मनातले मन्सूर...
मनातले मन्सूर...
=========
राजीव उपाध्ये
आयुष्यात ज्या गोष्टी मस्तीत एन्जॉय केल्या त्यातील एक म्हणजे - फोटोग्राफी. माझ्या फोटोग्राफीचे लौकीक मापदंडाने मोजमाप होणार नाही आणि तशी इच्छा पण नाही. कारण त्यासाठी जे हितसंबंध जपावे लागतात, ते उद्योग मला जमणार नाहीत, पण अजुनही अनेक ठिकाणी माझे फोटो अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमात पोस्टर, होर्डींगसाठी वापरले जातात तेव्हा ती पावती मला मह्त्त्वाची वाटते.
फोटोग्राफी मस्तीत केली असली तरी काही अपूर्ण इच्छा राहील्या होत्या. मला भेटलेल्या दिव्य व्यक्तीमत्त्वाचे फोटो तेव्हा डीजिटल माध्यम नसल्यामुळे आणि फिल्म फोटोग्राफी परवडणारी नसल्यामुळे...
तरी पण आज ए०आय० मुळे ही हौसपण भागवता येते आणि कल्पनेतील अनेक प्रयोग प्रत्यक्षात उतरवता येतात...
असाच एक मन्सूरांचा क्लिक प्रत्यक्षात मी कधी काढला नाही, पण ए०आय० मुळे मनातले मन्सूर क्लिक करता आले.
थॅंक यू ए०आय०!