पारवा

केस पांढरे तरी हा
डाय गुलाबी लावतो
पाखरांनो उडलात
तरी पिसे हा मोजतो

केस पांढरे तरी हा
काळा कलप लावतो
पाखरांनो सावध हा
दाणे दुरून टाकतो

केस पांढरे तरी हा
अंतर्यामी अतरंगी
पाखरांनो नका भिऊ
निर्विष याची हो नांगी

(#)माझ्यासारख्या विविधरंगी केश-भूषित साठी-पार युवकांनी कृपया हलक्यात घ्यावे :)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 24/08/2025 - 02:38

पांढऱ्याचे काळे करणारे सगळे निर्वीषच असतात, यावर माझा फार विश्वास नाहीये. विषाची मात्रा कमी असली तरीही.