Skip to main content

आळशी बायका

घरकामात आळशी असलेल्या बायका मला खूप आवडतात. त्यांच्याकडे बोलायला वेळ असतो. आपणही बडबडत बसलं तर ते सारं ऐकायलाही चिक्कार वेळ असतो. बरं कामसू बायकांप्रती त्यांच्या मनात अपार आदर असतोच. कामसू बायकांचा आदर्श ठेवत आपणही एक दिवस म्हणजे एखाद्या वेळेपुरतं तरी किमान त्यांच्यासारख्या बनूनच दाखवू, अशी त्यांच्यात जिद्द असते. त्या काही सकाळी पाचला उठत नाहीत. त्यामुळे लौकर उठून घसाघसा काम करत जगावर करवादणार्या बायांमधे केवळ लौकर उठून सारे वेळेत आटोपल्याने जो एक अहंकार वाढीस लागतो तो आळशी बायकांमध्ये नसतो.

कर्तव्यपूर्ती

कंपनीच्या एकाच ऑफीसमध्ये दामले, जाधव, जगताप व मेश्राम हे चार जण काम करत होते. त्यांच्या बॉसचे नाव होते कारखानीस. कामाचे वाटप करणे, इतरांकडून व सहकाऱ्यांकडून झालेल्या कामाचा अहवाल तयार करणे, कामाचा पाठपुरावा करणे, आणि यानंतर नेमके काय करायचे याचा निर्णय घेणे याची पूर्ण जबाबदारी कारखानीस यांच्यावर होती. कारखानीस व त्यांच्या चार सहकाऱ्यांची टीम कार्यक्षम होती. कुठल्याही तक्रारीला येथे जागा नव्हती.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

४ जून- बिजिंगच्या तियानानमेन चौकात कम्युनिस्ट चिनच्या कत्तलीत मारल्या गेलेल्या १०,००० चिनी युवकांच्या बलिदानाचा २९ वा स्मरणदिन!

४ जून- बिजिंगच्या तियानानमेन चौकात कम्युनिस्ट चिनच्या कत्तलीत मारल्या गेलेल्या १०,००० चिनी युवकांच्या बलिदानाचा २९ वा स्मरणदिन!

१९८९ च्या एप्रिल पासून चिनमध्ये लोकशाहीच्या मागणीसाठी चिनी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले. बिजिंगच्या तियानानमेन चौकात हजारो युवा ठाण मांडुन बसले. आंदोलने शेकडो शहरात पसरली. डेंग जियाओपिंगने धमक्या देऊनही युवक माघार घेईनात. कम्युनिस्ट सरकारने निःशस्त्र विद्यार्थ्यांच्या दमनासाठी सैन्याच्या आरमर्ड डिव्हिजन्स तैनात केल्या!

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ये रे ये रे पावसा

ये रे बाबा लौकर!
मोरांपासून बेडकांपर्यंत सारे आकाशाकडे डोळे लावून बसलेयत
तुझ्या वर्षावात चिंब व्हायला

अभिजात कवींपासून र ट फ शब्दजुळार्‍यांपर्यंत सगळे टपलेयत तुझी रिमझिम अन् आपापल्या उबळी
शब्दात कोंबायला

इथली झाकणगायब माणूसगिळी मॅनहोलं केव्हाची वाट पाहून र्‍हायलीयेत
तुझ्या ढगफुटीत ओतप्रोत तुंबायला

बघ, भेगाळलेला शेतकरी पण तयार झालाय पुढच्या दुष्काळापर्यंत
आत्महत्या लांबवायला.

मराठी यु ट्यूब वर बदलते वारे

कोरी पाटी प्रोडक्शनच्या "गावाकडच्या गोष्टी" च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी यू ट्यूब वर ग्रामीण भागातल्या वेब सिरीजचा ऊत आला आहे. कोरी पाटी चे वेगळेपण असे की अतिशय अल्पावधीत त्यांनी "भाडीपा" सारख्या स्टार कास्ट असलेल्या मराठी चॅनेल पेक्षा दुप्पट सबस्क्रायबर्स मिळवले आहेत. तुम्हाला हे चॅनेल माहीत नसेल तर त्यांचा हा इंटरव्ह्यू पहा.
https://youtu.be/DuKodeZd_ms

ललित लेखनाचा प्रकार

रेम्माम्मा रेम्माम्मा रे..

भेंड्या खेळाव्यात. मुळातच हरकत किंवा वैर नाही. छान बैठा खेळ आहे. उगीच पळापळ नको. जरा मधेमधे चारेक टाळ्या वाजवल्या की झालं.

आणि बसने वगैरे दूर दूर जाताना, ऍज अ टुरिस्ट ग्रुप हक्काचं आपलं मराठी माणूस आपल्याला मुंबई ते मुंबई हाकलून हाकलून परत आणताना... किंवा नातेवाईक मिळून टेम्पो ट्रॅव्हलरने तीन दिवसांत अष्टविनायक "करत" असताना .. उपयोगी पडतो वाटेत हा खेळ.

जनरली एक पन्नाशीतले तरुण काका बसमध्ये हे सुरु करतात. त्यांना गायची आवड असते. सगळी गाणी तेच काका म्हणतात. इतरजण पहिला अर्धा तास जोरात आणि मग क्षीण टाळ्या वाजवतात. खर्ज आवाजात पुटपुट करत ओठ गाण्यानुसार हलवतात.

स्वमग्न लोनसम

स्वमग्न लोनसम
त्याला बघितल्या बघितल्या पहिल्यांदा मला आठवलं ते "अलिबाबा चाळीस चोर"...
लहानपणी बघितलेलं...
गिरगावच्या साहित्यसंघात...
सुट्टीत... अशाच रण्ण उन्हाळ्यात.
बहुतेक सुधा करमरकरांचं असावं कारण प्रॉडक्शन खूपच छान होतं.
खास करून गुहेतला खजिना:
त्यातल्या हंड्यातून सांडणाऱ्या धम्मक पिवळ्या सोनमोहोरा...
त्यांचं ते पिवळं गारूड अस्संच!

स्पर्धा का इतर?

झगामगा, माफी मागा

माफकच पैसे बँकेत ठेवायचा विचार आहे. त्यानुसार आजपासून रोज फुरसतीच्या वेळेत खर्च सुरू केला आहे. ज्या गोष्टींच्या जाहिराती फेसबुकवर दिसतील, पॉर्नोग्राफीक फोटो लावलेले असतील, जे सतत डोक्याशी खिटखिट करतील अशाच वस्तू विकत घेतल्या जातील. खेरीज ज्या वस्तू अनेक वर्षं गरजेच्या होत्या - पण अजिबात जाहिराती करत नाहीत - अशा भाज्या, फळांनाही वगळलं जाईल. कळावे किंवा कळू नये.