anant_yaatree Sun, 29/03/2026 - 12:00 मृगजळाचा पूर , माझे भग्न तारू नापिकीची सुगी न सरते, काय पेरू ? उत्सवांचे ढोल ताशे गगनभेदी कर्णबधिरांचीच आता रोज सद्दी ? व्यापुनी अवघ्यास कृ बु अतृप्त उरली मानवी सृजनास आता कोण वाली? अजूनही क्षितिजावरी अस्पष्ट तारे अंधकाराची फिकीर मी का करू रे ? Like Dislike Log in or register to post comments