Skip to main content

नाटकवाला वीकेंड

अखेरीस यावर्षी भारतात येणं झालं. महिनाभराचा काळ म्हणलं तर मोठा , म्हणलं तर छोटा ! या काळात मित्रांना/नातेवाईकांना भेटणे , घरातली कामे आटपणे, इतर काही गोष्टी आणि महत्वाचं म्हणजे नाटकबिटक , गाणंबिणं याचा बॅकलॉग भरून काढणे असं सगळं करण्याचा प्लॅन असतो. हा वीकेंड ( तीस/एकतीस जुलै ) दोन प्रयोग पाहण्यात गेला. शनिवार संध्याकाळ भरत नाट्य मंदिरात शेखर नाईक प्रॉडक्शन निर्मित “व्हिन्सेंट वॅन गॉग” अभिवाचनाचा प्रयोग झाला. ही संहिता म्हणजे आयर्विंग स्टोनने लिहिलेल्या पुस्तकाचं माधुरी पुरंदरे यांनी केलेल्या भाषांतराचे ( प्रकाशन साल बहुधा १९७७/७८) काही तुकडे !

ललित लेखनाचा प्रकार

मैत्रिण.

बर्‍याच दिवसांनी तिला मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते.

इतकं पाणी कि महापूर. त्या पाणलोटात पूल वाहून गेला होता.

ललित लेखनाचा प्रकार

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १५

गेल्या भागात मुंबईच्या विकासाची माहिती घेतली होती. पुणे हे देशातील शिक्षण आणि समाजसुधारणा आणि राजकारण यांचे केंद्र म्हणून विकसित झाले. एकोणिसाव्या शतकात पुण्याचा विकास कसा झाला त्याची माहिती या भागात.

गणेशोत्सव आणि मी

गणपती उत्सवाकडे पाहण्याची माझी दृष्टी लहानपणापासून कशी बदलली आहे ते आज अचानक माझ्या लक्षात आलं. माहेरी नायगांवकरांचा गणपती मोठ्या काकांकडे मनमाडला असायचा. दर वर्षी जाणं जमायचंच असं नाही, पण गेलो की गौरींसाठी तिथे असायचोच. तिथे सप्रे काॅलनीतल्या चाळीतलं दोनतीन खोल्यांचं घर, समोर मोठी गच्ची. गणपती अगदी छोटा असायचा, फूटभर उंचीचाही नसेल. त्याचं नवल वाटायचं, कारण मुंबईत इतकी लहान मूर्ती पाहायला नाही मिळायची. गौरी मात्र चांगल्या उंच. गौरींचं जेवण खासच असायचं, असतं. तेव्हा तशी लहान असल्याने कामात मदत वगैरे केल्याचं आठवत नाही. पण बहुधा सगळे काकाकाकू, भावंडं असायचो, धमाल असायची.

अंत झाला अस्ताआधी - मिहाइल सर्गेय्विच गोर्बाचोव

It is not always going from bad to worse that leads to revolution. What happens most often is that a people that puts up with the most oppressive laws without complaint, as if it did not feel them, rejects those laws violently when the burden is alleviated.....The evil that one endures patiently because it seems inevitable, becomes unbearable the moment its elimination becomes conceivable. - Alexis De Tocqueville *
(* source - The collapse - Mary Elise Sarotte)

मिखाईल गोर्बाचे‌व मिहाईल

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

शुभेच्छा

आज गणेश चतुर्थीच्या दिवशी मराठीतील महत्त्वाचे संस्थळ मिसळपाव डॉट कॉम ची स्थापना झाली.
आज मिसळपाव स्थापनेला 16 वर्षे पूर्ण होत आहेत

त्यानिमित्ताने मिसळपाव संस्थापक, चालक व सर्व आजी माजी सदस्यांना संस्थपन दिनाच्या शुभेच्छा..

पृथ्वीचे शत्रू

‘No matter what we do, an asteroid is going to wipe us out. So we should party hard and wreck the place!’ – to which Homer replies: ‘Yeah, why should the asteroid have all the fun?’

पृथ्वीची सध्याची (साल २०२०) लोकसंख्या आहे ७९६ कोटी आहे.

लोक बिंदास जीवन जगतायेत.

ललित लेखनाचा प्रकार

बालपणीचेआनंदनिधान-१

बालपणीचेआनंदनिधान-१
आजी आणि हॉस्पिटलमधील आजोळ!
माझ्या वयाच्या म्हणजे सत्तरीकडे झुकलेल्या कोणाच्याही बालपणीच्या स्मृतिरंजनात ‘आजी’ हा अविभाज्य घटक असणे अगदी स्वाभाविक आहे. अगदी लहान असताना मांडीवर घेऊन झोपविताना आणि थोडे मोठे झाल्यावर आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपताना तिने सांगितलेल्या रामायण-महाभारतामधील गोष्टी, चातुर्मासातील विविध कहाण्या आणि असंख्य श्लोक व स्तोस्त्रे हे बालपणीच्या कौटुंबिक संस्कारांचे मोठे संचित असते. माझ्याही बालपणात ‘आजी’ हा एक प्रभावी घटक नक्कीच होता. पण इतरांसारखे माझ्या वाट्याला मात्र आजीकडून हे संस्काराचे संचित आले नाही.