Skip to main content

राजपुत्राचा विवाह

गेल्या शनिवारची गोष्ट. मे महिन्यातील शनिवारची दुपार. बाहेर रणरणते उन. त्यामुळे सुट्टीचा दिवस असूनही बाहेर जावेसे वाटत नाही. जेवण होऊन सुस्तावलो होतो. काहीतरी वाचावेसे देखील वाटत नव्हते. थोडावेळ रेंगाळून झोपावे असा विचार करत टीव्ही लावला. एके ठिकाणी कर्नाटकतील भाजपाचे येडेरुप्पा मुख्यमंत्री असलेले सरकार दुपारी विश्वासमत अजमावणार होते, त्याबद्दल घमासान चर्चा चालली होती. दुसरीकडे, CNN वर सहज आंतराष्ट्रीय बातम्या पहाव्यात म्हणून गेलो, तर तेथे इंग्लंडच्या राजपुत्राच्या विवाहाचा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण चालू होते.

ललित लेखनाचा प्रकार

बकेट लिस्ट समीक्षा

बकेट लिस्ट बघून आलो
बघितल्यावर खालील जाणिवा झाल्या :
१. प्लास्टिक हा अत्यंत नैसर्गिक, सेंद्रिय आणि झपाट्याने विघटनशील पदार्थ आहे .
२. माधुरी दीक्षित शिंदे पुलावर उभी राहिल्यावर ओंकारेश्वराचे मंदिर सुंदर व तरुण वाटते ( ताजा ऑइल पेंट हेच काय ते दोघांमधील साम्य)
३. प्रभात रोड वरच्या आपट्यांच्या बंगल्यात अजूनही पापड लाटून टाईमपास करतात .
४. माणिक वर्मांची मुलगी अजूनही लाऊड मराठीतून इंग्लिश बोलण्याचे क्रूड विनोद करते .
५. सिटी प्राईड कोथरूडला आवाज मोठा आणि एसी छोटा ठेवतात , त्यामुळे झोप लागू शकत नाही
६. माझ्या नवऱ्याची बायको नावाची सिरीयल अत्यंत डीप असावी

समीक्षेचा विषय निवडा

पाषाणसंगीत रॉक्स ... अँड चॅट्स अर्थात संगीत रॉकगफ्फा

तर मंडळी असं झालं की तरुण तडफदार इंग्लीससंगीतप्रेमी चौदावे यांनी माझ्यासारख्या न लिहू शकणाऱ्या आणि निस्त्या गफ्फा हाणणाऱ्या इसमाला लय म्हणजे लय पिडलं कि बोला बोला ...................आणि मग खरडफळ्यावर चौदावे ,मिहीर , पुम्बा , दस्तुरखुद्द गविशेठ आणि विषयात फारसा इंटरेस्ट नसूनही पोरांच्या उत्साहाला स्फूर्तीदाते आचरट बाबा यांच्या गफ्फा सुरु झाल्या .

बैजवार रचून ठेवलेलं दारिद्र्य

****बैजवार रचून ठेवलेलं दारिद्र्य***

फुटक्या कौलांच्या खाली झाकून ठेवलेले ते एका खोलीच पडकं घर लैच चिकाटीच होतं .

आज पडेल, उद्या पडेल म्हणत चांगलच टिकून होत.

छपराच्या भोकातून अन पडक्या भिताडाच्या कोपऱ्यातून चांगलाच थंडीचा वारा घुमायचा घरात.

पण गोधडीच्या आत ती आणि तीच पोरगं चांगलीच ऊब धरून झोपायची.

त्यांच्या पायाजवळ शेळी करढ सुद्धा त्यांना ऊब देत झोपायची.

जशी ती उठली तशी लगेच शेळी आणि करढू सुद्धा अंग झटकत उठलं.

तिने गोधडीत लपलेल्या शेळीच्या चुकार लेंड्या अंथरुणाबाहेर टाकल्या आणि पोराच्या अंगावर गोधडी टाकली ; पोरगं तसच मुरकाटून झोपलं .

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या जवळ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

अजूनही सिनेमाच्या सुरुवातीला सर्टफिकेटवर 【 हिन्दी 】 【 रंगीन 】 【 सिनेमास्कोप 】 असं टाईप करतात का?

कंसाची नक्षी जरा वेगळी असायची लहानपणी.

इतक्यात लक्षच गेलं नाही.

ही बातमी समजली का - भाग १७५

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.

जत्रातील प्रेमाची गोष्ट

पाराकं आरगन वाजल.बॅन्डवाल आलं.ते आलं की सलामी देत्यात. आरगनाचा मोठा आवाज सा-या गावात घूमू लागला. तशी बारकाली पोरं...पोरी चींगाट पाराकं पळाली. मोठाली बरीचं माणसं तिथचं होती. कुणी रावश्याच्या दुकानाच्या दारात.. कुणीबुणी चावडीच्या दगडाला बूड टेकून बसलेली… आज गावची जत्रा.शेताभीतात कुठं जाता येतं? तिथचं टायमपास करीत बसलेली.चार पाच टोळभैरी पोरं भी व्हती.सांवताच्या घराला पाठ देउन बसलेली. पोरं कुठं नुसते गप बसत आसतेत व्हयं? मोबाईल चिवडीत होती.बँन्डवाल्यानं सलामी दिली.आगोदर.. गणपतीची आरती.मग एक मस्तं गाणं.. वाजवल.त्यांच्या भोवती गर्दी जमा झाली आणि ते थांबले.सलामी झाली की ते पारावर टेकलं.

ललित लेखनाचा प्रकार

आकलन व आत्मभान ..

आपण जे विचार अगदी मनापासून मांडतो आहोत , ते ऐकणाऱ्याला वाचणाऱ्याला खरतर अंशतःच समजत आहेत ; आणि म्हणून स्वतःच्या उक्ती-कृतींचा विपर्यास होतो आहे याची जाणीव झाली की हताश अर्थशुन्यता वाटते . गैरसमजांमुळे विनाकारण मतभेद व मनस्ताप होतो , पण यातून उद्भवणाऱ्या भावनाविवशतेला लवकरात लवकर निकराने बाजूला सारून बौध्दिक पातळीवर या परिस्थितीचे तार्किक विश्लेषण केल्यास , असे लक्षात येते की स्वतःची गृहीतके , धारणा , पूर्वानुभव व पूर्वग्रह हे इतरांच्यापेक्षा निराळे असल्याकारणाने; इतरांना त्याच भाषेतील त्याच शब्दांचे निराळे व वेगळ्याच वजनाचे अर्थ प्रतीत होत असतात .

ललित लेखनाचा प्रकार

पहिली ट्रेक

५ वर्षापूर्वी नुकताच कॉलेजातून निघून नोकरीला लागलो होतो वीकएंड ला घरी म्हणजे अलिबाग ला जात असे. जाताना अचानक विचार आला काय आयुष्य झालंय. कंपनी-रूम-कंपनी-रूम कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे. मुंबईला जाताना भरपूर वेळा कर्नाळा किल्ल्याचा उंच सुळका दिसायचा पण कधी तिथे जायचा संबध आला नव्हता. आणि ठरवलं आज त्या उंचीवर जायचं म्हणजे जायचं. पाण्याची बाटली होतीच पटकन एस्टी स्टँड मधून बिस्कीट चा एक पुडा घेतला.गाड्या कर्नाळा थांबा घेत नव्हत्या शेवटी एक लोकल बस मिळाली आणि पक्षी अभयारण्य तिकीट फाडले कंडक्टर बाई विचारायला लागली एकटाच? मी म्हणलो नाही, मित्र पुढे गेलेत.