Skip to main content

वारी.....

ओढ तुझ्या भेटीची,
आज लागली या मनाला..
चरणी तुझ्या लीन व्हाया,
निघालो पंढरपुरा....

प्रत्येक श्वासात माझ्या,
तुझ्याच नामाचा गंध दरवळतोय..
टाळ-मृदंगाच्या निनादात,
जणू तूच आम्हा नाचवतोय...

डोळ्यांसमोर फक्त तुझीच छाया,
तुझीच मूर्ती जडली आहे..
पाऊल-पाऊल चालताना,
अवघ्यात पंढरी घडली आहे...

ओठांवरी ह्या नित्य अभंग,
‘पांडुरंग पांडुरंग’ जपण्यासाठी..
आसुसलेत हे डोळे माझे,
सावळे रूप पाहण्यासाठी...