Skip to main content

उपाय - २

भाग १

"आम्ही जे काय सांगणार आहोत ते नीट ऐक. काळजी करण्याचं, घाबरण्यासारखं आत्ता काहीही नाही. पण अशी परिस्थिती येऊ शकते. आहे त्या परिस्थितीवर उपाय आहे. पण ... "

आम्ही पुरुष माणसे

लहान मोठी, जाड बारीक, उंच बुटकी
आम्ही माणसे विविध रंगाची आणि ढंगाची.
वेगवेगळ्या शब्दांची आणि प्रतिक्रियांची.
आम्ही सभ्य, सुसंस्कृत. आम्ही पंडित.
रूढी परंपरेच्या पडद्याआडून बोलणारे आम्ही दांभिक.

आम्ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे,
लवचिक मणक्यांचे, रंग बदलणारे सरडे.
आम्ही ताठ, आम्ही मानी, आम्ही बाणेदार,
गरजेसाठी लाज आणि मानही कापून देणारे तालेवार.

आम्ही सावध, आम्ही शिकारी,
आम्ही दयनीय, स्त्री देहाचे पुजारी.
आम्ही जॉय राईड मध्ये दबा धरून बसलेले पारधी,
द्रोपदीचे वस्त्रहरण करणारे दुशा:सन.
आम्ही सुप्रसिद्ध, आम्ही कुप्रसिद्ध.
दुबळ्यांवर वर्चस्व गाजवणारे आम्ही पुरुष सिद्ध.

'मी' म्हणजे कोण / काय?

Taxonomy upgrade extras

संपादकः "डबल मॅस्टेक्ट्मी" या चर्चेत सुरू झालेली ही उपचर्चा मूळ विषयाला काहिशी समांतर असली तरी अध्यात्मिक, शरीर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, तत्त्वज्ञानाच्या आयामातून मते येत गेल्यास अधिकाधिक रोचक होत जाईल असे वाटते. या विषयावर स्वतंत्रपणे चर्चा व्हावी म्हणून ही चर्चा वेगळी काढत आहोत. श्री. नगरीनिरंजन यांना विनंती करतो की चर्चाप्रस्ताव या दृष्टीकोनातून जर काहि बदल आवश्यक वाटले तर ते जरूर करावे.

या चर्चेतले मुद्दे सोडून थोडासा अवांतर प्रतिसाद.

लग़ीन घाई

लग़्न म्हटल्यावर घाई ही आसतेच पण लग़्नात घाई ठीक आहे पण लग़ीन ठरवताना केलेली घाई सर्वात वाईट….आसाच अनुभव आमच्या शेजारील माने म्हणुन ग़्रहस्थाना आला,मुलग़ी एम.काँम.शिकलेली,पण थोडीशी सावळी होती म्हणुन मानेनी एक मध्यम स्थळं आलं की लग़ीन लावुन द्यायचं ठरंवले….तशी स्थळं त्याना मी ही दाखवले…पण त्याना ती पसंद नव्हती….काही दिवसानी एकदा माने मुलीची लग़नाची पत्रीक घेऊन आले, मुलग़ा चाग़ला खाजग़ी कंपनीत नोकरीला आहे म्हणाले......लग़ीन आवरले मुलग़ी नादांयला ग़ेली सर्व काही मानेच्या मनाप्रमाने झाले….मुलग़ी पाच दिवस नांदुन घरी आली मानेनी विचार ही केला नसेल आशी घटना त्या मुलीने सांग़ीतली मग़ मानेनी मुलीला नांदायला न पाठवण्

डीजीटल प्रसिद्धी

लोक प्रसिद्धी पावतात की मिळवतात हे माहीत नाही पण प्रसिद्धीसाठी लोक कोणत्याही थराला जातात हे माहीती आहे,कारण समाजात सध्या एखादा कुत्र्याचा वाढदिवस जरी आसला कींवा एखादी कुत्री जर बाळंत झाली तरी तीच्या झालेल्या पिल्लासोबत काढलेला डीजीटल बोर्ड रस्त्याच्या कडेला पाहतो तेव्हा मात्र प्रसिद्धी यालाच म्हणतात का ?आसा प्रश्न पडतो.

