Skip to main content

पुस्तक वाचणार्‍या सहप्रवाशांत घट

Taxonomy upgrade extras

मी बरीच वर्ष झाली प्रवासात वाचन करतोय.
शेजारी कोणी काही वाचत असेल तर मला प्रचंड उत्सुकता असते की ती व्यक्ती काय वायतेय. जर ते पुस्तक मी वाचलेले नसेल तर ते काय आहे? कशाबद्दल आहे? वगैरेही उत्सुकता असते जी बहुतांशवेळा मी ते पुस्तक हाताळायला मागून व मालक/मालकीण बोलका/की वाटली तर प्रश्न विचारून शमवतो

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १५

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

---------------

थॅलेसेमिया झालेल्या रुग्णाला लाल रक्त पेशी देता येतात तसे चांगले कॉलेस्ट्रॉल (बहुदा एच डी एल) सुद्धा इंजेक्शन / सलाइन द्वारे देता येणे शक्य नाही का?

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग १)

पन्नाससाठ वर्षांपूर्वीच्या आणि त्याआधीच्या काळात आपल्याकडे घरोघरी एकत्र कुटुंब पद्धत असायची, एका कुटुंबातली सगळी माणसे पिढ्या न् पिढ्या एकाच ठिकाणी आणि सगळी मिळून रहात असत. कुटुंबातली सारी मंडळी एकाच घरात रहात असल्यामुळे त्या काळातली बहुतेक सगळी नातवंडे जन्मल्यापासून आजीआजोबांच्या अंगाखांद्यावर खेळतच मोठी होत असत. त्यांच्या दरम्यान एक घट्ट नाते निर्माण होत असे. वयस्क झालेले आजीआजोबा प्रपंचाचा भार पुढल्या पिढीवर सोपवून आपला वेळ हरीहरी करण्यात आणि नातवंडांना खेळवण्यात घालवत असत. नातवंडांना आजीआजोबांचा भरपूर लळा लागत असे आणि आजीआजोबांना नातवंडांशिवाय करमत नसे.

तू-ता

'अरे तुरे' ला ओडियामध्ये 'तू ता' म्हणतात.

एका अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी सांगितलेला किस्सा. तीसेक वर्षांपूर्वी ते उत्तर ओरीसामध्ये तहसीलदार होते. एक दिवस त्यांच्या ऑफिसबाहेर एक संथाळ आदिवासी बसून होता. तहसीलदार आपले काम संपवून ऑफिसबाहेर आले तर हा दिसला.

यांनी विचारले काय रे बाबा काही काम आहे का? तो म्हणाला, "हो. तहसीलदार तूच का?"

हे नोकरीत नवीन आलेले. लोकांकडून मान घ्यायची सवय. यांना त्याच्या 'तू ता' ची मौज वाटली. ते म्हणाले, "हो. मीच. बोल काय काम आहे?"

"तुला वेळ आहे का? काही विचारायचं होतं."

"हो आहे. विचार."

"मला सांग, तहसीलदार होण्यासाठी तू काय शिकलास?"

शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.

नमस्कार मंडळी!
जमिनीचा नकाशा
जमिनीचा नकाशा

मराठवाड्यामधील एका तालुक्याच्या ठिकाणी माझी १२ एकर जमीन आहे आणि मला शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.

अमोघ वक्तृत्वशैलीचा बहर

पंचावन्न किंवा साठ वर्षांपूर्वीची एक स्पष्ट आठवण मला अजूनही आहे. मी त्या वेळेस एक शाळकरी मुलगा होतो. एका रविवारच्या दुपारी माझे एक मामा टापटिपीचे कपडे करून कोठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत मला दिसले होते. हे माझे मामा चाकरमानी असल्याने रविवार म्हणजे आपला हक्काचा सुट्टीचा दिवस असे बहुसंख्य चाकरमान्यांप्रमाणे मानत आणि रविवारची दुपार सर्वसाधारणपणे लोळण्यात आणि वृत्तपत्र वाचनात घालवत असत. साहजिकच मला आश्चर्य वाटले व मी मामाकडे तो आज रविवार दुपारचा कसा काय आणि बाहेर कोठे चालला आहे? अशी पृच्छा केली. त्याने मला आपण एका मीटिंगला चाललो आहोत एवढेच सांगितले. मला फारसे काही कळले नाही व मी गप्प राहिलो.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

एन डी ए सरकारे आणि लोकसभेचे (मराठी) सभापती

व्यवस्थापकः व्यवस्थापकीय सोयीसाठी राजकारणाशी संबंधित सदर धागा इथे हलवला आहे.

दिवास्वप्ने- भटकंतीची

“God gave us memory so that we might have roses in December.” - या वाक्यात एक बदल करावासा वाटतो, “God gave us daydreams so that we might explore richness otherwise evading us.” ..... माझ्या दिवास्वप्नांबद्दल बोलायचं झालं तर,पद्मा गोळे यांची अत्यंत सुंदर कविता लहानपणे शिकले होते तीच इथे चपखल बसते -

"मी एक पक्षीण आकाशवेडी
दुजाचे मला भान नाही मुळी,
.
.
अशी झेप घ्यावी , असे सूर गावे
घुसावे धगामाजी बाणापरी,
ढगांचे अबोली, भुरे केशरी रंग,
माखून घ्यावेत पंखांवरी"