स्ट्रिंग थिअरीचा पाया
FunUवादी लेखनाची
FunAतनी कोलांट्यांची
होता उर्मी अनावर
ब्रह्मलीन असूनही
प्रकटू का सो मि वर?
बादरायणी संबंध
येतील का माझ्या कामी?
(एन्ट्रॉपीचे ॐकाराशी
करू कलम कसे मी?)
"जानव्याचा दोरा हाच
स्ट्रिंग थिअरीचा पाया"
हीच थीम ठेवूनिया
लेख घ्यावा का पाडाया?
ओव्या, अभंग, सूक्तांची
लेखा जोडू का शेपटी?
डिस्क्लेमर टाकावा का
स्वांत:सुखाचा शेवटी?
असिधारा व्रत माझे
FunUवादी लेखनाचे
भर्कटणे क्रमप्राप्त
लोड नका घेऊ त्याचे !
एक शिक्रेट सांगतो
कोणालाही सांगू नका
फनूवादी लेखनाचा
फनातनी कोलांट्यांचा
माझा पर्मनंट ठेका !
जातीशीच संबंधीत असावे. दाते…
जातीशीच संबंधीत असावे. दाते शब्दकोश-
कामाठी
पु. १. तेलंगणातील एक जात व त्यातील व्यक्ती. २. झाडणे, बैठक घालणे वगैरे घरकामाकरिता ठेवलेला नोकर : ‘शीघ्र आणोनि कामाठ्यांसी । गर्ती योजिली कूपासरसी ।’ – नव २४·१७८. ३. लष्करातील डेरे, राहुट्या लावणारे मजूर : ‘आली सातपुड्याची घडी, तोफगाडी, दाटली घोडी वाट पुढें नाहीं कामाठे खादी पर्वत फौज उभी राही ।’ - ऐपो ४२४. [क. कामाट, त. कामाट्टि] [सं.]
लेखनकामाठी
स्त्री. १ हलक्या प्रतीचें लेखन. 'एखादा लेखक केवळ द्रव्यासाठीं लेखनकामाठी करीत असला.' -प्रतिभा ४.१५. २ लेखनकला. 'आपली लेखन कामाठी भाव्यांना चांगल्या प्रकारे सजवितां आली असती.' -निवृ ७.१.१९४०.
छान!
स्ट्रिंग थिअरीला प्राचीन भारतात काय नाव होते?