मॅट्रिक ते मॅट्रिक्स्
ही कथा वा निबंध बऱ्याच पूर्वी पूर्वप्रकाशित आहे. आय.डी. अर्थातच वेगळा होता. कदाचित, बहुसंख्य ऐसीकरांनी या आधी वाचलाही असेल. पण, ज्यांनी नसेल वाचला, त्यांच्यासाठी!
“द मॅट्रिक्स” हा प्रसिद्ध इंग्रजी सिनेमा पाहिल्यावर असे मनांत आले की, हा सिनेमा जर कोणी गांवाकडच्या व्यक्तिने पाहिला तर तो त्याची गोष्ट कशी सांगेल ? या कल्पनेवर ही कथा लिहिली आहे.
- Read more about मॅट्रिक ते मॅट्रिक्स्
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5794 views
त्याचा ब्लाॅग
तेव्हा डोळ्यात लोलक होते
सिंदबादी स्वप्नं होती
बोटाबोटात परीस होते
ओठी थोर गाणी होती
वेळोवेळी करंदकाळी
धोंड साचलेलं अडवायची
लेखनलाट भिडून तिच्या
सुबक ठिकर्या करायची
कीबोर्डावर त्याची बोटं
वीज लाजेलशी लहरायची
उमटायची मग स्क्रीनवरती
भळभळ शब्दांपलिकडची
चाकोरीत तो आज धावतो
वेगाने, पण गायब आग,
गंजून गेलीय जुनाट छिन्नी,
शरशय्येवर त्याचा ब्लाॅग
हल्ली जेव्हा कुंद सकाळी
त्याचा ब्लाॅग साद घालतो
औटघटकेच्या लाक्षागृही
तोच चुपचाप चूड लावतो
- Read more about त्याचा ब्लाॅग
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6685 views
सॉर्टेड लोक
मला सॉर्टेड लोकांचा फार हेवा वाटतो. सॉर्टेड लोकांना साधारणतः सातवीत असतानाच त्यांचा पुढचा करियर ग्राफ माहिती असतो. सॉर्टेड लोक दहावीला बोर्डात येतात. कुठल्या स्ट्रीमला पुढे डिमांड आहे हे त्यांना नीट माहिती असतं. ते त्याच स्ट्रीमला जातात. त्यानुसार त्यांचं करियर ऊर्ध्वगामी सरळ रेषेत जात राहतं.
- Read more about सॉर्टेड लोक
- 30 comments
- Log in or register to post comments
- 36876 views
मी ह्या सगळ्याकडे कसं पाहते..
आपली आपली म्हणता येणारी अनेक माणसं एकेक करत सोडून जातात. आधी वाईट वाटायचं आता थोडीफार सवय घालून घेतली. पूर्वी मी हातातून सुटून चाललेली नाती जपण्याचा खूप प्रयत्न करत असे. पण आता जाणार्याला शांतपणे जाऊ देते. थांबवण्यासाठी अजिबात प्रयत्नांची शर्थ वगैरे करून जिवाचे हाल करून घेत नाही. आपण कुठे चुकलो का ह्याचा भरपूर विचार करते. जेव्हा आपल्या बाजूने आपण शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला पण समोरची व्यक्ती नाही समजू शकली ह्याची खात्री पटते तेव्हा मी चर्चा, स्पष्टीकरणं, तडजोड, वाद असं काही करायला जाणं सोडूनच दिलय जणू. कारण मला ह्या सगळ्याचा मानसिक थकवा येतो. अतिशय.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मी ह्या सगळ्याकडे कसं पाहते..
- 15 comments
- Log in or register to post comments
- 14003 views
पद्मा
'पद्मा'
(फोटो दिसत नसेल तर इथे पाहावा.)
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about पद्मा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6910 views
माथेरान - भाग 1
(ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत असलेले एक ब्रिटिश अधिकारी सर जेम्स डग्लस (1826-1904) यांनी मुंबई, जवळपासची स्थळे आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत अनेक लेख लिहिले होते. या लेखांचे संकलन करून त्यांना आपली पुस्तकेही नंतर प्रसिद्ध केली होती. या लेखांमधील त्यांचा माथेरान बद्दलचा 1890 मधे लिहिलेला लेख मला मोठा वाचनीय वाटला त्या काळचे माथेरान मुंबईच्या गोर्या साहेबांना कसे दिसत होते याची एक झलक आपल्याला या लेखात दिसते. वाचकांना या लेखाचा हा अनुवाद आवडेल अशी अपेक्षा आहे.)
