बावी
--------------------कविता चालू ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बावी यक्कं बावी, बावी दुनि चव्वेचाळ;
बावी त्रिक सासट, बावी चोक अट्ट्यांशी;
बावी पंचे धागोदर्शे, बावी संग बत्तिसाचे;
बावी सत्तं चोपन्नाचे, बावी आठ्ठं श्यातरीचे;
बावी नम अट्यानवाचे, बावी धाय विसन्दो.
-------------------कविता खतम*------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
- Read more about बावी
- 10 comments
- Log in or register to post comments
- 7598 views
ईच्छा
मुंबईतून निघता निघता थंडी परत आली होती. सकाळी ९ वाजता उकाड्याऐवजी सुखद गारवा जाणवत होता. वर्ल्ड ट्रेड सेंटर कडून जाणार्या बसमधून बाहेरची मजा बघताना मला ती दिसली. बारिक अंगकाठी, अंगभर पदर, तोंडाचं बोळकं झालेलं काही अंतरावरूनही दिसतंय. वयापेक्षा आघाताने आल्यासारखं म्हातारपण सोबतीला. रस्तादुभाजकावर केलेल्या फ्लॉवरबेड्च्या कडेला सुर्यप्रकाशाकडे तोंड करून बसलेली. हातात कोपर्याला अडकवलेली साधी कापडी पिशवी आणि आईस्क्रिमचा कप. सभोवतालच्या गर्दीशी देणंघेणं नसल्यासारखी ती शांतपणे आईस्क्रिम खात होती. पण मला त्यातही तिच्या चेहर्यावरल्या नि:संगतेचं कुतुहल वाटलं.
- Read more about ईच्छा
- 130 comments
- Log in or register to post comments
- 53820 views
ही बातमी समजली का? - २७
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही.
- Read more about ही बातमी समजली का? - २७
- 104 comments
- Log in or register to post comments
- 55187 views
मॄगजळ
"त्याचं" येणं मला फारसं रुचलं नव्हतं ...काळ्या रंगाचा ,उंचापुरा , कुरळे केस, इनशर्ट... आणि त्यातून अडचणीचं म्हणजे तो चक्क बूट घालून घरात आला होता...
कोण गं तो? ...मी संगीताला विचारलं . संगीता ही म्हात्रेकाकांची एकुलती एक मुलगी .तसा मधूनमधून मुंबईला गेल्यावर मी म्हात्रेकाकांकडे उतरत असे. "तो" आला की म्हात्रेकाकांची वृद्ध आई त्याला शिव्या घालत असे . नशीब त्याला मराठी अजिबात कळत नव्हतं.... म्हात्रे आणि त्यांची मिसेस घरात असले की सतत "त्या"च्याविशयीच चर्चा सुरू असे.
- Read more about मॄगजळ
- 11 comments
- Log in or register to post comments
- 6228 views
सबटायटल्स की डबिंग?
Taxonomy upgrade extras
सध्या 'ऐअ' वर टारगेट प्रॅक्टिससाठी वापरल्या जाणाऱ्या 'पुणे-५२' या सिनेमामुळे या विषयावर लिहिण्याचं निमित्त झालं. यू-ट्यूबवर तो पाहात असताना अनेक ठिकाणी मला असं वाटलं की त्याची (इंग्रजी) सबटायटल्स सदोष आहेत, आणि अर्थाचा विपर्यास होतो आहे. (मला मराठी समजत असल्यामुळे सबटायटल्सकडे दुर्लक्ष करणं हा सरळ आणि सोपा मार्ग झाला असता, पण दुर्दैवाने मला ते जमत नाही.) पण 'अमुक शब्द चुकला किंवा तमुक ठिकाणी अर्थछटा ढमुक नसून कामुक आहे' इत्यादि खुसपटं काढत बसण्याचा इथे माझा हेतू नाही.
- Read more about सबटायटल्स की डबिंग?
- 41 comments
- Log in or register to post comments
- 38076 views
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १ : आये कुछ अब्र
अद्याप 'आषाढस्य प्रथम दिवसे'ला काही काळ असला तरी शब्दशः त्याचे ढग 'आखाडी' जमू लागले आहेत.
