Skip to main content

ओळखलंत मला?

मला ओळखलंत?

आपलं पवित्र वगैरे कर्तव्य पार पाडून ज्याने सांड निवडून दिला होता त्या वळूनं परवा गोठा बदलला बघा..
..तो कर्तव्यदक्ष निवडकर्ता मीच

रात्रीचा दिवस करून, मर मर अभ्यास करून परीक्षा देऊन सुस्कारा सोडताना ज्याने फेर परीक्षेची सुवार्ता ऐकली बघा...
...तो सहनशील मीच

परवाच्या पावसात मुंबई स्पिरीटचा उद्धार करत तुम्बईतून जाताना धरणीने मॅनहोलमधून ज्याला पोटात घेतले बघा..
...तो स्पिरिटेड मीच

समूळ काँक्रिटलेले झाड धाराशायी होत असताना जो मध्ये तडफडला बघा...
..तो वृक्ष-सोयरा मीच

ओळखलंत मला?
सॉरी, कसं ओळखणार तुम्ही तरी मला?
मला चेहराच कुठंय?