Skip to main content

मुक्तचक्र

शून्य असे मी ओढुनताणुन
नुसता पोकळ रिक्ताकार
पोकळीत कण भरण्यासाठी
पांघरली मी भगवी छाटी!

रिक्त भासते परी तिथे मग
राजस तामस नूतन तगमग
कशास पुनरपि रेटा द्यावा
नव्या दमाने प्राणच ओतुन?

शून्य म्हणुनी का व्यर्थ जगावे
का शून्यातच विरूनि जावे
शून्यभावनें राख कुडीची
व्योमाकाशी विखरत जावे?

पण..
क्षुद्र तृणावर सावरलेला
दवबिंदू जणु प्रकाशयात्री
अस्तित्वाचे अगम्य उत्तर
नित्य वसतसे त्याच्या गात्री

आणि अनाहत शंखामधला
नाद सनातन दक्षिणवर्ती
गुरुत्व की भ्रूमध्यामधले
प्रकाशते जे तिमिरावर्ती..

भिडेन मग मी त्या न्यूनाला
व्यापुन टाकिन त्या शून्याला
शून्य नव्हे, ते नित्य निरंजन

भारतातले कुपोषणाचे आकडे फुगलेले आहेत का?

कुपोषण हा गंभीर विषय आहे. भारतात चाळीस टक्क्याहून अधिक मुलं कुपोषित आहेत असं वाचल्याचं आठवतं. मात्र ही मोजमाप करण्याचे निकष बरोबर आहेत का? पानगरिया यांनी एक पेपर लिहून हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. मूळ पेपर वाचता आला नाही, पण त्यावरील चर्चेमधून काही गोष्टी स्पष्ट होतात.

पेन्शन-२

*************************************************************************************
पेन्शन-१

आता कितीसे तेल उरले आहे दिव्यात? आणि ते किती दिवस पुरणार? दत्ता येवून गेला आणि छाती फुटल्यासारखे वाटते आहे त्या दिवसापासुन...
*************************************************************************************

शरद जोशीँचा सिध्दांत

Taxonomy upgrade extras

लहान भाऊ म्हटला जोशीँच्या घरचा मयताचा निरोप द्यायला तू जा. साधारण वन डे रिटर्न अंतरावरच सर्व नातेवाईक राहतात त्यांचे. आज माझ्याकडे सहा बैल आणि चार गाई आल्या असल्याने आणि नुकतीच गटारी पाळल्याने श्रावण साजरा करण्याचा खूब मनसुबा रचलेल्या एका अत्यंत बड्या आसामीस ते मटेरिअल बोनलेस स्वरुपात द्यायचं असल्याने , मला आज जातीने इथे हजर राहून , बैल फाडायचे उच्च शिक्षण देणार्या महाविद्यालयात मी कमावलेले प्रगत ज्ञान आज सिध्दण्याची बिकट वेळ निकट आलेली आहे.

आणि पुस्तकांची नावं...

"पात्रांच्या नावाआधी पुस्तकांच्या नावाचा विचार करायला हवा होतास... ते आधी सांगायचंस ना." एक मित्र म्हणाला.
"अरे ठरवून लिहीत नव्हते काही. असंच लिहून झालं ते उगाचच." मी म्हटलं आणि पुस्तकांच्या नावांविषयी आठवायला लागले.
पुस्तकाचं नाव ठरवून मग लेखन सुरू होतं, असा तर काही क्रम नसतो. माझ्याबाबतीत तर असं झालंय की बहुतेकवेळा मी लेखन पूर्ण केल्यावर मग पुस्तकाच्या नावाचा विचार केलाय. अपवाद फक्त 'ठकी...'चा. ते लेखन सुरू केलं तेव्हाच, म्हणजे जेमतेम एक पान लिहून झालेलं असतानाच सुचलं आणि पक्कंही झालं.

माझ्या लेखनाची सुरुवात कवितांनी झाली. कवितांना शीर्षकं देणं मला कधीही जमलं नाही.

