Skip to main content

मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी

अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्‍या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे.

बुरखा

Taxonomy upgrade extras

बुरख्याची माझी पहिली ओळख माझ्या पुण्यातल्या वास्तव्यात झाली. तोवर त्याकडे फारसं लक्ष गेलंच नव्हतं. माझ्या पोस्ट ग्रॅजुएट डिग्रीच्या वर्गातली ही गोष्ट, म्हणजे १०-१२ वर्षापुर्वीची. वर्ग भरायला अवकाश होता. मी आणि काही मैत्रिणी कंपु करून गप्पा मारत बसलो होतो. वर्गात आमच्या समोरच्या बाकावर नखशिखांत काळ्या बुरख्यातली मुलगी आली. मला जरा नवलच वाटलं. माझ्या कोल्हापुरातल्या मुस्लीम मैत्रिणी मुनीरा बागवान, सबीना शेख, वाहिदा, झोया वगैरे कितीतरी डोळ्यांसमोर तरळुन गेल्या. त्या बुरख्याचा वापर करत नसत. क्षणभर वाटुन गेले, इथले लोक परंपरावादी दिसतात कदाचित!

ढिंपांग टिपांग- शोषणाच्या नानाची टांग!

सकाळ' या आमच्या अतिप्रिय दैनिकात आमचे परमप्रिय लेखक प्रवीण टोकेकर उर्फ ब्रिटिश नंदी यांचे 'ढिंग टाक' हे पुन्यांदा सुरु झालेले सदर अंमळ मचूळच असल्याचे 'सकाळ' चे सखोल वाचक आणि कठोर टीकाकार मा. रमतारामजीसो (इथे खरे तर 'स' ला दोन काने आणि त्यावर एक मात्रा हवा. 'कोल्लापुरी मराठीत 'साहेब' चा हा शॉर्टफॉर्म आहे.) यांचे मत आहे. (मटा आणि इतरही सर्व मराठी वर्तमानपत्रांबाबतही त्यांचे हेच मत आहे असे ऐकतो. असो. आता कंस पुरेत. इतके कंस संपवायला एखाद्या कृष्णालाच अवतार घ्यावा लागेल.

म्येणबत्त्यांच्या पिसार्‍याचा मोर!

येका सिक्युरिटीवाल्याच्या डायरीतलं पान :

सायबांना रातरी भयाण स्वप्न पल्डं. दच्कून जागे झाले बोंबलत. भायेरून सिक्युरीटीवालेबी धावत आले आन ब्येडरूमभायेर हुबे राह्यले का भाभीजीनं भय्याजीले कानपट्टीले घोडा लावून ठोकला का काय जनू? पण बाईबी वरडत होती.
दार तोडावं का तोडू नये? का आदी बडवून पहावं? काय सुचंना. छत्तीस कोटी द्येव. कोणाला आठवावं? याला आठवलं तर त्याला राग यायचा, त्याला आठवलं तर याला राग यायचा, कोनालाच नाई आठवलं तर पप्पु आठवलेला राग यायचा. काय ब्र करावं?

नवीन शब्दांचं अप्रूप

आमच्या बंधूराजांनी म्हणे, त्यांच्या बाळपणी वेगवेगळे तीर मारले होते. त्याला कुठूनतरी सावत्र हा शब्द, आणि त्याचा वाक्यात उपयोग समजला. मग गावभर ओरडत फिरत होता, "मी आई-बाबांचा सावत्र मुलगा!" आता आईचा किंवा बाबांचा, एका कोणाचा सावत्र मुलगा असेल तरी समजण्यासारखं आहे. दोघांचाही सावत्र मुलगा? अंमळ अक्कल आल्यानंतर कधीतरी ही गोष्ट बाबांकडून कळली तेव्हा आम्ही तिघे चिक्कार खिदळलो होतो. आम्ही दोघांनी एक अट्टल बॉलिवूडी गोष्टही तयार केली होती. भावाचा जन्म झाला, मग आईने दुसरं लग्न केलं, ते आमचे बाबा. मग आईच्या पाठी बाबांनी दुसरं लग्न केलं, मग ही आई आली वगैरे!

भारतीय सण आणि त्यामागील कुटील उद्देश

Taxonomy upgrade extras

गविजी,
मी आपले प्रतिसाद गेल्या तीन वर्षापासून वाचत आहे. त्यातले न पटलेले वाक्य मला अजून सापडले नाही. आपण म्हणता ते पटावे असा माझा जेनेटीक मेक-अप असावा. :bigsmile:

या राखीच्याच मुद्द्यावरून मनात आलेले प्रश्न मी इथे लिहित आहे. कप्तानजी आणि अदितीजी हे दोन्ही रॅशनल व्यक्ती आहेत. त्यांचे म्हणणे समजून घेण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे.

वटहुकूम!

चला... आला बौ वटहुकूम!
( इत्का लग्गेच? कुणी काय पेटवलं, काय सारलं, काय टांगलं इत्यादी काय न्येमकं झालं कोण जाणे? समजंल आजउद्याले.)
तर यात जे आहे, त्याची ही यादी...
( पण जे वगळलंय, त्यासाठी ढोल - किंवा ढोलासारखं वाजवणं हे आता आपलं खरं काम... )
तोवर काय कलमं आहेत तडजोडी करून ठेवलेली ती पाहू...
( मग मनात येईलच की, इतक्यासाठी कुणाला खरंच जीव गमवावा लागतो का? आणि यासाठी अजूनही भगव्यांना चर्चा हवीच आहे का? )

शोध माझ्यातला

शोध माझ्यातला

मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले
समजण्या मला काय गवसले
अन काय हरवले माझ्यातले
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले

शुद्ध हवा घेतली का कधी?
निर्मळ पाणी चाखले का कधी?
खळाळता निर्झर कधी का पाहीला?
घाम त्वचेतून कधी का वाहीला?

लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर?
निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर?
मदत का कधी कुठे केली?
न ठेवता आशा परतीची?

घनदाट जंगलातून चाललो कधी अनवाणी?
धावता पडता रडता आले का डोळ्यातून पाणी?
पाहून दु:ख गरीबाचे दाटला का कंठ कधी?
भुकेने कधी जीव तळमळला असे झाले कधी?

एकांती बसता कोणताच विचार नाही मनी

झिम्मा

झिम्मा हे विजया मेहता यांचे आत्मचरित्र वाचले .
शेवटी मात्र मनात तरळत राहतो तो बाईनी सांगितलेला पिकासो चा कोट . ''सर्व कला म्हणजे धादांत खोटेपणा आहे , जी अंतिम सत्याकडे घेऊन जाते ''.
बाईनी नाट्य ,कला क्षेत्रात भरपूर , जबरदस्त काम केलंय . विजु जयवंत असल्याचा पार्ट जरा कंटाळवाणा वाटतो . विजु खोटे झाल्यापासून मात्र वाचायला मजा येते. सर्वच नाटकांची छान सखोल माहिती मिळते . रंगायन चळवळीचा इतिहास कळतो .
तेंडूलकर आणि एलकुंचवार असे नाटककार आणि त्यांना न्याय देणाऱ्या बाई हे कॉम्बो उत्तम आहे .

समीक्षेचा विषय निवडा