उपाय - १

त्याला जाग आली. कोणी दुष्टाने पडदे सताड उघडले होते. "या सगळ्यांना माझा द्वेष करायला आवडतो", त्याने पुटपुटायचा प्रयत्न केला; पण झोपेतून नुकतंच उठल्यामुळे आवाज घशातून बाहेर आलाच नाही. पायाने पांघरूण उडवून देऊन तो उठला. प्रतिमा टिकवायची असेल तर व्यायाम करणं भाग होतं. मोकळं झाल्याझाल्या लगेच तो आरशासमोर उभा राहिला. "शाहरुख, तुझ्यासारखा कोणी ..." त्याचे शब्द तोंडातच राहिले. त्याच्या मिशीचे खुंट काही ठिकाणी आलेलेच नव्हते. त्याने हात लावून पाहिलं, खरंच मिशीच्या थोड्या भागात खुंट आलेच नव्हते. पण हाताला थोडं काहीतरी विचित्र लागलं. "चला अजून चष्मा लागलेला नाही तर!" पण मिशीचं काहीतरी करायला पाहिजे.

कहाणी राजपुत्राची

कहाणी राजपुत्राची

आटपाट नगर होत. नगराचा राजा होता. राजाला लेक होता. खावे प्यावे खेळावे हा त्याचा नित्यक्रम होता. एके दिवशी त्याजकडून आगळीक घडली. सवंगड्यांबरोबर खेळतांना त्याचा पाय नागावर पडला. नागानं त्याला शाप देवून क्षणात जंगलात पाठवलं.

घनदाट जंगलात राजपुत्र रानोमाळी भटकू लागला. कंदमुळं खावून जगू लागला. कोणी माणूस दिसतो का याची चाहूल घेवू लागला. होता होता कित्येक वर्षे गेले.

चंद्रमाधवीचे प्रदेश

चंद्रमाधवीचे प्रदेश

हे माझ्या आयुष्यातला अतिशय महत्वाच पुस्तक आहे. पाच वर्षांपूर्वी हे पुस्तक मी कसं काय विकत घेतलं हे मला कळत नाही, तुमच्या नशिबात असेल तेंव्हाच एखाद पुस्तक तुम्हाला भेटत यावर माझा विश्वास आहे.
या आधी मी कविता वाचल्या होत्या शाळेतच आणि खूप काही आवडत नसत कारण त्याच्याशी त्यावरचे प्रश्न, उत्तर, मार्क असल्या गोष्टी संबंधित होत्या.
कशावर तरी बोलू काही कार्यक्रमाने मी कवितांकडे ओढली गेले आणि हे पुस्तक हातात आले.
माझ्या कवितावाचनाची सुरवात या पुस्तकाने झाली आणि
ती सुरवातच अशी झाली की, काव्यप्रेमावर 'ग्रेस' या नावाची अमीट मोहर उमटली.

'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास '

'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास '- वि. का. राजवाडे हे जब्बरदस्त पुस्तक कुणी वाचलं आहे का. आपल्या थोर्र थोर्र , पवित्र इत्यादी संस्कृती बद्दल ज्ञानात भर पडून आपल्या बुद्धीवर साचलेले अनेक भ्रम दूर होतात . सप्तपदी , पाणीग्रहण , अग्नीच्या साक्षीने विवाह या सगळ्या रूढी मागे दडलंय काय ते कळते . फक्त वाचायच्या आधी (मनावरचे) सगळे चष्मे काढून ठेवा .नाहीतर मनावर फारच आघात होतील . :)
http://www.bookganga.com/eBooks/Books?BookSearchTags=Bhartiy+Vivahsanst…