Skip to main content

ब्राउझर बदलाने हे थांबेल का?

आपण नेमके आंतरजालावर काय काय करतो याचा दुवा घेऊन आपला फोन आपल्यावर पाळत ठेवतोय हे एवढं आता सगळ्यांना माहीत झाले आहेच, परंतु एकमेकात सुरू असलेले बोलणे ऐकून त्या संदर्भातल्या जाहिराती किंवा गुगल फीडस आपोआप येतात हे नव्यानेच मला समजले .थोडक्यात मोबाईल आपलं बोलणं ऐकतोय याविषयी खात्री पटू लागली आहे.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २३

भारतात पायाभूत उद्योगाची सुरुवात एकोणिसाव्या शतकातच झाली, पण ते काम भारतीयांनीच बहुतांशी केले.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २२

१८१८ ते १९२० या कालखंडात असे दिसते की भारतातील कलावंतांना साखळदंडातून मुक्तता झाल्यासारखे वाटले. वाङ्मय, संगीत, चित्रकला, खेळ सर्वच क्षेत्रांत नवनवीन प्रयोग या काळात झाले.

लक्षात ठेवा तुम्ही लहान असताना

लक्षात ठेवा तुम्ही लहान असताना, तुम्ही सूर्यासारखे चमकले होते.
तुझ्या भन्नाट हिरयावरची चमक.
आता तुझ्या डोळ्यात एक नजर आहे, जसे आकाशात कृष्णविवर.
तुझ्या भन्नाट हिरयावरची चमक.
पोलादी वाऱ्यावर उडणारे बालपण आणि स्टारडम यांच्या क्रॉसफायरमध्ये तुम्ही अडकलात.
चल तू दूरच्या हास्याचे लक्ष्य, ये अनोळखी तू, आख्यायिका, तू शहीद, आणि चमक!

तुमचे विचार बदलले आहेत का?

प्रत्येक व्यक्तिच्या विचारांची एक घडण असते. संस्कार(घरातले, शाळेतले, बाहेरचे), दृक-श्राव्य-लिखित माध्यमांतून होणारा माहितीप्रसार, विविध विचारप्रणाली, धर्म आदीच्या शिकवणी, पर्यावरण, लोकपरंपरा, रूढी आणि अर्थातच या सगळ्यांनी मिळून बनलेल्या चाकावर फिरणारे आपले मडके विवेकाच्या थापीने थोपटून आपले विचार बनलेले असतात. ते नेहमीच अगदी सुसंगत किंवा विवेकनिष्ठ असतीलच असे नाही. शिवाय त्या विचारांचा प्रभाव वर्तनात १००% दिसून येत असेलही नाही.

एकच ध्रुव असलेला चुंबक्

कोणतेही पट्टी चुंबक घेतले तर त्याला लांबीच्या एका बाजूला दक्शीण आणि दुसऱ्या बाजूला उत्तर ध्रुव असतो.
चुंबकाचे दोन विरुद्ध ध्रुव एकमेकाना चिकटतात ( उत्तर + दक्शीण )
एका सरळ रेषेत असे दोन पट्टी चुंबक एकमेकाना चिकटवले ( उ - द + उ- द) तर आपल्या दोन ध्रुव ( उ-द) असलेला एक चुंबक मिळेल.
हा चुंबक हवेत टांगला असता उत्तर दक्शीण दिशा दाखवेल.
चुंबकाचे समान ध्रुव एकमेकाना आकर्षित करत नाहीत. ते एकमेकाना दूर ढकलतात.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २१

इंग्रजांनी आधुनिक शिक्षण सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. इंग्रजांनी चालू केलेल्या शिक्षण संस्थातून जे भारतीय बाहेर पडले त्यांना शिक्षणाचे महत्त्व लगेच कळले. वर्तमानपत्र आणि छापखाने ही कल्पनाही भारतात नवीन होती. आधुनिक भारताचा तो पाया झाला.

टोनी सोप्रानो

१९९९ साली अमेरिकेत नवानवा आलेलो होतो. इंटरनेटसुद्धा नवंनवंच होतं. फास्टम फास्ट इंटर्नेट, स्मार्ट फोन्स, सोशल मिडिया, गूगल-फेसबुक जन्माला आलेले नव्हते. स्ट्रीमिंगचा स्फोट व्हायचा होता. "सेक्स अँड द सिटी" आणि "द सोप्रानोज" या सिरियली साधारण एकाच वर्षी "एचबीओ" वर आलेल्या होत्या. 

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

न्या. धनंजय चंद्रचूड होणार देशाचे ५० वे सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्या. डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड भारताचे ५० वे सरन्यायाधीश होतील, हे मंगळवारी औपचारिकपणे स्पष्ट झाले. विद्यमान सरन्यायाधीश न्या. उदय उमेश लळित येत्या ७ नोव्हेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर न्या. चंद्रचूड न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाची सूत्रे स्वीकारतील. न्या. चंद्रचूड यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ दोन वर्षे दोन दिवसांचा असेल. १० नोव्हेंबर, २०२४ रोजी वयाला ६५ वर्षे पूर्ण होतील तेव्हा ते त्या पदावरून निवृत्त होतील. सरन्यायाधीश म्हणून न्या. चंद्रटूड यांचा कार्यकाळ अलिकडच्या काळातील सर्वाधिक असेल.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स