आपापल्या मनःस्थितीप्रमाणे मग त्यात पर्युत्सुक विकलतेची भावना कुणाला जाणवेल तर कुणाला 'घर माझे चंद्रमौळी'ची संसारी आठवण होईल ('इन बारिशों से दोस्ती अच्छी नहीं फराज, कच्चा तेरा मकान है कुछ तो खयाल कर'). 'पिकांत केसर ओले'च्या शृंगारिक नवेपणापासून ते कृतकृत्य सूर्यास्तापर्यंत ढगांचं रूपक अनेकदा चपखलपणे वापरण्यात आलेलं आहे.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १ : आये कुछ अब्र
- 52 comments
- Log in or register to post comments
- 71249 views
एका मत्स्यगोत्र्याचे मृत्यूबोल
पार्श्वभूमी-
गात्रं थकलेली आहेत, डॉक्टरांनी तळलेलं, भाजलेलं इ.इ. खायला सक्त मनाई केलीये.
कवळीचा आधार घेऊनही काही तोडता येत नाहीये.
आहार केवळ शाकाहारीच हवा, अशी भयानक अवस्था आलेली असताना एका कट्टर मत्सगोत्री मनात उमटलेले हे तरंग.
==================================================
समुद्रातल्या शिंपल्यांनो
भेटी पुन्हा कुठे आता
कालवणा आल्या सदा
माझ्या तिसऱ्याच१!
कवचातल्या कोलंब्यांनो,
माफ कराल ना मला?
नग्न करिले मी तुम्हा
क्षुधाशांतीसाठी.
असो सरंगा२ मांदेली३
पापलेट४ सुरमई५
होता तव्यावर चर्रर्र
क्षण सोनियाचा
- Read more about एका मत्स्यगोत्र्याचे मृत्यूबोल
- 30 comments
- Log in or register to post comments
- 19539 views
वटसावित्रीच्या निमित्ताने ...
Taxonomy upgrade extras
मद्रराज अश्वपतिची रूपवान कन्या सावित्रीने राज्यभ्रष्ट राजा द्युमत्सेनाचा राजकुमार सत्यवानाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले. पित्याचा राजमहाल आणि महालातील सर्व सुखांचा त्याग करून सावित्री आपल्या पती आणि सासर्यांसोबत वनात राहु लागली. एक पत्नी म्हणून, सून म्हणून येणारी सर्व कर्तव्ये सावित्री अतिशय निष्ठेने पार पाडीत होती. आयुष्य सु़खासमाधानात जात असताना एके दिवशी सत्यवानाला वनात लाकडे तोडत असताना अपमॄत्यु आला आणि त्याचे प्राण घ्यायला आलेल्या यमाला "माझ्या पतीसोबत मी पण येणार.. न्यायचे तर दोघांनाही न्या" असा अवघड पेच घालत सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ..
- Read more about वटसावित्रीच्या निमित्ताने ...
- 32 comments
- Log in or register to post comments
- 44639 views
……… खतरेमे है (?) (संपादित)
Taxonomy upgrade extras
ह्या वर्षी मी कोकणात गावाला गेलो होतो .तेथे स्थानिक मित्रानी मला एका गुरुजींशी ओळख करून दिली .ब्राह्मण्य ,तसेच ब्राह्मण समाजाच्या वर्तमानातील समस्या ह्यावर चर्चा झाली .ही चर्चा चालू असताना ह्या गुरुजींनी मला किस्सा सांगितला .
माघी गणेश जयंती निमित्त मी ज्या ठिकाणी राहतो तेथील गणेश मंदिरात गणेश याग होता .ज्या गुरुजींचे देहांत झाले ते (वयाने ज्येष्ठ )आणि मला हा जो किस्सा सांगितला आहे ते (वयाने कनिष्ठ )गुरुजी दोघेही त्या कार्याला उपस्थित होते .
- Read more about ……… खतरेमे है (?) (संपादित)
- 29 comments
- Log in or register to post comments
- 20867 views
दिल्या घेतल्या वचनांची...
काही दिवसांपूर्वी बसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघातांचा’ हे वाक्य लिहिलेलं वाचलं आणि अचानक लक्षात आलं, की ‘शून्य’ हे संख्यावाचक विशेषण वापरलं की त्याचे विशेष्य अनेकवचनात वापरले जाते.
हे नेहमीच होते असे नाही. जसे, काही बसेसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघाताचा’ हे वाक्य मी वाचले आहे. परंतु जास्त करून शून्यचे विशेष्य
एकवचनात वापरले तर खटकते, असे माझ्या लक्षात आले.
उदा.
* आज शून्य मूल आले होते. (* चा अर्थ- हे वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहे)
आज शून्य मुले आली होती.
* मी आज शून्य पोळी खाल्ली.
मी आज शून्य पोळया खाल्ल्या.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about दिल्या घेतल्या वचनांची...
- 50 comments
- Log in or register to post comments
- 21937 views