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माथेरान - भाग 1
- 23 comments
- Log in or register to post comments
- 15989 views
एक उनाड संध्याकाळ
एके दिवशी मला 'एक उनाड संध्याकाळ' कशी व्यतीत करावी लागली, त्याचा एक किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे असे झाले, मी कामावरून रोज संध्याकाळी बरोबर पाचच्या दरम्यान ऑफिसमधून घरी येतो. दुपारी १२ च्या दरम्यान आमच्या सौं.नी मला ऑफिसमध्ये फोन केला. "अहो! आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का? आणि हो! बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या"
- Read more about एक उनाड संध्याकाळ
- 16 comments
- Log in or register to post comments
- 6902 views
आमची मराठी वेब सिरीज
नमस्कार,
- आजच्या धावपळीच्या जगात लोकांमधला खरा संवाद हरवत चाललाय असं तुम्हाला वाटतं का?
- घरात, बाहेर सगळीकडे सर्वजण आपापल्या मोबाईल-कॉम्पुटर मध्ये डोकं खुपसून बसलेत असं तुम्हाला वाटतं का?
- पुढच्या पिढीचे गॅजेट ऍडिक्शन मुळे वांधे होणार आहेत अशी तुम्हाला सतत चिंता वाटते का? या चिंतेमुळे तुम्ही एक-दिवसाआड उसासे सोडत आपलं ब्लडप्रेशर वाढवत आहात का?
- घरोघरी सतत चालू असणारे टिव्ही., त्यावरच्या अमृत-प्राशन केलेल्या मालिका - यात रमणार्या कुटूंबातील प्रत्येकाचं घरातल्या माणसांशी नातं आणि संवाद दोन्ही तुटत चाललंय, असं तुम्हाला वाटतं का?
स्पर्धा का इतर?
- Read more about आमची मराठी वेब सिरीज
- 8 comments
- Log in or register to post comments
- 10632 views
तिथे ओठंगून उभी
रानपाखरांची घरे
अंगीखांदी जे माळते
असे झाड फुलताना
पान पान किल्बिलते
क्षितीजाशी विझताना
चांदणे जे उसासते
त्याचे पहाटे पहाटे
अनवट गाणे होते
ओढे ओहोळ पिऊन
नदी खळाळत जाते
ऐलपैलतीरी रात्री
पाण-पैंजण वाजते
फुफाटल्या मातीवर
मृग शिंपण घालते
घमघम अत्तराची
कुपी मग ओसंडते
नाद-शब्द-ताल-गंध
जिथे जिव्हारी भिडते
तिथे ओठंगून उभी
एक कविता असते
- Read more about तिथे ओठंगून उभी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 8212 views
प्रोस्टेट मिल्किंग - प्रोस्टेट मसाज.... उर्फ पुरूषवाला "जी-स्पाॅट"
Taxonomy upgrade extras
फार पूर्वी एक व्हिडीओ पाहिलेला. त्यात एक पुरुष एक सेक्स-टॉय आपल्या मागून घालतो आणि तो त्याच्या शिश्नाला हातही न लावता त्याचं वीर्य गळू लागतं. मला ते पाहून येवढं 'मॅजिकल' वाटलेलं की साला हे कसं शक्य आहे म्हणून मी फारच माझं डोकं खाल्लेलं. ज्या मुलींना माहित नाही त्यांच्यासाठी - एकवेळ बायका त्यांच्या लिंगाला हात न लावता निव्वळ कल्पनेने ऑरगॅजम करू शकतील, पण पुरुष त्याच्या शिश्नाला/वृषणाला स्पर्श केल्याशिवाय ऑरगॅजम करू शकत नाही. (नाईट फॉल वेगळी गोष्ट, ते वयात वगैरे येतानाच्या गोष्टी). पुरुषांचं मॅकेनिजम वेगळं आहे. तरी कुणी अपवाद असू शकतीलच.
- Read more about प्रोस्टेट मिल्किंग - प्रोस्टेट मसाज.... उर्फ पुरूषवाला "जी-स्पाॅट"
- 62 comments
- Log in or register to post comments
- 73183 views