Skip to main content

षड्रिपुनिर्दालनाख्यान

षड्रिपुनिर्दालन चुटकीसरशी केल्याचा दावा करणाऱ्या माझ्या दोस्ताने _ सोम्यागोम्याने _आपलं यश कायप्पा वर मला कळवलं

मग दसऱ्याचा मुहूर्त बघून मीही ठरवलं
आज षड्रिपुंचा नाश करायचाच वडिलोपार्जित कोळीष्टकविभूषित तलवारीने

"काम" वधासाठी तलवार हाती घेतली
(म्यानाचा शेप .... आय हाय!)

"क्रोध" वधासाठी तलवार उपसू लागलो.
(निघेचना xxxx म्यानातून.... या तलवारीच्या....)

उपसेन तलवार तेव्हा पहिला "लोभाचा" खातमा करेन म्हटलं
(पण काही होवो..अशाच मुठीच्या आणखी दोन तरी तलवारी पायजेतच आपल्याकडे)

सप्पकन उपसलेली तलवार आता "मद" वधासाठी
वापरेन म्हणालो
(मी म्हणून उपसली ...शंभर जणांना पेलणार नाय ही असली जड तलवार)

"मोह" थोडा हार्ड आहे वध करायला म्हणतात
(त्यापायी इतकी मस्त तलवार तुटली तर पंचाईत व्हायची फुकट. जपून घाव घालायला पायजे)

"मत्सर" वध फार काय मोठा विषय नाहीये. जमणारच मला
(पण त्या xx xxxxसोम्यागोम्याला माझ्या अगोदर जमलंच कसं?)

मग आठवलं, दसऱ्याला तर शस्त्रपूजा करतात.
मग घेतली तलवार पुजायला.
बघू षड्रिपुनिर्दालन नंतर कधीतरी

मारवा Sun, 05/10/2025 - 18:35

म्हणजे काही गाजर वगैरे कापून तर नव्हता ना कामा वर विजय मिळवायचा ?
बरे झाले तसे नाही झाले काही !
By the way आपले थोर पूर्वज काटेकोर मांडणी करत नसत. मोह आणि लोभ overlapping आहे असे माझे ठाम मत आहे. असलाच फरक तर चिल्लर आहे. म्हणजे त्यासाठी पाचा ऐवजी सहावा घ्यावा इतका काही तो distinct फरक नाही.
म्हणजे लोभ थोडा economical आहे. आणि मोह थोडा emotional आहे. तसा काम आणि मोह सुद्धा overlap होतोच.
म्हणजे भागवत कमळीच्या मोहात पडले.
किंवा कमळीला बघताच भागवतांना काम ज्वर असह्य झाला.
यात कोणता मोठा फरक आहे असा ?
की ज्यासाठी एक रिपु add करावा?
बरे तरलता च धरून चालायचे तर मग मोठंच नकाशा आहे भावनांचा.
मग नुसते सहा तरी कशाला ?
भागवतांना कमळी विषयी आसक्ती निर्माण झाली.
भागवतांना कमळी विषयी ओढ निर्माण झाली.
जसे इश्किया मध्ये नसीरुद्दीन शाह म्हणतो सात मुकाम है इश्क के.

https://youtube.com/shorts/Zk9c4IAmFec?si=-bfgm0r-N0ANlDH5

'न'वी बाजू Mon, 06/10/2025 - 05:02

In reply to by मारवा

म्हणजे काही गाजर वगैरे कापून तर नव्हता ना कामा वर विजय मिळवायचा ?

अं… गाजर (किंवा फॉर्दॅट्मॅटर sausage) कापायला(/छाटायला/तासायला) तलवार कशाला लागते? सुरीने काम भागेल की!

(आणि, (वर्णनावरून) ती तलवारदेखील गंजलेली दिसते. सेप्टिक, धनुर्वात वगैरे भानगडी उद्भवणार नाहीत काय?)

By the way आपले थोर पूर्वज काटेकोर मांडणी करत नसत.

यात नवीन ते काय सांगितलेत? (आणि, आपले थोर पूर्वजच तेवढे कशापायी?)

काटेकोर मांडणी (आणि minding one’s own business) हा भारतीय संस्कृतीचा strong point कधीच नव्हता. (किंबहुना, आजवरच्या इतिहासात भारतीय संस्कृतीवर तसा आरोपही कोणी केल्याचे ऐकिवात नाही.)


बाकी, कमळी कोण? नि भागवत कोण?

अहिरावण Mon, 06/10/2025 - 10:08

In reply to by मारवा

>>>म्हणजे काही गाजर वगैरे कापून तर नव्हता ना कामा वर विजय मिळवायचा ?

उपवासाला रताळी चालतात. गाजराच्या ऐवजी रताळ्यांना कापून काम (कार्य या अर्थाने) होईल काय?

अहिरावण Mon, 06/10/2025 - 10:11

In reply to by मारवा

>>>By the way आपले थोर पूर्वज काटेकोर मांडणी करत नसत. मोह आणि लोभ overlapping आहे असे माझे ठाम मत आहे. असलाच फरक तर चिल्लर आहे.

