Skip to main content

मी केलेली पोहे-मुरमुरे भेळ

शनिवारी संध्याकाळी आमचे चिरंजीव घरात आले, त्यांच्या हातात एक आलू भुजीयाचे पॅकट होते. आल्या बरोबरच, आई भूक लागली आहे, भेळ करून देत का? शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळ (हिंदीत – आंधी, या पूर्वी कधी न बघितलेली, १५-१६ तास वीज नव्हती, नुकतीच वीज आल्या मुळे सौ. आराम करायला पलंगावर पहडुली होती). घरात मुरमुरे संपत आले आहे, शिवाय काल भाजी बाजार ही लागला नव्हता, कोथिंबीर, लिंबू ही घरात नाहीत- सौ. मी म्हणालो, मग दडपे पोहे कर. पोहे ही संपत आले आहे- सौ. सौ.चा मूड काही ठीक दिसत नाही. मी चिरंजीवाना म्हणालो, तुझ्या आईची तब्येत काही बरी दिसत नाही आहे. मीच करतो काही तरी. स्वैपाक घरात गेलो.

" राजा कोण ??? "

कुठलाही खेळ असू दे, त्याला "राज्य कुणावर?" ह्या प्रश्नानेच सुरुवात होत असते तसाच काहीसा प्रकार सध्या आपल्याकडच्या सगळ्यात मोठ्या खेळातदेखील सध्या चालु आहे .. खेळ आहे - "राज्य कुणाचं? आणि प्रश्न आहे " राजा कोण ??? " .. आता बघा लहानपणी राज्य घेणारा गडी शोधण्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आणि मग एकेकाला बाद करत करत शेवटी तो राज्याचा धनी सापडे त्याच पद्धती वापरून राज्य कुणाचं आणि प्रश्न आहे राजा कोण ह्या दोन्ही गहन प्रश्नांची उकलही शोधता येईल की ...

तू सुटलास!

एक क्रिकेट सोडलं तर बाकी सगळ्या खेळांत, सुटवायची गरज असायची.
क्रिकेट खेळताना स्पेशल पद्धत असे, पण जर टीम टीम खेळत नसाल, तरच.
नंबर नंबर ह्या पद्धतीत, पोरं नंबरप्रमाणे बॅटिंग करत. आणि त्यासाठी नंबर हवे!
मग पाठीवर नंबर पाडण्याची ती स्पेशल पद्धत वापरत. ह्यात एखादा बकरा निवडला जाई. आणि सगळी जनता त्याच्या समोर उभी असे. मग क्याप्टन आणि वाइस्क्याप्टन- असे दोघे मागे जात.
आणि मग जीवाच्या आकांताने त्या बकर्याच्या पाठीवर गुद्दे मारुन, एक आकडा बोटाने निवडत.
"हा कोणाचा"?
बकरा बराच वेळ विचार करून म्हणे - "ह्याचा"
"हा कोणाचा"?
बकरा पुन्हा विचार करून सांगे - "त्याचा"

गुरुत्वीय लहरी - अलिकडे काय संशोधन सुरू आहे?

मार्च महिन्यापासून खगोलशास्त्राच्या क्षेत्रात बरीच खळबळ सुरू आहे, आणि याचं कारण काही स्कॅम नाही. उलट आत्तापर्यंत जो प्रचलित सिद्धांत होता त्यात दोन मोठ्या आणि इतर बऱ्याच बारीक उणीवा आहेत. त्यातली एक उणीव काही प्रमाणात भरून काढणारं हे संशोधन आहे. या संशोधनाचं महत्त्व असं की कोणत्याही मानवनिर्मित उपकरणातून, अगदी 'सर्न'मध्येही, अतिप्रचंड ऊर्जा-तापमान तयार करता येत नाही, त्यामुळे त्या परिस्थितीत भौतिकशास्त्राचे नियम तपासता येत नाहीत, अशा अतिप्रचंड प्रक्रियेचं निरीक्षण केल्याचा दावा शास्त्रज्ञांच्या एका गटाने केला आहे. सकृतदर्शनी हा दावा मान्य करण्यासारखा आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

भारतातील घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आक्षेप असलेल्या प्रकरणांच्या इतिहासाची माहिती हवी

प्रत्येकवेळी एक नवीन घोटाळा उजेडात तेवढ्यापुरते विचार करतो त्या पेक्षा मोठी बातमी आली की आपण आधीचे प्रकरण विसरून जातो. भ्रष्टाचाराचा विरोध करणारा प्रत्येककाळात नवा नेता उदयास येतो आणि कालांतराने काळाच्या पडद्या आड जातो.

ही बातमी समजली का? - २५

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही.

< वाचनः बदलत्या जागा उर्फ आत बसलेली व्यक्ति >

प्रेरणा
बरेच दिवस हा विषय डोक्यात होता. पण निमित्त ऑफिसातल्या रिकाम्या वेळाचं झालं. लेख तुम्हालाच लखलाभ.

काही लोक संडासात वर्तमानपत्र वगैरे वाचतात हे मला माहिती होतं. पण हा प्रकार खूप प्रचलित असेल असं मला वाटलं नव्हतं. पण मध्यंतरी माझा समज रीतसर उद्ध्वस्त झाला.

अनाकलनीय

माझा मुक्काम सिंगापूरमधे कधीही असला तरी एक गोष्ट मी आवडीने करत असतो. ती गोष्ट म्हणजे टीव्हीवर दाखविल्या जाणार्‍या अनेक भाषांतील वाहिन्यांमधून एखादी कोरियन वाहिनी निवडून त्यावर त्यावेळी दाखविल्या जाणार्‍या मालिकांचे शक्य तितके भाग बघून टाकणे. कोरियन मालिकांमधल्या पौराणिक मालिका मला विशेष पसंत असतात. या पौराणिक मालिकांचे बहुतेक भाग एखादा राजा, राणी त्यांचा राजमहाल आणि तेथे सतत वावरणारे मंत्री आणि इतर रहस्यमय माणसे, त्यांची कटकारस्थाने आणि तेथे घडणार्‍या अनाकलनीय घटना यांच्याभोवती गुंफलेले असतात व एकंदरीत चांगला टाइमपास होतो.

बातमीचा प्रकार निवडा

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १२

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---------

१. ६ महिला (बायका शब्द अर्थशः चूक आहे का?), २५% कॅबिनेट महिलांचे.