पेन्शन-१

अण्णांना जाग आली. अंथरूणाच्या बाजुची भिंत तशीही थोडी ओलसर होतीच पण ह्या थंडीच्या दिवसात तर ती पार काकडायची़च. उधईची अंडीदेखिल सुरकुतावी एवढी थंडी! ब्रम्हपुरीला ओढ्याकाठच्या घरी, भर पावसाळ्याच्या दिवसात ज्या रात्री विष्णु झाला तेंव्हाही घर असेच गारठलेले होते. थंडी, गर्मी आणि पाऊस, सगळेच महामूर होते ब्रम्हपुरीला. पण इथल्या थंडीपुढे हात टेकले असे त्यांना वाटले. घरामागुन जाणार्‍या रेल्वेच्या रुळांशेजारी गेल्या पावसाळ्यात काही चर काढून नालीला जोडले होते, तेंव्हापासुन ही भिंत ओल धरु लागली होती. मधल्या खोलीतली बाज आताशा फारच कुरकुरत असे आणि परवाच्या दिवशी बापूसाहेब बसले तर तिची पार झोळीच झाली.

नावात काय... नावाचं काय... इत्यादी

आता माझं नाव 'दुष्टबुद्धी' असं ठेवलेलं असतं, तर मी काय केलं असतं? :-).
आणि 'कविता' ठेवलेलं आहे, तरी मी काय करू शकतेय?
सूत्रसंचालक या जमातीच्या या नावावर आणि महाजन या आडनावावर केलेल्या कोट्यांनी वैताग आला की हे कळूनच चुकतं.

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २४: प्रकाश

फोटोग्राफीला "छायाचित्रण" म्हणावे का "प्रकाशचित्रण" याबद्दल अनेकदा संवाद वाचतो. खरंतर, माणसाचे डोळे विविध आकार त्यावर पडणार्‍या प्रकाशापेक्षा, सावल्यांमुळे अधिक ओळखतो. वेगळा पोत, वेगळे रंग, वेगळी दृश्यमानता हे सारे प्रकाशाचेच खेळ!
छायाचित्रण करताना मला सर्वात आव्हानात्मक काय वाटते ते आपल्या चित्रात प्रकाशाला नियंत्रित करणे. त्यातही प्रकाशालाच चित्रीत करायचे असेल - तो प्रकाश हाच चित्राचा विषय करायचा असेल - तर अधिक सृजनात्मक विचार करावा लागेल असे वाटते.

याच विचारातून या वेळच्या आव्हानाचा विषय आहे "प्रकाश".

स्पर्धा का इतर?

मेंदूचे अंतरंग

मेंदू हे माणसाला पडलेले सगळ्यात अवघड कोडे आहे. या कोड्याचे उत्तर पुन्हा मेंदूतच दडलेले आहे !
आपल्याला स्वप्न का पडतात? हरवून जातो? स्मरणरंजनात आपण इतके का हरवतो? सूड घ्यायची इच्छा मनात का निर्माण होते? आपण प्रेमात का पडतो? सगळ्या भावभावना हा जर मेंदूतल्या रसायनांचाच खेळ असला तर मग आपल्या हातात काय असतं? या प्रश्नाची उत्तर शोधायला जितकं खोल जावं तितकं गुंत्यात अधिकच अडकायला होतं!

समीक्षेचा विषय निवडा

भाषांतराचे प्रयोग

एका फॅनफिकमधे ही कविता मला भेटली. बेहद्द आवडली.

Passing stranger! you do not know how longingly I look upon you,
You must be he I was seeking, or she I was seeking, (it comes to me, as of a dream,)
I have somewhere surely lived a life of joy with you,
All is recall’d as we flit by each other, fluid, affectionate, chaste, matured,
You grew up with me, were a boy with me, or a girl with me,
I ate with you, and slept with you—your body has become not yours only, nor left my body mine only,