आपल्याला काही इथल्या बुध्दिमान लोकांएवढी अक्कल नाही (जगजाहिर आहे पण तरी परत सांगितलेले बरे )

म्हणूण कृबुचे सहाय्य घेतले. लोभ आणि मोह यातला फरक सांगा म्हणून...

******************

लोभ (Lobha) आणि मोह (Moha) हे दोन्ही मानसिक विकार किंवा कलेश (क्लेश) आहेत, पण त्यांचा अर्थ आणि प्रभाव वेगळा आहे.

लोभ (Lobha):

अर्थ: लोभ म्हणजे लालसा, वासना, किंवा संपत्ती किंवा इतर गोष्टींना अति आकर्षित होणे. याचा संबंध बाह्य वस्तूंमध्ये, भौतिक सुखांमध्ये किंवा अनुभवांमध्ये असलेल्या अतृप्त इच्छांशी असतो.

स्वभाव: लोभ म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अथवा एखादी वस्तू मिळवण्यासाठी ताण-तणाव आणि अत्यधिक अपेक्षा ठेवणे. यामुळे आपल्याला काहीतरी मिळवले की आपल्याला आनंद मिळेल, असे वाटते, पण ते एक भ्रामक मत असते.

उदाहरण: एखादा व्यक्ती जो पोटभरून खाण्याची इच्छा ठेवतो, किंवा जो सतत संपत्ती, प्रसिद्धी किंवा इतर भौतिक वस्तू मिळवण्यासाठी लालसा ठेवतो.

मोह (Moha):

अर्थ: मोह म्हणजे भ्रम, अज्ञान, किंवा अत्यधिक_attachment. मोह म्हणजे आपल्या असंख्य भ्रम, अज्ञान किंवा चुकीच्या समजुतींमुळे वस्तूंच्या वास्तविक स्वरूपाबद्दल होणारा गोंधळ.

स्वभाव: मोह हे फक्त लालसा नसून, आपण वस्तूंना आणि जीवनाला कशाप्रकारे पाहतो याबद्दलचा गोंधळ आहे. मोह व्यक्तीला त्याच्या भ्रमात अडकवतो, जिथे त्याला काय खरी गोष्ट आहे हे समजत नाही.

उदाहरण: एखादी व्यक्ती जी तिच्या 'स्व' किंवा 'आयडेंटिटी'वर किंवा भौतिक गोष्टींवर अत्यधिक अवलंबून असते आणि तिला कधीही त्यांच्यात स्थायिकता किंवा शाश्वतता दिसत नाही.

मुख्य फरक:

लोभ (Lobha) म्हणजे अति इच्छा आणि लालसा, ज्यामुळे बाह्य गोष्टी मिळवण्याची तळमळ निर्माण होते.

मोह (Moha) म्हणजे अज्ञान आणि भ्रम, ज्यामुळे आपल्याला वस्तूंचे असत्य स्वरूप दिसते आणि आपण त्यांवर अवलंबून राहतो.

दोन्ही विकार योग आणि तात्त्विक दृष्टिकोनातून मोक्ष किंवा निर्वाण साधण्यासाठी अडथळे मानले जातात, आणि त्यावर मात करण्यासाठी ध्यान, साधना आणि विवेकाची आवश्यकता असते.

मारवा Mon, 06/10/2025 - 05:48

गाजर हे सूचक प्रतीक आहे.
ज्यायोगे प्रस्तुत प्रतिसादक मराठी संस्थळांच्या अलिखित
सांस्कृतिक मर्यादांचे काटेकोर पालन करीत आपल्या नाजूक भावना अभिव्यक्त करीत आहे.
तसेच प्रस्तुत प्रतिसादक हळव्या मनाचा असल्याने आणि त्याचा पिंड अस्सल भारतीय संस्कृतीने पोसलेला असल्याने त्याला दोन फुले एकमेकांवर आदळली एवढे चित्रीकरण पुरेसे वाटते.
भागवत आणि कमळी ही काल्पनिक पात्रे आहेत ज्यायोगे प्रस्तुत प्रतिसादक आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न (निष्फळ) करत आहे.

anant_yaatree Mon, 06/10/2025 - 08:52

धाग्यात कोठेही दूरान्वयेही उल्लेख नसताना गाजराची आठवण व्हावी?
गाजरपारखीपणाची हद्द झाली :)

'न'वी बाजू Tue, 07/10/2025 - 04:29

In reply to by anant_yaatree

कवीला जर म्यानाचा शेप दिसू शकतो, तर त्यांना साधे गाजरसुद्धा दिसू नये? सरासर अन्याय आहे हा!

(तरी बरे, म्यानाचा ‘शेप’च म्हणालात, म्यानाची ‘फिगर’ म्हणाला नाहीत. (आणि, ‘म्यानात घुसलेल्या तलवारी’तून आणखीही नाही नाही त्या कल्पना लढवल्या नाहीत.) तसे केले असतेत, तर अन्य पाच रिपुंपर्यंत पोहोचू शकला नसतात. सारांश: सहांपैकी पाच रिपुंचा स्पर्श होऊ जर द्यायचा नसेल, तर ‘कामा’स सर्वस्वी वाहून घ्यावे. (नाहीतरी ‘संभोगातून समाधीकडे’ असे जे म्हणून ठेवलेले आहे, ते कशासाठी आहे मग?) असो चालायचेच.)